शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

२ हजाराच्या नोटा चलनात दिसेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:08 IST

शरद मिरे: भिवापूर : नोटाबंदीनंतर चलनातील १ हजार व पाचशे रुपयांची नोट बाद झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने सामान्यांच्या हातात थोपविलेली ...

शरद मिरे:

भिवापूर : नोटाबंदीनंतर चलनातील १ हजार व पाचशे रुपयांची नोट बाद झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने सामान्यांच्या हातात थोपविलेली २ हजार रुपयाची नोट आता मात्र दिसेनाशी झाली आहे. त्यामुळे चलनातील सर्वात मोठी नोट गेली कुठे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केली होती. हा धक्का सामान्य नागरिकांपेक्षा गर्भ श्रीमंतांसाठी मोठा होता. मात्र त्याचा त्रास सामान्य नागरिकांनाच अधिक झाला. या नोटाबंदीत हजार व पाचशे रुपयाची नोट चलनातून बाद केल्यानंतर त्याची उणीव भरून काढण्याकरीता रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून २ हजार व ५०० रुपयाची नोट नविन डिझाईनसह बाजारात आणली. त्यानंतर काही दिवसांनी २०० रुपयांची नोट सुध्दा आली. दरम्यान, नव्याने आलेल्या या तिन्ही नोटा दैनिक व्यवहाराच्या माध्यमातून बँकेत व बाजाराममध्ये वर्ष दोन वर्षे सर्वांच्या दृष्टीस पडल्या. मात्र गत वर्षभरापासून यातील २ हजार रुपयाची नोट सामान्य नागरिकांच्या डोळ्याला दिसणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे नोटाबंदीनंतर एवढ्या मोठ्या संख्येत आलेल्या २ हजार रुपयांच्या नोटा नेमक्या गेल्यात कुठे? हा प्रश्नच आहे. भिवापूर शहरात दोन राष्ट्रीयीकृत व एक को-ऑपरेटिव्ह बँक आहे. तालुक्यातील नागरिकांचे येथे सेव्हिंग खाते तर व्यापाऱ्यांचे करंट खाते आहे. येथे ग्राहकांकडून २ हजार रुपयांची नोट फारच कमी प्रमाणात येत असल्याचे सांगण्यात आले. तर‌ सामान्य ग्राहक व व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता गत वर्षभरापासून बाजारात २ हजार रुपयांची नोट दिसत नसल्याचे सांगितले. शिवाय बँकेतून सुध्दा पाचशे व दोनशे रुपयांची नोटच मिळत असल्याचे सांगण्यात आले. शहरात को-ऑपरेटिव्ह व पतसंस्थेचे अनेक दैनिक अभिकर्ते दैनिक कलेक्शनचे काम करतात. त्यांनासुध्दा गत वर्षभरापासून २ हजार रुपयांच्या नोटेचे दर्शन झालेले नाही. एकंदरीत मोठ्या देवाणघेवाणीतसुध्दा ५००, २०० व १०० रुपयांच्या नोटेचा अधिक वापर होत आहे. तर किरकोळ देवाणघेवाणीत १००, ५०, २०, १० रुपयांची नोट दिसत आहे. अचानक दर्शन दुर्लभ झालेल्या २ हजार रुपयांच्या नोटेवरून सामान्य नागरिकांसह आर्थिक उलाढाल करणाऱ्या बँकाही आता यावर चिंतन करत आहे.

---

उद्देशालाच हरताळ फासला

वर्षानुवर्ष दडवून ठेवलेला ''''ब्लॅक मनी'''' बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने नोटाबंदी केल्याचे सांगण्यात आले. काहीअंशी ते खरे ही असले तरी, त्यानंतर चलनात आलेली २ हजार रुपयांची नोट अशी अचानक दिसेनाशी झाल्यामुळे नोटाबंदीच्या उद्देशालाच हरताळ फासल्याचे दिसते. २ हजार रुपयांच्या नोटा अनेकांनी दडवून ठेवल्यामुळेच तुटवडा निर्माण झाल्याचे आता बोलल्या जात आहे.

चलनातील सर्वात मोठी २ हजार रुपयांची नोट अशी अचानक गायब होणे म्हणजे ज्या उद्देशासाठी नोटाबंदी करण्यात आली. तो उद्देश फसल्याचे स्पष्ट होते. पूर्वीप्रमाणेच नोटाबंदीनंतर अनेकांनी या नोटा दडवून ठेवल्याचा संशय त्यामुळे बळावताे आहे. याकडे रिझर्व्ह बँकेने व केंद्र शासनाने गांभीर्याने लक्ष घालणे आवश्यक आहे.

- प्रमोद रघुशे, संचालक विद्यानिकेतन, भिवापूर