शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेसोबत ३०० टक्के युती होणारच : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 21:59 IST

आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबत युती होणारच असा पुनरुच्चार केला आहे.

ठळक मुद्दे‘ईडी’त सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबत युती होणारच असा पुनरुच्चार केला आहे. दोन्ही पक्ष एका विशिष्ट वैचारिक विचारसरणीवर चालणारे आहेत. विद्यमान आमदारांच्या जागांना हात लावायचा की नाही हाच मुद्दा आहे. दोन्ही पक्षांची गणेशोत्सवात बैठक होईल. त्यात अंतिम निर्णय होईल. मात्र सेनेसोबत भाजपची ३०० टक्के युती होणारच असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. शनिवारी नागपूर पत्रकार क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.दोन्ही पक्षांना युती हवी आहे. जागा वाटप हा संख्यात्मक विचार आहे. राज्य म्हणून एकत्रित विचार होईल. शक्यतो विद्यमान आमदारांच्या जागा एकमेकांना मागायच्या नाही असाच प्रयत्न राहील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ‘ईडी’च्या कारवाईसंदर्भात त्यांना विचारणा केली असता ती स्वायत्त संस्था आहे. त्यात सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.स्कुटरवरील लोक पाच वर्षांत शेकडो कोटींचे मालक कसे झाले ?राज ठाकरे, उन्मेष जोशी यांच्या ‘ईडी’ चौकशीवरून विरोधक सत्ताधारी भाजपला धारेवर धरताहेत. परंतु, ‘ईडी’ ही स्वतंत्र यंत्रणा असून अनेक महिने रेकी केल्यानंतरच ‘ईडी’ किंवा आयकर विभाग कारवाई करीत असतो. यामध्ये सरकार किंवा कुठल्या राजकीय पक्षाचा हस्तक्षेप नसतो. एखाद्या स्कूटरवर फिरणाऱ्या राजकीय नेत्याकडे फारशी मिळकत नसताना जर अचानक कोट्यवधी रुपयांची संपत्ती गोळा होत असेल तर हे संशयास्पद आहे. सहाजिकच ‘ईडी’ चौकशी करणारच. यात आमचा काही राजकीय डावपेच नाही असे पाटील यांनी स्पष्ट केले.संघटन मजबुतीवर भरराज्यात भाजप संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रात भाजप संघटनेतील सदस्य संख्या ही १ कोटी ६ लाख होती. याच महिन्यात ती ५० लाखाने वाढवणार आहे. आतापर्यंत ‘ऑनलाईन’ व ‘ऑफलाईन’ धरुन ही संख्या सध्या ३२ लाख झाली आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.पत्रकार, वकिलांसाठी ‘स्टायपंड’वकील आणि पत्रकार हे समाजाचा आधारस्तंभ असून त्यांच्यातील स्वाभिमान कायम राहिला पाहिजे. म्हणून या पेशात नव्याने येणाऱ्या लोकांना पहिली ३ वर्षे ‘स्टायपंड’ देण्याचा शासनाचा मानस आहे. आमचे सरकार पुन्हा निवडून आल्यास याबाबत गांभीर्याने निर्णय घेतला जाईल असे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलMediaमाध्यमे