शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

सेवासमाप्तीविरुद्ध ३८ डॉक्टर्स हायकोर्टात

By admin | Updated: August 12, 2014 01:14 IST

महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या (मॅगमो) संपात प्रत्यक्ष सहभाग नसतानाही सेवासमाप्तीचा आदेश काढण्यात आल्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेंतर्गत कंत्राटी पद्धतीवर कार्यरत

नागपूर : महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या (मॅगमो) संपात प्रत्यक्ष सहभाग नसतानाही सेवासमाप्तीचा आदेश काढण्यात आल्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेंतर्गत कंत्राटी पद्धतीवर कार्यरत ३८ डॉक्टरांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.सर्व डॉक्टर्स बी.ए.एम.एस. पदवीधारक असून त्यांची केंद्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेतर्फे वेतनवाढीसह अन्य विविध मागण्यांसाठी १ ते ४ जुलैपर्यंत संप करण्यात आला होता. याचिकाकर्त्या डॉक्टरांनी संपाला केवळ पाठिंबा दिला होता. ते संपात प्रत्यक्ष सहभागी झाले नव्हते. संपाच्या काळात ते कर्तव्यावर होते. यानंतरही वैद्यकीय संचालकांनी ५ जुलै रोजी याचिकाकर्त्या डॉक्टरांच्या सेवासमाप्तीचा आदेश काढला. तसेच, २० जुलै रोजी नवीन डॉक्टरांच्या नियुक्तीसाठी जाहिरात प्रकाशित केली. त्यात सेवासमाप्ती करण्यात आलेल्या डॉक्टरांना सहभागी होता येणार नाही, अशी अट टाकण्यात आली आहे. वैद्यकीय संचालकांनी सेवासमाप्तीचा आदेश जारी करताना कारणे दाखवा नोटीस बजावली नाही. प्रकरणाची चौकशी केली नाही. तसेच, डॉक्टरांना सुनावणीची संधीही दिली नाही. यामुळे सेवासमाप्तीचा आदेश अवैध असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांनी आज, सोमवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर राज्य शासनाच्या वैद्यकीय विभागाचे सचिव, वैद्यकीय संचालक, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी प्रतिवादींना नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. तसेच, जाहिरातीवर स्थगिती देऊन याचिका प्रलंबित असेपर्यंत संबंधित डॉक्टरांना सेवेवर परत घेण्यास सांगितले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड.अरुण पाटील यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)