शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर सापडल्या २०० वर्षे जुन्या ४ तोफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 17:33 IST

ऐतिहासिक वारसा असलेल्या कस्तुरचंद पार्कमध्ये चार पुरातन युद्ध तोफा बुधवारी रात्री आढळून आल्या.

ठळक मुद्देसीताबर्डीच्या लढाईत वापरल्याचा दावाइंग्रज की भोसल्यांच्या यावर संभ्रम,आणखी दारुगोळा सापडण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऐतिहासिक वारसा असलेल्या कस्तुरचंद पार्कमध्ये चार पुरातन युद्ध तोफा बुधवारी रात्री आढळून आल्या. मैदानावर सौंदर्यीकरणासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान चारही तोफा सापडल्या. या तोफा २०० वर्षे जुन्या असून भोसले व इंग्रजांमध्ये झालेल्या लढाईदरम्यान भोसल्यांकडून या तोफा वापरण्यात आल्याचा दावा केला जात आहे. शिवाय मैदानात आणखी दारूगोळा सापडण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर सध्या वॉकिंग ट्रॅक निर्मिती व वृक्षारोपणासह सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. याअंतर्गत पार्कवर खोदकाम सुरू आहे. बुधवारी रात्री मैदानात उभी असलेल्या वास्तुजवळ काम सुरू असताना अचानक या चारही तोफा आढळल्या.. सोबत तोफा ठेवण्यासाठी उपयोगात येणारे दोन स्टॅँडही होते. याबाबत पुरातत्व विभाग, महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाला सुचना करून त्या बाजुला काढून ठेवल्याची माहिती सौंदर्यीकरण कामाचे आर्किटेक्ट व हेरिटेज समितीचे सदस्य अशोक मोखा यांनी दिली. गुरुवारी या तोफा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी मैदानावर जमली होती. याबाबत मोठी उत्सुकता लोकांमध्ये दिसून येत होती.

यातील दोन तोफा दहा फुट आणि दोन साडे नउ फुटांच्या असून यांचे वजन जवळपास १००० किलोग्रॅमच्यावर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या तोफा येथे कशा आल्या संशोधनाचा विषय आहे. साधारणत: २०० वर्षापूर्वी राजे रघुजी भोसले व इंग्रजांमध्ये झालेल्या ऐतिहासिक सीताबर्डी युद्धादरम्यान या तोफा वापरण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या तोफा लांब पल्ल्याच्या असल्याने ब्रिटीशांच्या इस्ट इंडिया कंपनीकडून बनविण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र कुणाकडून वापरण्यात आल्या, याबाबत संभ्रम आहे. ब्रिटीशांनी युद्धात या तोफा वापरल्याचा दावा केला जात आहे. मात्र नागपूरचे इतिहासतज्ज्ञ भा. रा. अंधारे यांच्यानुसार भोसल्यांनी इस्ट इंडिया कंपनीकडून या तोफा विकत घेतल्या होत्या व त्यांनीच त्या युद्धात वापरल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान सैन्यदलाने या चारही तोफा ताब्यात घेत सीताबर्डी किल्ल्यामध्ये नेल्या. पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तोफांची पाहणी केली असून सविस्तर संशोधन करून त्या किती वर्षे जुन्या आहेत, कधी आणि कुठल्या तोफखान्यात बनविण्यात आल्या, याबाबत माहिती काढली जाणार असल्याचे सांगितले आहे

टॅग्स :historyइतिहास