शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

आयकर विभागाची १२०० कोटींवर नजर

By admin | Updated: February 17, 2017 03:00 IST

नोटाबंदीदरम्यान कर चुकवेगिरी करून रक्कम मोठ्या प्रमाणात जवळ बाळगणाऱ्या लोकांवर आयकर विभागाची लवकरच कारवाई होणार आहे.

मूल्यांकन प्रक्रिया : कारवाई होणारराघवेंद्र तिवारी   नागपूर नोटाबंदीदरम्यान कर चुकवेगिरी करून रक्कम मोठ्या प्रमाणात जवळ बाळगणाऱ्या लोकांवर आयकर विभागाची लवकरच कारवाई होणार आहे. यासाठी विभागाची तयारी जोरात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटाबंदी केल्यानंतर सरकारने पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा ३० डिसेंबर २०१६ पर्यंत बदलविण्याची आणि बँकेत जमा करण्याची मुदत दिली होती. लोकांनी बँकांमधील मोठ्या रांगांमध्ये उभे राहून रक्कम जमा केली होती. अनेकांनी दुसऱ्याच्या खात्यात जुन्या नोटा जमा केल्याचा संशय आयकर विभागाला आहे. अशा प्रकारे विदर्भात दुसऱ्याच्या खात्यात जवळपास १२०० कोटींची रक्कम जमा झाल्याची माहिती आहे. ही रक्कम कर चुकवेगिरी करणाऱ्यांची असल्याचा विभागाचा अंदाज आहे. करचोरी करून रक्कम जवळच ठेवणाऱ्यांविरुद्ध सरकार कारवाई करणार असल्याची माहिती आयकर विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. जुन्या नोटा बदलविण्याची मुदत संपल्यानंतर आयकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. या प्रक्रियेत विभाग खासगी, सहकारी व राष्ट्रीयकृत बँका आणि पोस्ट कार्यालयातून आकडे गोळा करीत आहे. सरकारने अर्थसंकल्पात आयकरचा टप्पा वाढून लोकांना सवलत दिली आहे, तर दुसरीकडे मोठ्या कर चुकवेगिरी करणाऱ्यांवर नियंत्रण आणत आहे. या प्रक्रियेला सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतरच करचोरांवर कारवाई होऊ शकते.