बायको- घरी पाहुणे येताहेत आणि स्वयंपाकघरात केवळ डाळच आहे..
नवरा- एक युक्ती करू.. ते आल्यावर तू स्वयंपाकघरात एक भांडं पाड.. मी विचारेन काय पडलं, तर आतून ओरड शाही पनीर पडलं म्हणून..
बायको- यामुळे काम होईल?
नवरा- थोड्या वेळानं तू दुसरं भांडण पाड आणि म्हण पनीर बुर्जी पडली.. मग मी म्हणेन, जाऊ दे डाळच घेऊन ये..
थोड्या वेळानं पाहुणे घरी आले.. पाच मिनिटांनंतर स्वयंपाकघरातून भांडी पडण्याचा आवाज आला..
नवरा- काय झालं..?
बायको- अहो, डाळच सांडली..