शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

३२.७६ कोटींची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:09 IST

- जीएसटी गुप्तचर संचालनालयाची कारवाई : दोन संचालकाला अटक नागपूर : बोगस बिल तयार करून खोट्या इनपुट टॅक्स क्रेडिटची ...

- जीएसटी गुप्तचर संचालनालयाची कारवाई : दोन संचालकाला अटक

नागपूर : बोगस बिल तयार करून खोट्या इनपुट टॅक्स क्रेडिटची उचल करणारे उद्योजक आणि व्यावसायिकांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेंतर्गत केंद्रीय जीएसटी गुप्तचर संचालनालयाच्या (डीजीजीआय) औरंगाबाद क्षेत्रीय युनिटने एमएस वेस्ट/स्क्रॅपचा व्यवसाय करणाऱ्या एका फर्मच्या दोन संचालकावर धाड टाकून अटक केली.

दोन्ही संचालकाने फर्मच्या माध्यमातून बोगस पावत्याद्वारे १७०.३५ कोटींचा व्यवहार करून ३२.७६ कोटींचा इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा घेतला. दोन्ही संचालकाने कोणत्याही वस्तूंचा पुरवठा न करता बोगस बिलाच्या आधारावर खोटे आयकर विवरण दाखल केले आहे. या संदर्भात डीजीजीआयच्या औरंगाबाद क्षेत्रीय युनिटने ३ आणि ४ डिसेंबरला विविध ठिकाणी धाडी टाकल्या. या कारवाईत व्यवहाराच्या विविध नोंदी असलेली डायरी आणि शीट ताब्यात घेतल्या. खोटा व्यवहार करून ५ टक्के जीएसटी रेट अर्थात दोन्ही बाजूने २.५ टक्के कमिशन घेतल्याचे चौकशीदरम्यान आढळून आले. अशा प्रकारे या दोन्ही करदात्यांनी हजारो व्यवहार केले आहेत. चौकशीदरम्यान करदात्यांनी खोटे व्यवहार केल्याचे कबूल केले. कमिशन रकमेच्या बँक पेमेंटच्या आधारावर खोट्या व्यवहाराचा शोध घेण्यात येत आहे. करदात्यांनी बोगस पावत्यांच्या आधारे १८.६६ कोटी आणि १४.१० कोटींचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचे चौकशीत आढळून आले. यानुसार करदात्याने सीजीएसटी कायदा २०१७ चे उल्लंघन केले आहे.

दोन्ही संचालकाला ४ डिसेंबरला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायाधीशांनी दोघांनाही १९ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.