शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

१८१ शाळांवर कारवाईचा हातोडा

By admin | Updated: May 14, 2015 02:35 IST

‘आरटीई’अंतर्गत (राईट टू एज्युकेशन) आरक्षित असलेल्या २५ टक्के जागांवर प्रवेश नाकारणाऱ्या १८१ शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे.

नागपूर : ‘आरटीई’अंतर्गत (राईट टू एज्युकेशन) आरक्षित असलेल्या २५ टक्के जागांवर प्रवेश नाकारणाऱ्या १८१ शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे. २९१ शाळांना शिक्षण उपसंचालकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यातील केवळ ११० शाळांनी उत्तरे दिली आहेत. उर्वरित शाळांवर मान्यता रद्द करणे किंवा ना हरकत प्रमाणपत्र रद्द करणे अशी कारवाई करण्यात येणार आहे.‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेत ‘आॅनलाईन’ सोडतीत क्रमांक लागलेल्या मुलांना प्रवेश देण्यासाठी शाळा टाळाटाळ करीत होत्या. अनेक नामांकित शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिला आहे. कोणी ‘एन्ट्री पॉईन्ट’चे कारण दाखविले तर अनेकांनी पालकांकडून विविध नावांखाली शुल्काची मागणी केली आहे. अखेर मुख्यमंत्र्यांनी अशा शाळांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. शिक्षण उपसंचालकांनी ११ मे रोजी २९१ शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटीशीला उत्तर देण्याची १३ मे ही अखेरची मुदत होती. यात केवळ १०६ शाळांनी उत्तर दिले आहेत. ज्या शाळांनी उत्तर दिलेले नाही त्यात शहरातील नामांकित शाळांचा समावेश आहे. या शाळांवर आता कारवाई करण्यात येणार आहे. ‘सीबीएसई’च्या शाळांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ काढून घेण्यात येईल तर राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांची मान्यता रद्द करण्यात येईल अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी या आशयाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)३५ शाळा देणार नर्सरीपासून प्रवेशनोटिशीला दिलेल्या उत्तरानुसार ३९ शाळा या नर्सरी तसेच पहिली इयत्तेपासून प्रवेश देण्यास तयार झाल्या आहेत. ७१ शाळा या फक्त पहिलीपासूनच प्रवेश देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ज्या शाळा प्रवेश देताना शुल्काची मागणी करतील त्यांची माहिती पुरविण्याचे आवाहन ‘आरटीई अ‍ॅक्शन कमिटी’चे अध्यक्ष शाहिद शरीफ यांनी केले आहे.पालकांचा शिक्षणाधिकाऱ्यांना घेरावदरम्यान, ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेत क्रमांक लागलेल्या पाल्यांना प्रवेश द्यावा या मागणीसाठी बुधवारी दुपारी पालकांनी प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिल कोल्हे यांना घेराव घातला. कोल्हे यांनी पालकांची समजूत काढण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र, काही पालकांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. अखेर तणाव शांत करण्यासाठी पोलिसांना बोलविण्यात आले.