शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
2
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
3
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
6
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
7
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
8
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
9
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
10
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
11
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
12
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
13
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
14
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
15
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
16
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
17
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
18
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
19
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
20
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी

२,६२८ बाधित, २८ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:09 IST

सावनेर/ काटोल/ कळमेश्वर/ हिंगणा / मौदा / रामटेक / उमरेड/ नरखेड/ कुही/ रामटेक : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना ...

सावनेर/ काटोल/ कळमेश्वर/ हिंगणा / मौदा / रामटेक / उमरेड/ नरखेड/ कुही/ रामटेक : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संक्रमणाचा वेग दुपटीने वाढला आहे. गुरुवारी तेरा तालुक्यांत २,६२८ रुग्णांची नोंद झाली, तर २८ रुग्णांचा मृत्यू झाला.

सावनेर तालुक्यात पहिल्यांदाच ४४६ रुग्णांची नोंद झाली. तालुक्यात १० रुग्णांचा मृत्यू झाला. सावनेर शहरात १८३, तर ग्रामीण भागात २६३ रुग्णांची भर पडली.

काटोल तालुक्याची स्थिती चिंताजनक आहे. तालुक्यात ७४५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत २४० नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात काटोल शहरातील ८५, तर ग्रामीण भागातील १५५ रुग्णांचा समावेश आहे.

कुही तालुक्यात ८९ रुग्णांची भर पडली. मांढळ व नवेगाव येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ५३८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात कुही येथे २१, मांढळ (२४), वेलतूर (३८), साळवा (४), तर तितूर येथे दोन रुग्णांची नोंद झाली. तालुक्यातील सोनपुरी गाव कोरोना हाटस्पॉट ठरले आहे. २२५ लोकसंख्या असलेल्या या गावात बाधितांची संख्या ६१ इतकी आहे.

उमरेड तालुक्यात ७६ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ३०, तर ग्रामीण भागातील ४६ रुग्णांचा समावेश आहे. कळमेश्वर तालुक्यात १६९ रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर- ब्राह्मणी न. प. क्षेत्रातील १८ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात १५१ रुग्णांची नोंद झाली.

नरखेड तालुक्यात ४७ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ९, तर ग्रामीण भागातील ३८ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५५०, तर शहरातील ७८ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव अंतर्गत २६, मेंढला (३), जलालखेडा (४), तर मोवाड येथे ५ रुग्णांची नोंद झाली. मौदा तालुक्यात ५५ रुग्णांची नोंद झाली. दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १४७० इतकी झाली आहे. यात ९७४ रुग्ण कोरोेनामुक्त झाले. सध्या ४६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हिंगण्यात ग्राफ वाढला

हिंगणा तालुक्यात १३७५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत २६८ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यातील मृत्यूसंख्या १४५ इतकी झाली आहे. गुरुवारी वानाडोंगरी येथे ९२, डिगडोह (४५), हिंगणा (१७), इसासनी (१७), टाकळघाट (३), निलडोह (२८), गुमगाव (१२), शिवमडका (१०), भारकस (८), रायपूर (४), कान्होलीबारा (५), वागधरा (२), ऐरणगाव (७), अडेगाव (४) शिरुळ (३), जुनेवानी २, तर धानोली, कवडस, आमगाव, उमरीवाघ, मोंढा, देवळी सावंगी, नागलवाडी, गौराळा, मेटाउमरी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.