शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

१८ वरून ८० कोटी!

By admin | Updated: November 24, 2015 06:04 IST

प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे निर्धारित कालावधीत काम पूर्ण न केल्याने महापालिकेच्या सिव्हिल लाईन येथील

नागपूर : प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे निर्धारित कालावधीत काम पूर्ण न केल्याने महापालिकेच्या सिव्हिल लाईन येथील मुख्यालयाच्या नवीन नऊ मजली इमारतीचा खर्च सुरुवातीला १८ कोटी तर आता ५६ कोटीवरून ८० कोटीवर गेला आहे. काम वाढीव मुदतीतही पूर्ण न झाल्यास हा खर्च १०० कोटीवर जाण्याची शक्यता महापालिकेतील काही कंत्राटदारांनी व्यक्त केली आहे. सल्लागार व कंत्राटदार यांच्या वादात या इमारतीचे काम रखडले. प्रशासनानेही यावर वेळीच तोडगा काढला नाही. नवीन प्रशासकीय छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु अंतर्गत सजावट व फर्निचरची कामे अपूर्णच आहे. त्यामुळे नऊ मजल्याच्या या इमारतीतील दोन मजल्यावर कार्यालये सुरू झाली असून इतर मजले अद्याप रिकामे आहेत. इमारतीच्या तळमजल्यावर वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या मजल्यावर २०१२ मध्ये महापालिका आयुक्त, अग्निशमन विभाग, अप्पर आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यालये आली. वरच्या मजल्यावर वित्त विभाग आला. परंतु या मजल्याचे फर्निचरचे काम अद्याप अपूर्ण आहे. २०१३ मध्ये ही इमारत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु दोन मजल्याचेच अंतर्गत काम पूर्ण करण्यात आले आहे. इतर मजल्याचे काम अपूर्ण असल्याने ही इमारत रिकामी पडून आहे. खर्च १०० कोटीवर जाणार?४नवीन इमारतीचे काम वेळेत पूर्ण झाले असते तर यावर १८ कोटी खर्च झाले असते. विलंब झाल्याने १८ कोटीचा खर्च ८० कोटीवर गेला आहे. कंत्राटदार सक्रिय नसल्याने व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा खर्च वाढला आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता वाढीव मुदतीत काम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हा खर्च १०० कोटीवर जाण्याची शक्यता आहे.