शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By admin | Updated: July 11, 2016 02:50 IST

दहावीत शिकत असलेल्या एका शाळकरी मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली.

हुडकेश्वर खुर्द येथील घटना : विष प्राशन केलेनागपूर : दहावीत शिकत असलेल्या एका शाळकरी मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली. शनिवारी ९ जुलैला ही घटना उघडकीस आली. उज्ज्वला राजेंद्र गवळी (वय १५) असे तिचे नाव आहे. ती पिपळा फाटा, हुडकेश्वर खुर्द गावात राहात होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. उज्ज्वला, तिचे वडील आणि भाऊ असे तिघेच जण गवळी कुटुंबात आहेत. तिचे वडील ग्रामपंचायतमध्ये कार्यरत आहेत. मोठा भाऊ राजेश (वय १७) शिक्षणासोबतच खासगी काम करतो. उज्ज्वला भूपेंद्र विद्यालयात दहावीत शिकत होती. ७ जुलैला ती सायंकाळी शाळेतून घरी आली आणि अस्वस्थ वाटत असल्याने झोपली. सायंकाळी ५.३० ला राजेश घरी आला तेव्हा त्याला उज्ज्वला उलटी करताना दिसली. तिच्या तोंडातून फेस येत होता. ते पाहून त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने उज्ज्वला मेडिकलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना ९ जुलैच्या पहाटे ५.२० वाजता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणाची चौकशी करून हुडकेश्वरचे उपनिरीक्षक संदीप गवई यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. (प्रतिनिधी)चार वर्षांपूर्वी आईची आत्महत्या उज्ज्वलाने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली ते स्पष्ट झाले नाही. त्यामुळे परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत्यूपूर्वी तिने चिठ्ठी वगैरेही लिहून ठेवली नाही. चार वर्षांपूर्वी अशाच प्रकारे तिच्या आईने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. तेव्हापासून घरकामाचा भार उज्ज्वलावर आला होता. त्यामुळे ती काहीशी दडपणात राहत होती. याच कारणामुळे तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज निकटवर्तीयांकडून बांधण्यात येत आहे.