शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

१६ राज्य पालथे घालत स्वच्छतावारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 01:15 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला गावोगाव पोहोचविण्याच्या उद्देशाने प. बंगालमधील जयदेवने सहा महिन्यापूर्वी घरदार सोडले. १६ राज्य पालथे घालत स्वच्छतेचा प्रचार-प्रसार केला.

ठळक मुद्देजयदेवचे नागपुरात आगमन : वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही मुकला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला गावोगाव पोहोचविण्याच्या उद्देशाने प. बंगालमधील जयदेवने सहा महिन्यापूर्वी घरदार सोडले. १६ राज्य पालथे घालत स्वच्छतेचा प्रचार-प्रसार केला. गाव स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला. वाटेतच वडिलांच्या मृत्यूची बातमी त्याला कळली. परंतु कोसोदूर गाव असल्यामुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही मुकण्याची पाळी या स्वच्छतेचा संदेश देणाºया स्वच्छतादूतावर आली.पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील चाबदानी येथील जयदेव उद्धव राऊत (४७) हा ज्यूट मिलमध्ये कामगार म्हणून कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत अभियान गावोगाव पोहोचविण्याची खूणगाठ त्याने मनाशी बांधली. अंगावरील कपडे आणि सायकलसह तो पत्नी अन् मुलीचा निरोप घेऊन घराबाहेर पडला. मिलमधून सहा महिन्याची सुटीही त्याने मॅनेजरकडून मिळविली. २६ फेब्रुवारी २०१७ रोजी त्याने सुरू केलेला प्रवास आजपर्यंत सुरू आहे. सायंकाळी भाजप कार्यालयात जाऊन भेट देणे, कुणी भोजनाची व्यवस्था केलीच तर ठीक नाही तर आपल्याच पैशाने काही तरी खाऊन झोपी जायचे अन् सकाळी पुढील प्रवासाला निघायचे असाच जयदेवचा दिनक्रम मागील सहा महिन्यापासून आहे. ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब, जम्मू, हिमालच प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या मार्गाने तो नागपुरात दाखल झाला. जयदेव ३० जूनला चंदीगडमध्ये असताना त्याला वडिलांचा मृत्यू झाल्याची बातमी कळाली. परंतु जवळ पैसे नसल्यामुळे आणि घरापासून कोसोदूर असल्यामुळे तो अंत्यसंस्कारालाही जाऊ शकला नाही.नागपुरातून तो छत्तीसगडमध्ये जाणार आहे. घरदार सोडून स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी जयदेवने सुरू केलेली वारी रस्त्यावर कचरा फेकणाºयांच्या डोळ्यात अंजन घालणारीच आहे. त्याच्या मोहिमेपासून नागरिकांनी पुढाकार घेऊन आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे ठरविल्यास, ते त्याच्या मोहिमेचे फलित ठरणार आहे.