'बाईपण भारी देवा'ची बॉक्स ऑफिसवरील गाडी सुसाट, १०० कोटींचा आकडा करणार पार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 03:30 PM2023-07-31T15:30:30+5:302023-07-31T15:37:18+5:30

हा चित्रपट चक्क मराठी चित्रपटसृष्टीतला सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे.

Baipan bhari deva movie box office collection crossed 83cr | 'बाईपण भारी देवा'ची बॉक्स ऑफिसवरील गाडी सुसाट, १०० कोटींचा आकडा करणार पार?

'बाईपण भारी देवा'ची बॉक्स ऑफिसवरील गाडी सुसाट, १०० कोटींचा आकडा करणार पार?

googlenewsNext

मराठी सिनेमा 'बाईपण भारी देवा'चा धुमाकूळ काही थांबत नाही. सिनेमा रिलीज होऊन १ महिना नुकताच झाला आहे होईल पण थिएटरमधली गर्दी कायम आहे. सहा बायकांनी घातलेला पिंगा बघण्यासाठी महिलांची थिएटरमध्ये गर्दी होत आहे. अजूनही प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांत गर्दी करत आहेत. ‘बाईपण भारी देवा’चे महिन्याभराचे  बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. पाचव्या आठवड्यातही बाईपणची बॉक्स ऑफिसवरील जादू तसूभरही कमी झालेली नाही. 

समोर आलेल्या माहितीनुसार  कमाईच्या बाबतीत हा चित्रपट चक्क मराठी चित्रपटसृष्टीतला सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. आता काही दिवसात हा चित्रपट 'सैराट'चा रेकॉर्ड मोडणार का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.  पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने १२ कोटींची कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात २४ कोटींवर गेली. तिसऱ्या आठवड्यात पुन्हा या चित्रपटाने २१ कोटी आणि चौथ्या आठवड्यात १० कोटींची कमाई केली. एका महिन्यात या चित्रपटाने  ८३ कोटी ५० लाख कमावले आहेत. अवघ्या ५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाच्या कामगिरी पाहून सगळेच थक्क झालेत. आता हा सिनेमा १०० कोटींचा आकडा पार करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

 

सहा बहि‍णींची अनोखी गोष्ट सांगणाऱ्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने खासकरुन महिला वर्गाला भुरळ घातली आहे. या चित्रपटात काकडे सिस्टर्सच्या भूमिकेत रोहिणी हट्टांगडी, शिल्पा नवलकर, दीपा परब, सुकन्या मोने, वंदना गुप्ते आणि सुचित्रा बांदेकर या अभिनेत्री आहेत.

Web Title: Baipan bhari deva movie box office collection crossed 83cr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.