शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

ग्वालबन्सी विरुद्ध ११ वा गुन्हा दाखल

By admin | Updated: May 4, 2017 02:18 IST

भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध पोलिसांनी ११ वा गुन्हा दाखल केला आहे.

 नागपूर : भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध पोलिसांनी ११ वा गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी आपल्या जमिनीचा ताबा घेत असलेल्या सचिन सोसायटीच्या प्लॉटधारकांचा ग्वालबन्सी परिवारातील महिला सदस्यांशी वाद झाला. काही काळानंतर येथे तणाव निर्माण झाला. ही घटना झिंगाबाई टाकळी येथील आहे. यातील आरोपी दिलीप ग्वालबन्सी, पप्पू यादव, जॉन अन्थोनी आणि त्यांचे सात ते आठ साथीदार आहेत. सैफुल्ला सय्यदची झिंगाबाई टाकळीत जमीन आहे. या जमिनीवर आरोपींनी ताबा मिळविला. सय्यद आणि इतर प्लॉटधारक जेंव्हा जमिनीवर जायचे तेंव्हा आरोपी त्यांना रोखायचे. आरोपींनी त्यांना तीन-तीन लाख द्या अन्यथा जमीन सोडून द्या अशी धमकी देणे सुरू केले होते. बऱ्याच कालावधीपासून हा वाद सुरू होता. सय्यदने कोराडी ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. त्या आधारे पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. आता ग्वालबन्सी विरुद्ध ११ गुन्हे दाखल झाले आहेत. याच दरम्यान दाभाच्या सचिन सोसायटीचे प्लॉटधारक आज सकाळी जमिनीचा ताबा घेण्यासाठी गेले. याची माहिती मिळताच ग्वालबन्सी परिवारातील महिला तेथे पोहोचल्या. त्यांनी प्लॉटधारकांना जमीन आमच्या मालकीची असल्याचे सांगितले. त्यांनी प्लॉटधारकांना ताबा घेण्यास मनाई केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. महिलांनी सदरचे सहायक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांची भेट घेतली. (प्रतिनिधी)