शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बारामती ॲग्रोकडून मनपाला २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:09 IST

नागपूर : कोरोनाच्या संकटात प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार मिळावेत यासाठी अत्यावश्यक असलेले २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बारामती ॲग्रोकडून नागपूर महापालिकेला ...

नागपूर : कोरोनाच्या संकटात प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार मिळावेत यासाठी अत्यावश्यक असलेले २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बारामती ॲग्रोकडून नागपूर महापालिकेला भेट देण्यात आले आहेत. आमदार तथा बारामती ॲग्रोचे सीईओ रोहित पवार यांच्या पुढाकाराने ही मदत करण्यात आली. सोमवारी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कॉन्सन्ट्रेटर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याकडे सुपूर्द केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दुनेश्वर पेठे, नगरसेविका आभा पांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, युथ विंग अध्यक्ष शैलेंद्र तिवारी, महेंद्र भांगे, प्रेम झाडे, माजी नगरसेवक अशोक काटले, अर्चना हर्षे, श्याम मंडपे, लक्ष्मी सावरकर, कुणाल राऊत आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये उद्भवलेली परिस्थिती सावरण्यासाठी आरोग्य विभागाची चमू अहोरात्र सेवा देत आहे. मनपा प्रशासनाद्वारे आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहे. अशामध्ये सेवाभावातून नागरिकांच्या जीवासाठी केली जाणारी मदत काम करण्याची अधिक प्रेरणा देते. २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचे मनपा आयुक्त यांनी म्हटले.