शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

२२ आठवड्यांचा विकारग्रस्त गर्भ पाडण्याची परवानगी : हायकोर्टाचा दिलासा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 23:17 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी २२ आठवड्याचा विकारग्रस्त गर्भ पाडण्याची परवानगी दिली. हा निर्णय देताना वैद्यकीय मंडळाचा अहवाल विचारात घेण्यात आला. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देवैद्यकीय अहवाल विचारात घेतला

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी २२ आठवड्याचा विकारग्रस्त गर्भ पाडण्याची परवानगी दिली. हा निर्णय देताना वैद्यकीय मंडळाचा अहवाल विचारात घेण्यात आला. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी हा निर्णय दिला.संबंधित गर्भवती महिला वर्धा जिल्ह्यातील रहिवासी आहे. वर्धा येथील सरकारी रुग्णालयात २९ जुलै रोजी करण्यात आलेल्या थ्रीडी स्कॅनमध्ये तिच्या गर्भाला हृदय व फुफ्फुसाचे विकार व शरीर सुजलेले आढळून आले. त्यामुळे तिने व तिच्या पतीने गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. त्याची परवानगी मिळविण्यासाठी महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पहिल्या सुनावणीनंतर न्यायालयाने महिलेची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचा आदेश मेडिकलच्या अधिष्ठात्यांना दिला होता. त्यानुसार, वैद्यकीय मंडळ स्थापन करून १ ऑगस्ट रोजी महिलेची तपासणी करण्यात आली. त्यात गर्भ विकारग्रस्त असल्याचे व जन्म झाल्यानंतर जगू शकणार नसल्याचे आढळून आले. त्यामुळे न्यायालयाने महिलेची याचिका मंजूर केली. वैद्यकीय मंडळामध्ये गायनॉकॉलॉजीस्ट अ‍ॅन्ड ऑबस्टेट्रिक्स, पेडियाट्रिक्स, सोनोलॉजी, कार्डियालॉजी, पल्मोनोलॉजी, न्यूरोलॉजी, जेनेटिक्स, पॅथालॉजी आदी तज्ज्ञांचा समावेश होता. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. स्विटी भाटिया यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयpregnant womanगर्भवती महिलाAbortionगर्भपात