शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

अन् २०० वर्षांच्या वृक्षाला मिळाले ‘जीवनदान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 02:02 IST

गेल्या २०० वर्षांपासून ऊन,पाऊस, वारा झेलत उभ्या असलेल्या पिंपळाच्या झाडाचा गुरुवार हा अखेरचा दिवस ठरला असता.

ठळक मुद्देपरिसरातील जागरूक लोकांनी केला विरोध : मनपाने थांबविली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या २०० वर्षांपासून ऊन,पाऊस, वारा झेलत उभ्या असलेल्या पिंपळाच्या झाडाचा गुरुवार हा अखेरचा दिवस ठरला असता. एरवी मोठमोठाल्या प्रकरणांकडे दुर्लक्ष करणाºया मनपा प्रशासनाने केवळ एका तक्रारीवरुन वृक्ष कापण्याची परवानगी दिली अन् वृक्षाची ‘कत्तल’ करण्यासाठी मोठमोठाली यंत्र आणण्यात आली. मात्र परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेतला अन् या वृक्षाला जीवनदान मिळाले.सीताबर्डी येथील बुटीवाडा, भिडे रोड, टेम्पल बाजार येथील २०० वर्षे जुने पिंपळाचा वृक्ष आहे. घनश्याम पुरोहित नावाच्या व्यक्तीने, या वृक्षामुळे धोका उद्भवू शकतो, या आशयाचे पत्र मनपाच्या उद्यान विभागाला देऊन, वृक्ष कापण्यासंदर्भात परवानगी मागितली होती. मनपाच्या उद्यान विभागाने परवानगी दिली मात्र त्यात फक्त धोकादायक ठरलेल्या फांद्याच कापाव्यात, असे स्पष्ट केले.परंतु गुरुवारी दुपारच्या सुमारास वृक्ष कापण्यासाठी मोठमोठी यंत्र सामुग्री घेऊन काही लोक पोहचले. परिसरातील लोकांनी यापूर्वी हे वृक्षा कापण्यात येऊ नये, असे पत्र मनपाला दिले होते. लोकांनी वृक्ष कापण्यासाठी त्यांना विरोध केला. यावेळी सीताबर्डी ठाण्याचे पथकही तेथे पोहचले. वृक्ष संवर्धनासाठी काम करणारे ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे कौस्तुभ चॅटर्जी व त्यांचे सहकारीसुद्धा परिसरात पोहचले. सर्वांनीच ही कारवाई थांबवावी, यासाठी प्रयत्न केला. मनपाचे उद्यान निरीक्षक अमोल चौरीपगार यांना घटनास्थळी बोलविण्यात आले. त्यांनी परवानगीचे पत्र बघितल्यावर, ही कारवाई ताबडतोब थांबवायला लावली. या कारवाईमुळे अतिशय जुना वृक्ष कापण्यापासून वाचले. जी फांदी धोकादायक ठरते आहे. तीच कापण्यात यावी आणि तेही मनपा अधिकाºयांच्या उपस्थितीत असे निर्देश देण्यात आले. ही कारवाई थांबविण्यात आल्यामुळे परिसरातली डॉ. रत्नकुमार मुदलीयार, अरुण मिंदी, मनोज यादव यांनी समाधान व्यक्त केले.