शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

१०० टक्के लसीकरण करणाऱ्या नगरसेवकाला १० लाखाचा पुरस्कार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या वाॅर्डात संपूर्ण लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण करणाऱ्या नगरसेवकाला कार्यासाठी अतिरिक्त १० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या वाॅर्डात संपूर्ण लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण करणाऱ्या नगरसेवकाला कार्यासाठी अतिरिक्त १० लाख रुपयांचा पुरस्कार देण्याची घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी केली.

प्रभावती ओझा स्मृती सेवा संस्था, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, विदर्भ टॅक्स पेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रामदासपेठ येथील एका हॉटेलमध्ये आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे ऑनलाईन सहभागी झाले होते. पालकमंत्री म्हणाले, राज्य शासन असो वा जिल्हा प्रशासन सर्वोच्च प्राथमिकता सामान्य माणसाच्या जीवाची काळजी घेणे आहे. व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊनच लॉकडाऊन व निर्बंधासंदर्भात निर्णय घेण्यात आला. संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे.

२०० ॲम्ब्युलन्सचे वाटप करण्यात आले आहे. मेडिकल, मेयो, एम्स येथे पीएससी प्लांट उभारणे अंतिम टप्प्यात आहे. पीएम केअरमधून मेडिकलमध्ये आणि कामठीमध्ये प्लांट उभारणे प्रगतिपथावर आहे. सध्या ३,२२६ बेड उपलब्ध आहेत. कॉल सेंटर सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी विमला आर. यांच्यासोबत विदर्भ टॅक्स पेअर असोसिएशनचे श्रवण कुमार मालू यांनी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत तेजिंदर सिंग रेणू यांनी तर नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अश्विन मेहाडिया यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यासोबत व्यापार, उद्योग समूहातील विविध अडचणींबाबत स्वतंत्रपणे चर्चा केली.

यावेळी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश राठी, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे प्रदीप खंडेलवाल, एमआयएचे अध्यक्ष सी. जी. शेगावकर, वेदचे अध्यक्ष शिवकुमार राव, विश्वजित भगत, मनोहर बुद्धेश्वर, हरीश भोनेज, गिरीश गांधी, प्रफुल्ल गुडधे पाटील आदी उपस्थित होते. संचालन रामकिसन ओझा यांनी केले. रामावतार तोतला यांनी आभार मानले.