शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १.९२ लाख शेतकरी वीज बिलातून थकबाकीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कृषी ग्राहकांना वीज बिलातून थकबाकीमुक्त करण्यासाठी महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या महाकृषी ऊर्जा अभियानास राज्यभरातून सकारात्मक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कृषी ग्राहकांना वीज बिलातून थकबाकीमुक्त करण्यासाठी महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या महाकृषी ऊर्जा अभियानास राज्यभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या थकबाकीमुक्ती योजनेत ८ लाख ६ हजार १०५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून, २५ मार्चपर्यंत त्यातील १ लाख ९२ हजार ५२९ शेतकऱ्यांनी मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा भरणा करून १०० टक्के थकबाकीमुक्ती मिळविली आहे. या थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना वीज बिलातून तब्बल २५५ कोटी २ लाख रुपयांची सवलत मिळाली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीज बिलातून थकबाकीमुक्ती देण्यासाठी एकूण थकबाकीमध्ये तब्बल ६६ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. त्याप्रमाणे ४४,४४,१६५ शेतकऱ्यांकडील एकूण ४५,७८७ कोटी १९ लाखांच्या एकूण थकबाकीमध्ये १०,४२१ कोटी रुपयांची निर्लेखनाद्वारे सूट देण्यात आली आहे तर, ४,६७२ कोटी ८१ लाख रुपयांची व्याज व विलंब आकारामध्ये सूट देण्यात आली आहे. या योजनेनुसार कृषी ग्राहकांकडे ३० हजार ६९३ कोटी ५५ लाख रुपयांची सुधारित मूळ थकबाकी आहे. त्यापैकी पहिल्या वर्षात ५० टक्के थकबाकी भरल्यास वीज बिल कोरे करण्याची शेतकऱ्यांना संधी आहे. सोबतच शेतकऱ्यांच्या थकीत व चालू वीज बिलांद्वारे भरणा झालेल्या रकमेपैकी प्रत्येकी ३३ टक्के निधी हा संबंधित ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रात कृषी वीज यंत्रणेच्या सक्षमीकरण व विस्तारीकरणासाठी वापरण्याची तरतूद करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत राज्यातील १ लाख ९२ हजार ५२९ शेतकऱ्यांनी चालू व थकीत वीज बिलांपोटी ३३० कोटी ४२ लाख रुपयांचा भरणा करून वीज बिलातून संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळविली आहे. राज्यभरात आतापर्यंत ८ लाख ६ हजार १०५ शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्तीसाठी या अभियानात सहभाग नोंदविला आहे. त्यांनी कृषिपंपाच्या थकीत व चालू वीज बिलापोटी ७४१ कोटी ४ लाख रुपयांचा भरणा केला आहे.

राज्यातील विभागनिहाय थकबाकीमुक्त झालेले शेतकरी

विभाग थकबाकीमुक्त शेतकरी

पुणे ८४,४५५,

कोकण ६८,०६७,

नागपूर ३०,२१९

औरंगाबाद ९,७८८