नासुप्रची कारवाई : रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा नागपूर : चिखली देव येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामातील अडथळा दूर करण्यासाठी नासुप्रच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी १९ घरांच्या भिंतीवर हातोडा चालविला. मौजा चिखली देव भागातील खसरा क्रमांक ९/२ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाऊ सिंग सोसायटी येथील रस्त्यांच्या जागेवर संरक्षण भिंती उभारल्याने काम थांबले होते. दोन महिन्यांपूर्वी काही घरांच्या संरक्षण भिंती तोडण्यात आल्या होत्या. परंतु इतरांना अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. परंतु त्यानंतरही अतिक्रमण कायम असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी नासुप्रकडे केली होती. त्यानुसार शाखा अभियंता अश्विन तामगाडगे, पथक प्रमुख वसंत कन्हेरे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.(प्रतिनिधी) पार्किंगच्या जागेवरील अतिक्रमण हटविले ४महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी धरमपेठ झोनमधील गोकुळपेठ येथील सौजन्य अपार्टमेन्टच्या पार्किंगच्या जागेतील अतिक्रमण हटविले. अपार्टमेन्टमधील भरत जोग यांनी फ्लॅट लगतच्या पार्किंगच्या जागेत टिनाचे शेड उभारले होते. यासंदर्भात फ्लॅटधारकांनी झोन कार्यालयाकडे तक्रार केली होती. परंतु त्यानंतरही कारवाई न केल्याने मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयाकडे तक्रार केली होती. सचिवालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. तसेच रामनगर चौकातील प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या भंगार दुकानाचे अतिक्रमण हटविण्यात आले. पथकाने दोन ट्रक भंगार जप्त केले. झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, प्रवर्तन अधीक्षक राजेश मेश्राम यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. एकीकडे कारवाई दुसरीकडे अतिक्रमण ४महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाची सोमवारी मेडिकल चौकात कारवाई सुरू असतानाच मेडिकल क्वॉर्टरच्या रस्त्यावर विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. चौकात कारवाई सुरू असतानाच दुसरीकडे विक्रे त्यांचे अतिक्रमण होत असल्याचा प्रकार निदर्शनास आला. मेडिकल कॉलेजच्या मुख्यप्रवेशद्वाराच्या बाजूला असलेले चिकन सेंटर, फळ विक्रेते व हातठेल्यांचे अतिक्रमण हटविण्यात आले. कारवाईमुळे विक्रेत्यांची धावपळ सुरू होती. या चौकात कारवाई सुरू असल्याने विक्रेत्यांनी दुसरीकडे आपली दुकाने थाटली होती.
१९ घरांच्या संरक्षण भिंतीवर हातोडा
By admin | Updated: November 8, 2016 02:55 IST