शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषदेसाठी १८ कोटींचा निधी मंजूर

By admin | Updated: September 1, 2016 03:12 IST

जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतीतील विकासकामांसाठी १४ व्या केंद्रीय वित्त आयोगातून १८ कोटी ६ लाख ३३ हजार १८७ रुपये मंजूर करण्यात आले आहे.

१४ वा वित्त आयोग : कामठीला मिळणार सर्वाधिक सव्वातीन कोटीनागपूर : जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतीतील विकासकामांसाठी १४ व्या केंद्रीय वित्त आयोगातून १८ कोटी ६ लाख ३३ हजार १८७ रुपये मंजूर करण्यात आले आहे. हा निधी वितरित करण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निधी मिळण्याकरिता प्रयत्न केले. या निधीमुळे जिल्ह्यातील नगर पंचायती व नगर परिषदांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. १४ व्या वित्त आयोगातून नागपूर जिल्ह्यातील कामठी नगर परिषदेला ३ कोटी २२ लाख ८७ हजार, रामटेक पालिकेला ८६ लाख ४ हजार ७२०, नरखेडला ८२ लाख २४ हजार ४१०, काटोलला १ कोटी ८२ लाख ९६ हजार ८६०, उमरेडला २ कोटी ७ लाख आठ हजार, सावनेरला १ कोटी २२ लाख ९३ हजार, कळमेश्वरला ८९ लाख ९६ हजार ३८५, मोहप्याला २७ लाख ४६ हजार, मोवाडला ४० लाख ४४ हजार, कन्हानला १ कोटी ८ लाख ८ हजार, वाडीला २ कोटी ४ लाख २६ हजार, खापा नगर परिषदेला ४७ लाख ४९ हजार रुपये मंजूर करण्यात आले. यासोबतच महादुला नगर पंचायतीला ८२ लाख ९३ हजार, कुही नगर पंचायतीला ४८ लाख ३३ हजार, हिंगणा नगर पंचायतीला ३७ लाख २४ हजार, भिवापूर नगर पंचायतीला ५० लाख २८ हजार निधी मंजूर झाला. जिल्ह्यातील १२ नगर परिषदा आणि पाच नगर पचायतींना १४ व्या वित्त आयोगातून एकूण १८ कोटी ६ लाख ३३ हजार १८७ रुपये विविध विकासकामांसाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे तेथील विकासकामांना आता चालना मिळणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)