शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात उभारले जाणार २०० मुलींचे वसतिगृह

By admin | Updated: June 10, 2016 03:00 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात नवे वसतिगृह उभारण्यात यावे, ही मागणी सातत्याने समोर येत होती.

अल्पसंख्यांक विभागाची तत्त्वत: मंजुरी : मुलांच्या वसतिगृहासाठीही सकारात्मक संकेतनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात नवे वसतिगृह उभारण्यात यावे, ही मागणी सातत्याने समोर येत होती. २०० मुली राहू शकतील या क्षमतेच्या वसतिगृहाचा मार्ग मोकळा झाला आहे. अल्पसंख्यांक विभागाने या नव्या वसतिगृहासाठी तत्त्वत: मंजुरी दिली आहे, अशी माहिती कुलसचिव पूरण मेश्राम यांनी दिली.नागपूर विद्यापीठात अल्पसंख्यांक समुदायाच्या १०० मुलींसाठी वसतिगृहाचे बांधकाम करण्याबाबत अल्पसंख्यांक विकास विभागाने १६ मे २०१६ रोजी प्रशासकीय मान्यता दिली होती. यासाठी १ कोटी रुपयांच्या पहिल्या हप्त्याचे अनुदान मंजूर केले होते. या कामाचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी अल्पसंख्यांक विकास विभागाच्या प्रधान सचिव जयश्री मुखर्जी व सहसचिव ऐनुल अत्तार यांनी विद्यापीठाला भेट दिली व त्यांनी ‘एलआयटी’ परिसरातील जागेची पाहणी केली. याशिवाय मुलांचे वसतिगृह असलेल्या गुरुनानक भवन परिसरालादेखील त्यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांशी बैठकीत चर्चा केली. कुलगुरू डॉ. काणे विदेशात असल्यामुळे ते या बैठकीला उपस्थित नव्हते. यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, कुलसचिव पूरण मेश्राम, ‘बीसीयूडी’ संचालक डॉ.डी.के.अगरवाल, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ.अनिल हिरेखण, विद्यापीठ अभियंता दत्तात्रय हरडे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता उपस्थित होते. विद्यापीठाचा विस्तार लक्षात घेता १०० ऐवजी २०० क्षमतेच्या मुलींच्या वसतिगृहास मंजुरी द्यावी. सोबतच अल्पसंख्यांक समुदायाच्या मुलांसाठीदेखील २०० क्षमतेच्या स्वतंत्र वसतिगृहासाठी मंजुरी देण्यात यावी, अशी विनंती विद्यापीठातर्फे करण्यात आली. चर्चेअंती प्रधान सचिवांनी मुलींच्या वसतिगृहाला तत्त्वत: मंजुरी प्रदान केली. १३ जून रोजी सुधारित प्रस्तावासह कार्यालयात येण्याची त्यांनी विद्यापीठ अभियंत्यांना सूचना केली. तसेच गुरुनानक भवन परिसरात २०० प्रवेश क्षमता असलेले वसतिगृह बांधण्यासाठी शासनाद्वारे अनुदान मंजूर करण्यात येईल. त्यासाठी विद्यापीठाच्या प्राधिकरणांची मंजुरी घेऊन प्रस्ताव सादर करण्यास त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)