शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे ३ लाख ९३ हजार डोज आज येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:12 IST

नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत असल्याने व जेमतेम साठा उपलब्ध असल्याने नागपूर महानगरपालिकेकडे ...

नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत असल्याने व जेमतेम साठा उपलब्ध असल्याने नागपूर महानगरपालिकेकडे दोन दिवस पुरतील एवढेच डोज शिल्लक होते. तुटवड्याची शक्यता पाहता मनपाने नागपूर ग्रामीणमधून ‘कोविशिल्ड’चे ५ हजार तर वर्धा जिल्ह्याकडून ‘कोव्हॅक्सिन’चे ७ हजार असे एकूण १२ हजार डोज उसनवारी तत्त्वावर घेतले, सोबतच राज्याकडून अडीच लाख डोजची मागणी केली होती. या धर्तीवर राज्य आरोग्य विभागाकडून नागपूर विभागासाठी कोविशिल्डचे २,७६,००० तर, कोव्हॅक्सिनचे १,१७,७६० डोज असे एकूण ३,९३,७६० डोज उद्या शुक्रवारी सकाळी उपसंचालक आरोग्य विभागाला मिळणार आहेत. विशेष म्हणजे, यातील प्रत्येक जिल्ह्याच्या गरजेनुसार डोज दिले जाणार आहेत.

ज्येष्ठांसोबतच ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या लाभार्थ्यांचे शहरात ६० केंद्रांवर तर ग्रामीणमध्ये ६१ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. पहिल्या दिवसापासून ज्येष्ठांची सर्वच केंद्रांवर गर्दी होऊ लागली आहे. परंतु तिसऱ्या टप्प्यात ४९,५०० कमी डोज मिळाले. यातच केंद्रांची संख्या वाढवून दोन पाळीत लसीकरण सुरू करण्यात आले. यामुळे केंद्रावर गर्दी कमी झाली असली तरी दिवसाकाठी ज्येष्ठांचे लसीकरण ५ हजारांवर पोहचले. मागील १० दिवसात शहरात दोन्ही प्रकारातील एकूण ३४ हजार ३३१ लाभार्थ्यांनी लस घेतली. ‘हेल्थ वर्कर, ‘फ्रंट लाईन वर्कर’ यांना पहिला व दुसरा डोज देणे सुरू आहे. परिणामी, मागील तीन दिवसापासून प्रतिदिवस ९ ते १० हजार डोज लावले जात आहेत. यामुळे लसीचा तुटवडा पडण्याची शक्यता होती. आरोग्य विभाग व मनपाने तातडीने हालचाली केल्याने मंगळवारी वर्धा जिल्ह्यातून कोव्हॅक्सिनचे ७ हजार तर नागपूर ग्रामीणकडून ‘कोविशिल्ड’चे ५ हजार डोज उपलब्ध झाले, परंतु ही तात्पुरती सोय होती. राज्याच्या आरोग्य विभागाकडून अधिक लसीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आता कोविशिल्डचे २,७६,००० तर कोव्हॅक्सिनचे १,१७,७६० असे एकूण ३,९३,७६० डोज उपलब्ध होणार आहेत. ही लस घेण्यासाठी उपसंचालक आरोग्य विभागाने रुग्णवाहिका मुंबईला पाठविली आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत रुग्णवाहिका लस घेऊन अकोला जिल्ह्यात पोहचणार असून, शुक्रवार सकाळपर्यंत नागपूर जिल्ह्यात पोहचणार असल्याची माहिती आहे.

- लसीचे वाटप नागपुरातून

आतापर्यंत लसीचे वाटप राज्य आरोग्य विभाग करीत होते. परंतु आतापर्यंत आलेल्या तीन टप्प्यातील डोजमध्ये जिथे गरज नसताना त्या जिल्ह्याला अधिक डोज गेले असल्याचे समोर आले. नागपूरला कमी डोज मिळून तुटवड्याची समस्या निर्माण झाली होती. यामुळे शुक्रवारी भेटणाऱ्या डोजमुळे नागपुरातून सहा जिल्ह्यांना लसीचे वाटप होणार आहे. यात प्रत्येक जिल्ह्यात असलेला शिल्लक साठा व रोज वापरात येणाऱ्या डोज यावरून लसीचे वाटप होण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्याला जवळपास दीड लाखापेक्षा जास्त डोज मिळण्याची माहिती आहे.