शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

अन्सारी विरोधात १२ फौजदारी प्रकरणे

By admin | Updated: August 13, 2016 02:10 IST

रेती माफिया लतिफ अन्सारीविरुद्ध भादंविच्या ३०२, ३०७, ३५३, ३९४, ३७९ कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.

नागपूर : रेती माफिया लतिफ अन्सारीविरुद्ध भादंविच्या ३०२, ३०७, ३५३, ३९४, ३७९ कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध १२ फौजदारी प्रकरणे आहेत. नुकताच त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. लतिफ अन्सारी हा अन्य एका गुन्ह्यात अटकेत होता. कारागृहात असताना १० आॅगस्ट रोजी त्याला अटकपूर्व जामीन आदेशानुसार सकाळी ११ वाजता मोठ्या गडबडीने सोडण्यात आले. हा नियमबाह्य प्रकार नियमानुसारच आहे, हे दाखवण्यासाठी त्याच्यासोबतच अन्य गुन्ह्यातील आरोपींनाही सोडण्यात आले. कारागृहाच्या ‘रिहाई रजिस्टरवर’ सकाळी ११ वाजता लतिफ अन्सारी याला सोडण्यात आल्याची नोंद आहे. उल्लेखनीय म्हणजे अन्सारी हा १० रोजी कारागृहाबाहेर पडल्यानंतर ११ आॅगस्ट रोजी उच्च न्यायालयाने त्याचा मकोका अंतर्गतचा जामीन आदेश फेटाळलेला आहे. आणखी एक मजेदार बाब म्हणजे १० आॅगस्ट रोजी लतिफ अन्सारी हा नियमानुसार दुपारी १ वाजता कारागृहाबाहेर पडेल म्हणून पोलीस पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी कारागृहाच्या प्रवेशद्वारासमोर दबा धरून होते. परंतु त्याला ११ वाजताच सोडण्यात आल्याचे समजताच पथकाला माघारी परत जावे लागले. आता अन्सारी सहजरीत्या पोलिसांच्या हाती लागणे मुश्कील आहे. अन्सारीला दोन तास आधीच सोडण्यामागे मोठ्या गैरव्यवहाराची शंका व्यक्त केली जात आहे. लतिफ मोहम्मद हाफिज अन्सारी हा मूळचा खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वलनी खदान येथील रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे प्रलंबित असल्याने उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्याच्यासोबतच मोहम्मद लईक मोहम्मद हाफिज अन्सारी, संजय भगत, प्रसाद वर्मा आणि प्रमोद खोजरे हे आरोपी आहेत. उच्च न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील एस. जे. कडू तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. आर. के. तिवारी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी) ‘तो नियमभंग नव्हे, तरीही चौकशी’ लतिफ अन्सारी याला दोन तास आधीच कारागृहातून सोडण्याचा प्रकार हा नियमभंग नव्हे, तरीही नेमके काय घडले याबाबत चौकशी केली जाईल, असे कारागृह अधीक्षक योगेश देसाई हे प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले. देसाई हे गेल्या चार-पाच दिवसांपासून अवकाशावर आहेत. त्यांच्या गैरहजेरीत हा प्रकार घडलेला आहे.