शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

नागरिकत्व संशोधन विधेयकाचे नागपुरातून १० हजार लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 10:47 IST

नागपुरातील दहा हजारांसह संपूर्ण राज्यातील जवळपास २५ लाखांहून अधिक लोकांना या विधेयकामुळे फायदा होईल, असा दावा भारतीय सिंधू सभेचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी केला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयात ६०० अर्ज विचाराधीनशिबिरांचे आयोजन करणार भारतीय सिंधू सभा

कमल शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संसदेत नागरिकत्व संशोधन विधेयक संमत झाल्यानंतर नागपुरातील सुमारे दहा हजार लोकांना याचा लाभ होणार आहे. १९५१ नंतर पाकिस्तानातून भारतात आलेले परंतु नियमांच्या फेऱ्यात अडकल्याने नागरिकतेपासून वंचित राहिलेले हे लोक आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातदेखील यासंदर्भात ६०० अर्ज विचाराधीन आहेत. भारतीय सिंधू सभेने अशा सर्व लोकांना नागरिकत्व मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विधेयकावर राष्ट्रपतींचे हस्ताक्षर झाल्यावर यासंदर्भात ‘जीआर’ जारी होईल व लगेच सभेकडून शिबिर आयोजित करण्यात येईल.नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले बहुतांश लोक जरीपटका, वर्धमाननगर, खामला तसेच उत्तर व पूर्व नागपुरातील विविध भागांमध्ये राहत आहेत. यातील ६०० लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आतापर्यंत प्रचलित असलेल्या नियमांंतर्गत नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी अर्ज केले आहेत. अद्याप ‘जीआर’ आलेला नसल्यामुळे जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात प्रतिक्रिया दिलेली नाही. नागपुरातील दहा हजारांसह संपूर्ण राज्यातील जवळपास २५ लाखांहून अधिक लोकांना या विधेयकामुळे फायदा होईल, असा दावा भारतीय सिंधू सभेचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी केला आहे. या लोकांच्या मदतीसाठी नागपूरसह मुंबई, ठाणे, उल्हास नगर, कल्याण, पुणे, कोल्हापूर इत्यादी शहरांत शिबिर आयोजित करण्यात येतील. नागरिकत्व नसलेल्यांमध्ये सर्वात जास्त संख्या महिला व ज्येष्ठ नागरिकांची आहे. त्यांना केंद्र शासनाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सिंधी समाजातील सर्व पंचायतींनी या विधेयकाचे स्वागत केले आहे. शिबिराच्या तयारीसाठी राजेश जांबिया, पी.डी. केवलरामानी, घनश्याम कुकरेजा, वलीराम सहजरामानी, हरीश देवानी, राजेश बटवानी, संजय वासवानी, विजय केवलरामानी, डॉ. विंकी रुघवानी, दर्शन वीरवानी, ओमप्रकाश छावलानी, राज कोटवानी इत्यादींनी प्रयत्न सुरू केले आहेत.

आतापर्यंत किचकट होते नियमभारताचे नागरिकत्व मिळविण्यासाठी अतिशय किचकट असे नियम होते. यासंदर्भात १९५५ मध्ये कायदा बनला होता. यानुसार १९५१ च्या अगोदर पाकिस्तान तसेच बांगलादेशमधून (तेव्हाचे पूर्व पाकिस्तान) आलेल्या लोकांना नागरिकत्व घेण्याची संधी मिळाली.मात्र त्यानंतर आलेले लोक संकटात अडकले. परंतु आणखी लोकांचे येणे सुरुच होते.सात वर्ष वैध माध्यमातून भारतात राहणारी व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकतो असा २०११ मध्ये नियम बनला. परंतु यातील अनेक लोकांच्या पासपोर्टचा कालावधीच संपला होता. त्यामुळे त्यांना अगोदर पाकिस्तानमध्ये जाऊन पासपोर्ट ‘रिन्यू’ करणे आवश्यक होते. ते त्यांच्यासाठी अशक्य होते.

‘लाँग टर्म व्हिजा’वर राहत आहेत अनेकजणकुकरेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपुरातील ज्या दहा हजार लोकांना या विधेयकामुळे लाभ होईल, त्यातील बहुतांश लोक ‘लाँग टर्म व्हिजा’वर देशात राहत आहेत. नियमानुसार भारताचे नागरिकत्व मिळविण्यासाठी सात वर्ष भारतात राहणे अनिवार्य आहे. बºयाच लोकांचा ‘व्हिजा’देखील संपला आहे. मात्र ते परत त्यांच्या देशात परतले नाहीत. विधेयक मंजूर झाल्याने अशा लोकांना थेट लाभ पोहोचणार आहे.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक