शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील २०१५ पर्यंतचे ले-आऊट होणार नियमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 23:35 IST

राज्य सरकारने नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एनएमआरडीए)अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतच्या ले-आऊटला संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्दे‘एनएमआरडीए’तील दीड लाख प्लॉटधारकांना दिलासा ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतच्या प्लॉटला संरक्षण, रियल इस्टेटला बूस्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारने नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एनएमआरडीए)अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतच्या ले-आऊटला संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास दीड लाख प्लॉटधारकांना याचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना पालकमंत्री बोलत होते. त्यांनी सांगितले की, ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतचे सर्व ले-आऊट नियमित करण्यात येणार आहे. यासाठी प्लॉटधारकांना एनएमआरडीएच्या विकास शुल्कासह १५ टक्के कम्पाऊंडिंग शुल्कही भरावे लागेल. यामुळे सर्वांसाठी घर या योजनेलाही गती मिळेल.सन २००० नंतर शहरात ले-आऊटने मोठा जोर पकडला. वर्धा रोडच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर ले-आऊट विकसित झाले. याशिवाय हिंगणा रोड, कामठी रोड, अमरावती रोड आणि भंडारा रोडलगत मोठ्या प्रमाणावर ले-आऊट टाकण्यात आले. दरम्यान, काही डेव्हलपर्सनी ले-आऊट विकसित न करताच प्लॉट विकून टाकले. परिस्थिती इतकी गंभीर झाली की, सरकारने रजिस्ट्रीवरच बंदी आणली. अशा परिस्थितीत शहरातील लाखो लोकांनी प्लॉटमध्ये गुंतवणूक केल्यानंतरही ते फसवल्या गेल्याचे समजू लागले होते. अशा लोकांना सरकारच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आता ते विकास शुल्क भरून आपला प्लॉट नियमित करू शकतील. या निर्णयाचा लाभ तब्बल दीड लाख लोकांना मिळेल, असे सरकारचे म्हणणे आहे. परंतु हा आकडा खूप मोठा होऊ शकतो. कारण डीपी प्लानला मंजुरी देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या आपत्ती व सूचनांमध्ये तब्बल पाच हजारापेक्षा अधिक आपत्ती आल्या होत्या. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, जिल्ह्यात पाच हजारापेक्षा अधिक संपत्ती अडकलेल्या आहेत. या निर्णयामुळे या प्लॉटची खरेदी-विक्री करणे शक्य होईल. यामुळे मंदीत असलेल्या रियल इस्टेट व्यवसायालाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

 बिना-भालेगावचे पुनर्वसन पालकमंत्री बावकुळे यांनी सांगितले की, वेकोलिच्या खाणीमुळे प्रभावित झालेल्या मौदा तालुक्यातील बिना व भालेगाव या दोन गावाच्या पुनर्वसनाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी महाजेनको १२२ कोटी व वेकोलि ४४ कोटी रुपयांचे योगदान देणार आहे. या कामासाठी एनएमआरडीएला नोडल एजन्सी बनवण्यात आले आहे.कापूस बियाण्यांची गुणवत्ता तपासणीसाठी समिती  बावनकुळे यांनी सांगितले की, कापूस बियाण्यांपासून उत्पादन मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी मिळत आहेत. परंतु अधिकारी मात्र ही गोष्ट नाकारत आहेत. त्यामुळे खरी परिस्थिती काय आहे, जे जाणून घेण्याच्या उद्देशाने कापूस बियाणांची गुणवत्ता तपासण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली आहे. कृषी विभागाचे जॉईंट डायरेक्टर यांच्या नेतृत्वात ही समिती गठित करण्यात आली आहे.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेMediaमाध्यमे