शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

२६ नगरसेवकांनी थकविले वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:25 IST

सर्वसामान्यांनी एक-दोन महिन्याचे बिल थकविल्यास कारवाईचा इशारा दिला जातो. वीज पुरवठा खंडित केला जातो.

ठळक मुद्देएसएनडीएल हतबल : राजकीय वजनामुळे कारवाई नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वसामान्यांनी एक-दोन महिन्याचे बिल थकविल्यास कारवाईचा इशारा दिला जातो. वीज पुरवठा खंडित केला जातो. मात्र एसएनडीएलकडे वीज पुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या शहर क्षेत्रातील २६ नगरसेवकांनी गेल्या काही महिन्यात वीज बिल भरलेले नाही. परंतु एसएनडीएलकडून या थकबाकीदारांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही. थकबाकी वसुलीत वेगवेगळा निकष कसा असा प्रश्न शहरातील सामान्य ग्राहकांना पडला आहे.काही नगरसेवकांच्या स्वत:च्या तर काहींच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर वीज मीटर आहे. काही जणांकडे एकापेक्षा अधिक मीटर आहेत. यात भाडेकरूंचाही समावेश आहे. वीज बिल न भरल्यास सामान्य ग्राहकांना एसएनडीएलच्या कॉल सेंटरमधून लगेच फोन येतो. वीज पुरवठा खंडित करण्याची तंबी दिली जाते. सर्वसामान्य नागरिक भीतीमुळे तातडीने बिल भरतात. नगरसेवकांकडे मात्र एसएनडीएलकडून दुर्लक्ष केले जाते. थकबाकीदार असूनही राजकीय दबावामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. बिल न भरताही विजेचा सर्रास वापर करतात. अधिकाºयांनीही याला दुजोरा दिला.थकबाकीदार नगरसेवकांत सर्वाधिक नगरसेवक हे भाजपाचे आहेत. यातील सुषमा चौधरी यांच्याकडे २.७ लाखांची थकबाकी आहे. त्यांनी आॅक्टोबर २०१५ पासून वीज बिल भरलेले नाही. मीटर अधिक गतीने फिरत असल्याचा त्यांचा आक्षेप आहे.नगरसेवक प्रवीण भिसीकर यांच्याकडे तीन मीटर्स आहेत. ते दोन मीटर्सचे बिल नियमितपणे भरतात मात्र, तिसºया मीटरचे बिल त्यांनी फेब्रुवारी २०१६ पासून भरलेले नाही. त्यांच्याकडे ४५ हजारांची थकबाकी आहे. काँग्रेसचे नगरसेवक कमलेश चौधरी यांच्या घरीही दोन वीजमीटर आहेत. त्यांच्याकडे १ लाख ६२ हजार ५०० रुपयांची थकबाकी आहे. माजी विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांचेही थकबाकीदारांच्या यादीत नाव आहे. परंतु त्यांनी बिल भरल्याची माहिती दिली.असे आहेत थकबाकीदार नगरसेवकभाजपाचे नगरसेवक सुषमा चौधरी, भाग्यश्री कानतोडे, विद्या कन्हेरे, जगदीश ग्वालबंशी, दुर्गा हत्तीठेले, प्रवीण भिसीकर, दीपक वाडीभस्मे, दिव्या धुरडे, ज्योती भिसीकर, वंदना यंगटवार, श्रद्धा पाठक, मनोज चाफले, सरिता कावरे, रिता मुळे, स्नेहल बिहारे, कल्पना कुंभलकर, रेखा साकोरे, नरेंद्र (बाल्या) बोरकर, काँग्रेसचे ऋषिकेश (बंटी) शेळके, हरीश ग्वालबंशी, सय्यदा अन्सारी, कमलेश चौधरी तर बसपाचे संजय बुरेवार व ममता सहारे थकबाक ीदार आहेत.