रोजगारनिर्मिती होणार : एकाच ठिकाणी सर्वप्रकारच्या सुविधानागपूर : नागपूर शहरात मेट्रो रेल्वे, मिहान, कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, आयआयटी, सिम्स यासारखे विकास प्रकल्प उभे राहत आहेत. यासोबतच वर्धा मार्गालगत ५.५ किलोमीटर लांबीच्या पट्ट्यात महापालिकेचा महत्त्वाकांक्षी आॅरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाचा १० टप्प्यात विकास केला जाणार आहे.या प्रकल्पाच्या माध्यमातून एकाच ठिकाणी सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध होणार आहते. यातून शहर विकासाला गती मिळण्यासोबतच मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे. या प्रकल्पावर ३५०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पात हॉटेल्स, वैद्यकीय सुविधा, स्वस्त घरे, मध्यमवर्गीय व उच्च उत्पन्न गटातील लोक ांसाठी घरे, दोन हेक्टर क्षेत्रात व्यावसायिक विकास, बगीचे, क्रीडांगण, सार्वजनिक वापरासाठी मोकळ्या जागा, भाजीबाजार, मॉल, पार्किंग सुविधा आदींचा यात समावेश आहे. (प्रतिनिधी)रस्त्याच्या दुतर्फा बाजारलंडनच्या धर्तीवर रस्त्यांच्या दुतर्फा बाजाराची संकल्पना या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्णत्वास येणार आहे. रस्त्यावरून चालताना ग्राहकांना आवश्यक वस्तूंची खरेदी करता यावी, अशा स्वरूपाची या प्रकल्पाची रचना के ली जाणार आहे. या बाजाराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. ५.५ किलोमीटर लांबीचा प्रकल्पहॉटेल रेडिसन ब्ल्यू चौकापासून थेट जयताळा-हिंगणा या दरम्यानच्या मार्गावर हा जागतिक दर्जाचा गृह प्रकल्प (आॅरेंज सिटी स्ट्रीट) तयार करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. याचा आराखडा हफीज कॉन्ट्रॅक्टर यांनी तयार केला असून, या प्रकल्पाची लांबी तब्बल ५.५. किलोमीटर आहे.मॉलची निर्मिती मॉल संस्कृतीला मिळणारा प्रतिसाद विचारात घेता आॅरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पात मॉलसाठी जागा उपलब्ध केली जाणार आहे. या माध्यमातून नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात येतील. भाजीबाजारशहराच्या विकासासोबतच नागरिकांच्या दैनंदिन गरजा विचारात घेता या प्रकल्पात भाजीबाजारासाठी जागा उपलब्ध केली जाणार आहे. याचा लाभ या परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना मिळणार आहे.क्रीडांगणाची सुविधा शहराच्या विविध भागात क्रीडांगणे आहेत. परंतु वर्धा मार्गावरील नागरिकांच्या सुविधा विचारात घेता आॅरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पात क्रीडांगणाचा समावेश करण्यात आला आहे. येथे अत्याधुनिक क्रीडांगण उभारण्याचे प्रस्तावित आहे.उद्याननिर्मिती कोणत्याही भागाचा विकास हा उद्यानाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता आॅरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पात उद्यानासाठी जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. मोनो अथवा स्मॉल ट्रेन आॅरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम व्हावा, यासाठी हा प्रकल्प मेट्रोला जोडल्यास काय फायदे होतील, मेट्रो आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल की यावर फेरविचार करावा लागेल, याचा विचार सुरू आहे. मेट्रो उभारण्याचा खर्च प्रचंड असल्याने त्याऐवजी मोनो अथवा स्मॉल ट्रेन हा पर्याय निवडला जाणार आहे. स्वस्तात घरेया प्रकल्पाच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे. मध्यम व उच्च उत्पन्न गटातील लोकांसोबतच अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी स्वस्तात घरे उभारली जाणार आहेत. निवासी प्रकल्प दोन टप्प्यात राबविला जाणार आहे.वैद्यकीय सुविधाशहराचा होत असलेला विकास लक्षात घेता नागरिकांना चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आॅरेंज सिटी स्ट्रीट येथे अत्याधुनिक सुविधा असलेली रुग्णालये उभारली जाणार आहेत. यासाठी जागा उपलब्ध केली जाणार आहे. पंचतारांकित हॉटेल्सया प्रकल्पात पंचतारांकित हॉटेल्सचा समावेश आहे. या ठिकाणी सुसज्ज अशाप्रकारचे हॉटेल्स उभारण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी हॉटेल्स व्यावसायिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
आॅरेंज सिटी स्ट्रीटचा १० टप्प्यात विकास
By admin | Updated: October 27, 2016 02:40 IST