शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

२४ लाखाची धाडसी चोरी

By admin | Updated: March 28, 2015 01:54 IST

सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील छाप्रुनगर चौकातील एका मोबाईलच्या दुकानात चोरट्यांनी २३ लाखाचे मोबाईल

आरोपी सीसीटीव्हीत कैद : छाप्रुनगर चौकातील घटना नागपूर : सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील छाप्रुनगर चौकातील एका मोबाईलच्या दुकानात चोरट्यांनी २३ लाखाचे मोबाईल व एक लाख रुपये रोख असा २४ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सर्व चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असतानाही, घटनेच्या ४८ तासानंतरही पोलीस चोरट्यांचा सुगावा लावण्यास अपयशी ठरले आहेत. या धाडसी चोरीमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. विक्रम चुग यांचे आॅरेंज सिटी मोबाईल कलेक्शन नावाने दुकान आहे. विक्रम बुधवारी रात्री दुकान बंद करून घरी गेले. गुरुवारच्या पहाटे ५ वाजताच्या सुमारास चोरट्यांनी लोखंडी रॉडने दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला. सीसीटीव्ही फुटेजनुसार एक चोरटा आतमध्ये होता. तर दोघे दुकानाबाहेर लक्ष ठेवून होते. आतमध्ये शिरलेल्या चोरट्याने दुकानातील इतर साहित्याची फेकफाक करून नामांकित कंपनीचे १४८ मोबाईल चोरून नेले. दुकानात शिरलेला चोरटा सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसतो आहे. चोरट्याने जास्तीत जास्त मोबाईल नेता यावे म्हणून दुकानातील इतर कुठल्याही साहित्याला हात लावला नाही. गुरुवारी नेहमीप्रमाणे विक्रम दुकानात आल्यावर त्यांना चोरट्यांचा उपद्रव लक्षात आला.त्यांनी लकडगंज पोलिसांकडे याची तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी गोळा केले असून, आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेतील आरोपी राज्याबाहेरील असल्याचा पोलिसांचा संशय आहे, त्यादृष्टिकोनातूनही तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)पोलिसांचे आवाहनदुकानाच्या मालकाने चोरी गेलेल्या सर्व मोबाईलचे इएमआय नंबर पोलिसांना दिले आहे. जो कुणी चोरट्याकडून मोबाईल खरेदी करेल, इएमआय नंबरमुळे पोलीस त्यांच्यापर्यंत पोहचू शकतात. कुणी स्वस्तात फोन विकत असेल तर त्यांच्याकडून फोन घेऊ नका. त्यांची माहिती पोलिसांना द्या, असे आवाहनही केले आहे.