शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिकाच्या खात्यातून उडवले १६ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : धंतोलीतील एका व्यावसायिकाच्या नावाने सायबर गुन्हेगारांनी बँकेत फोन करून त्यांच्या खात्यातील सोळा लाख रुपये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : धंतोलीतील एका व्यावसायिकाच्या नावाने सायबर गुन्हेगारांनी बँकेत फोन करून त्यांच्या खात्यातील सोळा लाख रुपये परस्पर ट्रान्सफर करून घेतले. ८ एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर बुधवारी प्रतापनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. प्रकाश जैन (वय ७०)असे फिर्यादी व्यावसायिकांचे नाव आहे. ते ऑटो एजन्सीचे संचालक आहेत. पंजाब नॅशनल बँकेच्या खामला शाखेत जैन यांचे बँक खाते आहे. ८ एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजता बँकेत जैन यांच्या नावाने दुसऱ्याच एका व्यक्तीने फोन केला आणि १६ लाख पाच हजार रुपयांची रक्कम दोन वेगवेगळ्या खात्यात जमा करण्यास सांगितले. त्यानुसार बँक अधिकाऱ्यांनी ही रोकड त्या बँक खात्यात जमा केली. बुधवारी हा प्रकार उघडकीस आला. जैन यांनी बँक अधिकाऱ्यांकडे यासंबंधाने विचारणा केली असता त्यांनी आम्हाला तुमचाच फोन आला होता म्हणून आम्ही बँकेत त्या खात्यात रक्कम जमा केली, असे सांगितले. जैन यांनी फोन केलाच नव्हता असे सांगितले असता अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले. त्यामुळे अखेर जैन यांनी प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला

---

बँक अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा

या प्रकरणात बँक अधिकाऱ्यांचाही दोष असल्याचे पोलिसांचे मत आहे. एवढी मोठी रक्कम दुसऱ्या खात्यात वळती करताना पुरेशी काळजी बँक अधिकाऱ्यांनी का घेतली नाही, असा प्रश्न आहे. त्यामुळे पोलीस संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी करणार आहेत.

--

बिहारचे गुन्हेगार !

प्राथमिक तपासानुसार जैन यांच्या खात्यातून वळती करण्यात आलेली रक्कम बिहारच्या बँक खात्यात जमा झाल्याचे समजते.

----