शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आंभोरा लिफ्ट एरिगेशनवर २.३२ कोटींच्या पाणीपट्टीचा बोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:08 IST

नागपूर : गोसेखुर्द धरणाच्या चार मुख्य उपसा सिंचन योजनांपैकी आंभोरा उपसा सिंचन योजना २ कोटी ३२ लाख रुपयांच्या पाणीपट्टीच्या ...

नागपूर : गोसेखुर्द धरणाच्या चार मुख्य उपसा सिंचन योजनांपैकी आंभोरा उपसा सिंचन योजना २ कोटी ३२ लाख रुपयांच्या पाणीपट्टीच्या बोजाखाली दडपली आहे. २०१४ पासून थकबाकी कायम असून, सतत वाढतच आहे. ती भरण्यासाठी प्रकल्पाकडे पैसा नाही. शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल होत नाही. अशातच वीज वितरण कंपनीने कडक धोरण अवलंबल्याने ही उपसा सिंचन योजना केव्हाही ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.

आंभोरा उपसा सिंचन योजना २०१४-१५ पासून कार्यान्वित करण्यात आली. सुरुवातीच्या काळात वितरिका पूर्ण न झाल्याने आणि पाणी वापर संस्था अस्तित्वात न आल्याने शेतकऱ्यांकडून थकबाकी वसुलीवर भरच देण्यात आला नाही. परिणामत: २०१४ मध्ये असलेली १९ लाख ७१ हजार रुपयांची थकबाकी मार्च २०२१ अखेरपर्यंत २ कोटी ३२ लाख रुपयांवर पोहोचली आहे.

जलसंधारण विभागाने आंभोरा पाटबंधारे विभागाला दिलेले पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्टही पूर्ण करता न आल्याने वसुली कमी आणि पाणीपट्टी थकबाकी अधिक, यामुळे ही उपसा सिंचन योजना संकटात सापडली आहे.

...

अशी आहे अवस्था

२०१४-१५ मधील थकबाकी : १९ लाख ७१ हजार

मार्च २०२१ अखेरपर्यंतची थकबाकी : २ कोटी ३२ लाख

२०२१ ते मार्च २०२२ साठी वसुलीचे उद्दिष्ट : १ कोटी रुपये (दरमहा ७ लाख ३३ हजार )

जून २०२१ पर्यंतचे उद्दिष्ट : २४ लाख ९९ हजार

जून-जुलैपर्यंत पाणीपट्टी वसुली : ७२ लाख

जून-जुलै वीजबिल : २२ लाख ९८ हजार ६५० रुपये

...

प्रकल्पाकडे पैसाच नाही

शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी थकबाकीची वसुली करून वीज देयक भरावे, असे अपेक्षित आहे. सरकार बिल भरणार नसल्याने सिंचनासाठी यापुढे पाणी देता येणार नाही, अशी स्थिती आहे. १९८३ मधील ३ कोटी १० लाख रुपये किमतीची ही उपसा सिंचन योजना आता ३४१ कोटी रुपयांची झाली आहे. मार्च अखेरपर्यंत यातील ३४० कोटी ३६ रुपये खर्च झाले असून जेमतेम १ कोटी रुपये हातात आहेत. यामुळे ही योजना वाचविण्यासाठी पाणीपट्टी वसुलीशिवाय आता दुसरा आधारच राहिलेला नाही.

...

३८ गावातील शेतकरी येणार संकटात

११,१९५ हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात ३८ गावे असून, प्रत्यक्ष सिंचन घेणारे ३,५०० लाभधारक शेतकरी आहेत. योजनेतून ४,४०० हेक्टर सिंचन झाले असून, खरीप व रब्बीतील पिकांसाठी लाभ होत आहे. मात्र, पाणीपट्टीअभावी वीज कापल्यास ३८ गावातील शेतकरी संकटात येण्याचा धोका आहे.

...

कोट

पाणीपट्टीची थकबाकी भरण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना सातत्याने आवाहन करीत आहोत. थकबाकी भरण्यात शेतकरी उदासीन आहेत. पाणी वापर संस्थांच्या माध्यमातूनही आवाहन केले जात असून, यापुढे नाइलाजाने थकबाकीदारांच्या ७-१२ वर कर्जाचा बोजा चढवावा लागेल.

- किशोर दमहा, कार्यकारी अभियंता, आंभोरा उपसा सिंचन योजना

...