शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

Corona Virus; विदर्भात एकाच दिवशी २३९० चाचण्या शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 10:39 IST

भारतात इतर देशाच्या तुलनेत चाचण्यांचे प्रमाण खूप कमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आसीएमआर) माहितीनुसार दर दहा लाख लोकांमागे २००७ लोकांच्या चाचण्या होत असल्याचे समोर आले. यामुळे दरम्यानच्या काळात प्रत्येक जिल्ह्यात चाचणीची सोय करण्यावर भर दिला जात आहे.

ठळक मुद्देनागपुरात रोज १७९० कोरोना तपासणी होऊ शकतेमेडिकलची ७०० चाचण्यांची क्षमता

सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधित रुग्ण शोधून काढत त्याच्यावर उपचार करण्यासाठी सर्वात आवश्यक बाबत ठरते ती म्हणजे कोरोना चाचणी. जितक्या अधिक कोरोना चाचण्या होतील, तितक्या जलदगतने कोरोना रुग्णांवर उपाार करून संसर्गाला आळा घालता येईल. विदर्भात ११ प्रयोशाळा आहेत. यांची प्रतिदिवस चाचण्यांची क्षमता २३९० आहे. एवढ्या मोठ्या संख्येत चाचण्या झाल्यास विदर्भात कोरोनाचा प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यास मदत होईल, असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. प्रत्येक संशयिताची चाचणी आवश्यक आहे. जोपर्यंत कोरोनाची लागण झालेल्या सगळ्या लोकांची चाचणी होत नाही, तोवर त्यांना वेगळं काढून क्वारंटाईनमध्ये ठेवता येणार नाही. आणि तसे झाले नाही तर ते इतर लोकांमध्ये राहून कोरोना पसरवत राहतील. यामुळे चाचणी खूप महत्त्वाची आहे. परंतु भारतात इतर देशाच्या तुलनेत चाचण्यांचे प्रमाण खूप कमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आसीएमआर) माहितीनुसार दर दहा लाख लोकांमागे २००७ लोकांच्या चाचण्या होत असल्याचे समोर आले. यामुळे दरम्यानच्या काळात प्रत्येक जिल्ह्यात चाचणीची सोय करण्यावर भर दिला जात आहे. राज्यात ‘आसीएमआर’ने ४२ प्रयोगशाळांना मंजुरी दिल्या आहेत. यातील ११ प्रयोगशाळा विदर्भात आहेत. रोजची चाचण्यांची क्षमता २३९० आहे. परंतु एवढ्या चाचण्या होत नसल्याचे वास्तव आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने (डीएमईआर) सर्व प्रयोगशाळांना पत्र पाठविले आहे. क्षमतेनुसार चाचण्या न झाल्यास संबंधित संस्थेच्या प्रमुखाला जाब विचारून कारवाई करण्यात येईल, असे पत्रच ‘डीएमईआर’ने सर्व प्रयोगशाळांना पाठविले आहे.

११ प्रयोगशाळा आणि चाचण्यांची क्षमता

विदर्भात ११ प्रयोगशाळा आहेत. सर्वाधिक क्षमता नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) प्रयोगशाळेची आहे. येथे रोज ७०० तपासण्य होऊ शकतात. त्यानंतर इंदिरा गांधी शासकी वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयाचा (मेयो) प्रयोगशाळेची क्षमता ४०० आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची (एम्स) चाचणी क्षमता ३९० आहे. मेडिकल अकोलची २५०, माफसू, निरी, एमजीआयएमएस वर्धा व सेंट जीबी युनिर्व्हसीटी अमरावतीची क्षमता प्रत्येकी १२५ तर नागपूरची आयआरएल, मेडिकल चंद्रपूर, मेडिकल यवतमाळ यांची क्षमता प्रत्येकी ५० आहे.

नागपुरात रोज १७९० तपासण्या

नागपुरात सहा प्रयोगशाळा आहेत. यात मेडिकल, मेयो, एम्स, माफसू, नीरी व आयआरएल प्रयोगशाळा आहे. यांची रोजच्या चाचण्यांची क्षमता १७९० आहे. परंतु जिल्हा महिती विभागाच्या माहितीनुसार गेल्या १२ तासांत ३२६ नमुने तपासण्यत आले आहे. विशेष म्हणजे, विभागीय आयुक्तांनी जास्तीत जास्त संशयितांचे नमुने घेण्यासाठी शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय व रुग्णालय आणि शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयावर जबाबदारी सोपविली आहे.प्रत्येक प्रयोगशाळा आपल्या पद्धतीने चांगले काम करीत आहे. या प्रयोगशाळांना इतक्या क्षमतेपर्यंत चाचण्या करता येऊ शकतात, असे पत्र दिले आहे.

डॉ. तात्यराव लहाने संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस