शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

अजनी रेल्वे पुलाचा १३८ कोटीचा प्रस्ताव

By admin | Updated: December 14, 2015 03:16 IST

अजनी रेल्वे पुलाच्या ठिकाणी जुन्या पुलाऐवजी दोन पदरी नवीन पूल बांधण्याबाबत महापालिकेने रेल्वे विभागाशी पत्रव्यवहार केला आहे.

महापालिकेकडून तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती : मुख्यमंत्र्यांची माहितीनागपूर: अजनी रेल्वे पुलाच्या ठिकाणी जुन्या पुलाऐवजी दोन पदरी नवीन पूल बांधण्याबाबत महापालिकेने रेल्वे विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. यासाठी महापालिकेने तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती केली असून या पुलाचा १३८ कोटीचा प्रस्ताव तयार केला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी लेखी प्रश्नाच्या उत्तरात विधानपरिषदेत दिली. नागपूर शहरातील लोखंडी पूल व अजनी पूल या ब्रिटिशकालीन पुलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. असे असले तरी रेल्वे विभागाकडून केलेल्या तपासणी अहवालात हे पूल सुस्थितीत असल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय अभियंता यांनी कळविले आहे. लोखंडी पुलाचे बांधकाम १९२१ साली तर अजनी रेल्वे पुलाचे बांधकाम १९२७ साली करण्यात आले आहे. या दोन्ही पुलाला पर्यायी व्यवस्था महापािलकेकडून करण्यात येत आहे. लोखंडी पुलापासून १५० मीटर अंतरावर आंनद टॉकीजजवळ चारपदरी भुयारी रेल्वे पुलाचे काम करण्यात आले आहे. या पुलाखालून वाहतूक सुरू आहे. त्यामुळे लोखंडी पुलाखालून होणारी वाहतूक कमी झाल्याची माहिती फडणवीस यांनी लेखी उत्तरात दिली. सदस्य अनिल सोले, नागो गाणार व नितीश भांगडिया आदींनी हा प्रश्न उपस्थित केला होता.(प्रतिनिधी)