रमाकांत लिंबेकर
नको त्या शब्दांबद्दल नको इतके काळेबेरे मनात येऊन त्याची इतकी सार्वजनिक चर्चा, विकृत-अनाठाई चिकित्सा? आणि एवढा अस्थानी अभिनिवेश?
---------------
सन्माननीय बंधुवत जितेंद्रजी आव्हाड,
सप्रेम नमस्कार विनंती विशेष.
मंथन पुरवणीत आपण बाबासाहेब पुरंदरे यांना लिहिलेले पत्र व त्या पत्रला अविनाश धर्माधिकारी यांनी दिलेला उत्तररूपी प्रतिसाद वाचला. पुरंदरेंना घोषित झालेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार व त्याला अनुषंगून निर्माण झालेले विरोधी आणि समर्थनाचे वादही ऐकले, वाचले आणि पाहिलेही. माङयासारख्या अतिसामान्य पामराला काय वाटते ते मी पत्ररूपाने निवेदन करीत आहे. तत्पूर्वी काही महत्वाच्या गोष्टी-
1) मी शिक्षकाची नोकरी करून उदरनिर्वाह करणारा एक सामान्य सांसारिक मनुष्य आहे.
2) ही नोकरी गेली तर माझा संसार उघडय़ावर येऊ शकतो. नोकरीशिवाय अन्य कोणतेही पैतृक वा स्वत: निर्माण केलेले उत्पन्नाचे स्त्रोत माङयाकडे नाहीत व या अधेड वयात ते निर्माण होण्याची व करण्याची इच्छा, शक्यताही नाही.
3) मी कोणत्याही राजकीय पक्षाच्या वा संघटनेचा आण्याचाही सभासद नाही.
आपल्या म्हणण्यानुसार शिवाजी महाराज- दादोजी कोंडदेव, शहाजीराजे- जिजाऊ इत्यादि इतिहासकालीन महिला आणि पुरुषांच्या बदनामीच्या कटकारस्थानांची सुरुवात जेम्स लेन प्रकरणापासून झाली आहे. खरे पाहता ग्रॅण्ट डफ, व्हिन्सेंट स्मिथ यांसारख्या पाश्चिमात्य विद्वानांनीही महाराजांना दूषणो दिलेली आहेत. डफने मराठय़ांना चोर, लुटारू म्हटले. स्मिथने मराठय़ांच्या स्वातंत्र्य चळवळीलाच काळे फासले.
पाश्चात्त्यांचे सोडा, अनेक एतद्देशिय विद्वानांनीही महाराज हे ‘रयतेचे राजे’ नव्हते, ते सरंजामशाहीचे समर्थक होते असे आरोप केलेले आहेत. ‘‘छ. शिवाजी महाराजांनी स्वत: वेदमंत्रंनी युक्त असा राज्याभिषेक गागाभट्टांकडून करून घेतला. शिवाजीसुद्धा वर्णाश्रम धर्माला शरण जाणारा व राजेशाहीचा पुरस्कर्ताच होता की नाही? आजच्या पुरोगामी युगात आपण शिवाजीला फारतर प्रतिगामी धर्माचा उपासक, पण दयाळू असा हुकूमशहा म्हणू. याहून अधिक मोठेपण या माणसाचे काय म्हणून मान्य करावे?’’ - असा प्रश्न खुद्द नरहर कुरुंदकरांनी केलेला आहे.
महापुरुषांच्या अशा चिकित्सा वारंवार होतच आल्या आहेत. पण (कुरुंदकर म्हणतात त्याप्रमाणो) अशा चिकित्सेमुळे परंपरा काही प्रमाणात हलतात, काही श्रद्धांना धक्का बसतो. चिकित्सेचा हेतू उभयपक्षांनी सत्याला नम्रपणो सामोरे जाणो हाच होय.
महापुरुषांच्या दैवतीकरणाचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. श्रद्धा या चिकित्सेवर उभ्या नसतात. आपल्या हाती जे आहे ते शुद्ध व पवित्र आहे या श्रद्धेवर त्या उभ्या असतात. त्या श्रद्धास्थानांना धक्का लागला म्हणजे सर्वसामान्य लोकांमध्ये उद्रेक होतो. राजकारणी लोक त्या फुंकर घालून अधिक प्रदीप्त करण्याचा प्रयत्न करतात इतकेच. राम, कृष्ण यांपासून ते आंबेडकरांर्पयत सर्वत्रच श्रद्धेचा बडिवारच नाहीये का? असो.
‘राजा शिवछत्रपती’ या पुस्तकातील जिजाऊंसंदर्भात ज्या काही उपमा, रुपके वापरली आहेत ती अनैतिहासिक आहेत व त्यामुळे जिजाऊंची व शिवरायांची बदनामी झाली व ती बाबासाहेबांनी मुद्दामहून केली असा आपला आक्षेप आहे. जिजाऊंनी स्वत:ला कुंती म्हणवून घेणो, दादोजी कोंडदेव आजारी असताना ‘वडिलांनी असा धीर सोडू नये’ असे वाक्य शिवाजींच्या तोंडी घालणो इ. इ. वर आपला आक्षेप दिसतो.
एक उदाहरण देतो. समजा एखाद्या स्त्रीला किंवा पुरुषाला वाटले की आपल्याला शिवाजीसारखा शूरवीर, परधर्मसहिष्णू, निश्चयाचा महामेरु, बहुतजनांचा आधारु असा पुत्र व्हावा. त्याने किंवा तिने हे असे वाटणो चारचौघात म्हणूनही दाखविले तर त्या सर्वाच्या प्रतिक्रिया काय येणार? माङयासारखे वावदूक चिकित्सक असे तर म्हणणार नाहीत ना की, शिवाजीसारखा पुत्र पोटी येण्यासाठी शहाजीशी जैविक संबंध यावा लागतो. तरच शिवाजी तुङया पोटाला येईल! अशी बाल की खाल काढून वावदुकी चिकित्सा करीत बसलो तर लोक हसतील एवढेच. ‘मला कुंती व्हावे वाटते’ असे बोल जिजाऊंच्या तोंडी घालण्यामागचा हेतू एवढाच की माझा मुलगा पांडवांप्रमाणो शूर-वीर होवो बस् एवढा आणि इतकाच अर्थ. व्यक्तिश: त्या वाक्याबद्दल माङया मनात तरी दुसरे काही काळेबेरे आले नाही. इतके काळेबेरे मनात येऊन त्याची सार्वजनिक चर्चा आणि विकृत चिकित्सा, अनाठाई चिकित्सा, अस्थानी अभिनिवेश दाखवायला मी काही टोकाचा शिवभक्त नाही.
शिवरायांच्या तोंडी घातलेले ‘वडिलांनी धीर सोडू नये’ या वाक्याचा अर्थ (भले ते वाक्य अनैतिहासिक असो) एखाद्यावेळी लहानांनी धीर सोडला तरी चालेल, पण वडिलांनी (म्हणजे वडीलधा:या माणसाने हाच अर्थ. जैविक बापाने असा खवीट, कुत्सित, घाणरेडा, तर्कदृष्ट अर्थ नव्हे) धीर सोडणो योग्य नव्हे एवढाच त्याचा सोपा-सरळ सभ्य, लोकमान्य अर्थ आहे.
- अर्थ काय कोणीही आणि कसाही काढील त्याला काही अर्थ आहे काय? आपण मात्र त्याचा तर्कट अर्थ सांगून त्याची जाहीर चर्चा केली. त्यामुळे आमच्या (माङया) सारख्या सामान्य शिवभक्ताला तुमचा सात्त्विक संताप आला. मी सात्त्विक शिवभक्त आहे. आपल्यासारखी उग्र शिवभक्ती माङयासारख्या य:कश्चित क्षुद्र जिवाला शक्य आहे काय?
आपण म्हटलेय, शिवाजी महाराजांची हत्त्या करू इच्छिणारा अफजलखानाचा वकील कृष्णाजी कुलकर्णी अन् शिवरायांचे प्राण वाचविणारा जिवा महाल मात्र ‘जिवा’ या एकेरी नावाने संबोधावा काय?
केवळ ‘जी’ या आदरार्थी संबोधनाने व्यक्तीची महत्ता वाढते अन् तसे संबोधन न लावल्यामुळे कमी होते हा तर्क तर फारच किरकोळ आहे. त्यामुळे खालच्या समाजावर फार मोठा अन्याय झाला असे थोडेच आहे? इतिहासकारांनी जिवा महालाला जिवा म्हटले हे खरे असले, तरी तानाजीला ‘ताना’ किंवा ‘तान्या’ असेही म्हटले नाही, राणोजी शिंदे यांना ‘रानू’ शिंदेही म्हटले नाही, मल्हारराव होळकरांचा उल्लेख ‘मल्हार होळकर’ असाही केला नाही. याकडे आपले इतके दुर्लक्ष?
इतिहासातले जाऊ द्या. वर्तमानात तरी पाहा ना! आपण ज्या पक्षाचे नेते आहात त्या पक्षाचे सर्वोच्च नेते, कर्ते, धर्ते, सावर्ते, जाणते राजे जे श्रीमान् शरच्चंद्रजी गोविंदराव पवार यांचा उल्लेख पेपरवाले, च्यानलवाले ‘शरद पवार’ असाच करतात की नाही? मुख्य मथळ्यात सुद्धा ‘शरद पवार’ असाच एकेरी असल्यासारखा उल्लेख करतात की नाही? त्यामुळे शरद पवार यांच्या मोठेपणात, कार्यकर्तृत्वात फारसा उणोपणा येतो असे नाही.
छत्रपतींच्या स्वराज्य मोहिमेत त्यांच्या सोय:याधाय:यांनी काय कमी अडथळे आणले? तरी त्यांचा चंद्रराव मोरे, खंडूजी घोरपडे असा आदरार्थी उल्लेख? चंद्रय़ा मोरे’ (किंवा मो:या) ‘खंडय़ा घोरपडय़ा’ असा उल्लेख माङया तरी वाचनात आला नाही.
औरंगजेबाच्या लेखी मराठय़ांचा उल्लेख काफर, गनीम, बंडखोर, दुष्ट, हलकट असा होतो. छ. शिवाजी, छ. संभाजी, छ. राजाराम आदिंचा उल्लेख जहन्नमी (नरकवासी) असा होतो - याची तक्रार आपण कोठे करणार? मग मित्रवर्य जितेंद्रजी आव्हाड, एखाद्या इतिहासकाराने ‘जिवाजी महाल’ ऐवजी ‘जिवा महाल’ म्हटले तर एवढा जिवाचा अंगार करून घेण्याचे कारण काय? एखाद्याला एकेरी उल्लेखणो आणि एखाद्याचा उल्लेख ‘नरकवासी’ असा करणो यात फार मोठा भावनिक फरक असू शकतो, यावर आपला विश्वास आहे की नाही? आणि कोण तो कृष्णाजी त्याला लक्षात ठेवतोय कोण? तुम्हाला अपेक्षित असणारा जातसमूह काही त्याची दररोज (किंवा कधीच नाही) पूजा बांधीत नाही.
ब्राrाण समाजाने स्वत:च्या मोठेपणासाठी खोटा इतिहास लिहिला असेही आपण वस्तुनिष्ठ इतिहास संशोधकांचा हवाला देऊन म्हटले आहे. बरोबर आहे. पण ब्राrाण जातच आता गतार्थ झाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. तरी पण ब्राrाणांच्या नावाने खडे फोडणो चालूच असते. शेवटी ब्राrाणांनी खोटा इतिहास लिहिला हेसुद्धा त्र्यं. श. शेजवलकरादि ब्राrाण जातीच्या इतिहासकारांनीच सांगितले ना? म्हणजे संदर्भासाठीही ब्राrाण आणि ठोकायसाठीही ब्राrाण.
- इतिहासातल्या सर्व दोषांचे खापर ब्राrाणांच्या टाळक्यावर फोडण्याची परंपरा फार जुनी आहे. खरे पाहता दास संस्कृतीची गरज कोणाला होती? दहा-दहा एकरांचे राजवाडे, त्यात जनानखाने, राणीवसे कोणी निर्माण केले? हजारो एकरांचे मालक कोण होते? गुलामांची खरेदी-विक्री करणारे कोण होते? राज्याभिषेक करवून घेणारे कोण होते? राजगादीच्या हक्कावरून मारामा:या, दगाबाजी, प्रसंगी परकीय शत्रूंशीही हातमिळवणी हे सर्व करणारे कोण?
- आजच्या अत्यंत पुढारलेल्या युगातही या परंपरा जपणारे कोण आहेत बरे? मध्ययुगीन काळापासून तो आजच्या तारखेर्पयत राजेशाही सरंजामशाही उपभोगणारे - ब्राrाणांचा एखाद दुसरा अपवाद सोडला तर - कोण होते बरे? ब्राrाणांनी खोटा इतिहास लिहिला हा (अर्धसत्य) आरोप मान्य केला तरी तसा इतिहास लिहवून घेणारी, स्वत:ची स्तुतिसुमने स्वत:वरच उधळून घेणारी मंडळी कोण होती बरे? अतिरंजित कवने, पोवाडे, भूपाळ्या, काव्यपंक्ती या सर्व प्रकारची गरज हुकूमशहांना अन् सरंजामदारांनाच असते. शिवपूर्वकाल काय अन् शिवोत्तर काल काय, या सर्व कालखंडांमध्ये हुज:यांची अन् मुज:यांचीच चलती होती हे आपण सर्वानीच मान्य करायला हवे. भाट चारणांची आणि पुरोहितांची (अर्थात ब्राrाणांची) गरज क्षत्रियांना अन् वैश्यांनाच होती. बाकी सर्व सामान्य जनता आहे तसे जीवन जगतच होती. ब्राrाणांना जसा स्वत:च्या उच्चपणाचा ताठा होता तसाच क्षत्रियांनाही होता. आपणच राज्यनियंत्रण करू शकतो असे क्षत्रिय म्हणवून घेणा:यांना आजही वाटते. कालोघात ब्राrाण्याचा (व ब्राrाणांचा) पराभव झाला. मग जय कोणाचा/कशाचा झाला?
आपण स्वत:ला मागासवर्गीय म्हणवून घेता ते मला मुळीच योग्य वाटत नाही, कारण क्लास आणि कास्ट यात महदंतर आहे. तात्त्विकदृष्टय़ा मी स्वत: तथाकथित, माङया अनिच्छेने उच्चवर्णीय (हायकास्ट) असलो तरी प्रत्यक्षात मी मात्र लोअर क्लासच आहे. आपल्या देशात वर्ग बदलला तरी जात बदलत नाही हे वास्तव आहे. आपण उच्चवर्गीय असून, परंपरेने आपण दलित आहात हे वास्तव आहे. आपण एका पक्षाचे नेते आहात. उच्चशिक्षित आहात, लोकप्रतिनिधी आहात, उत्तम वक्ते आहात, आपल्याला मानमरातब-विशिष्ट प्रतिष्ठा आहे, आपातत: आपले जीवनमानही उच्चप्रतीचेच असणार आणि यात मला व्यक्तिश: कुठलाही आक्षेप असण्याचे कारण नाही.
आज जे काही गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झाले आहेत ते आपण आजचे विहित मार्ग वापरून सोडवायला हवेत, यात दुमत असता कामा नये. पण गैरसमजातून, किंवा जात्यभिनिवेशाच्या नादात आपण अकारण नवा द्वेष निर्माण तर करीत नाही, याचा आपण सारासार विचार करावा.
विचार पटले तर आनंदाने घ्यावेत, नाहीच पटले तर तितक्याच आनंदाने त्यागावेत. मतभिन्नता असूनही परस्परांमध्ये निर्वैरवृत्तीने संबंध ठेवता येतात यावर माझा पूर्णाशाने विश्वास आहे, अन् आपलाही तेवढाच असावा
कळावे, लोभ असावा.
(लेखक परभणी येथे शिक्षक आहेत. त्यांनी श्री. आव्हाड यांना पाठवलेल्या दीर्घ पत्रचा हा संपादित अंश)