शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या चमकदार कामगिरीचं रहस्य- सांगत आहेत अॅथलेटिक्स प्रशिक्षक विजेंद्रसिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 06:45 IST

पैसा नसल्यामुळे खेळाडूंना आपला खेळच सोडावा लागला किंवा क्षमता असूनही त्या वाटेलाच ते जाऊ शकले नाहीत, अशा घटना आता घडणार नाहीत.

ठळक मुद्देखेलो इंडिया- भारताचं क्रीडा धोरण बदलताना दिसतंय, नेमकं काय होतंय मैदानात? भारताची पदकांची भूक त्यानं वाढेल?. प्रत्यक्ष मैदानावरचा हा लेखाजोखा.

-विजेंद्रसिंग

खेळात आता प्रोफेशनॅलिझम येऊ लागला आहे. वातावरण बदलतं आहे. खेळाडू आणि लोकांमध्येही खेळाबद्दलचा अवेअरनेस वाढतो आहे.

पैसा नसल्यामुळे खेळाडूंना आपला खेळच सोडावा लागला किंवा क्षमता असूनही त्या वाटेलाच ते जाऊ शकले नाहीत, अशा अनेक घटना यापूर्वी आपण पाहिल्या आहेत; पण आता त्याला ब-याच प्रमाणात छेद बसतो आहे. खेळाडूंना त्यांच्या ऐन उमेदीत आणि कारकीर्द भरात येण्याच्या आधीच पैसा मिळू लागला आहे. त्यांना शासकीय आणि विविध कंपन्यांमध्येही चांगल्या पगाराच्या नोकर्‍या मिळू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढच्या अडचणी ब-याच प्रमाणात कमी होताहेत. ग्रामीण आणि आदिवासी भागातील खेळाडू त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पुढे येताहेत.गरीब घरातल्या मुलांसाठी आपलं आयुष्य सेटल होणं ही बाब सर्वाधिक महत्त्वाची असते. खेळात प्रगती दाखवली तर आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शाश्वती असल्याचं चित्र त्यांना डोळ्यांसमोर दिसत असल्यानं तेही झटून मेहनत करतात. 

केंद्र सरकार तर खेळाडूंसाठी निधी उपलब्ध करून देतंच आहे; पण विविध राज्य सरकारेही खेळाडूंवर भरपूर पैसे खर्च करताहेत. एवढंच नाही, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजयी खेळाडूंसाठीही ते मुक्त हस्ताने आपल्या थैल्या खोलताहेत, सरकारी नोकरी सन्मानानं देऊ करताहेत. नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंनाही त्या त्या राज्य सरकारांनी रोख रकमेच्या इनामांनी सन्मानित केलं. त्यात कोटी कोटींचेही आकडे होते. खेळावर त्याचा निश्चितच सकारात्मक परिणाम होतोय.

खेळाचं वातावरण वाढवायचं, खेळाला प्रोत्साहन आणि पैसा मिळवून द्यायचा, तर केवळ सरकार पुरे पडणार नाही हे तर खरंच आहे; पण आता सरकारबरोबर खासगी कंपन्या, धनाढय़ लोकही खेळासाठी पुढे येताहेत. कंपन्यांचा दोन टक्के सीएसआर निधीही खेळासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो आहे.

परदेशांत खेळ आणि खेळाडूंवर जितका पैसा खर्च केला जातो, त्यांच्यावर जितकी मेहनत घेतली जाते, त्या तुलनेत आपल्याकडचा निधी कमी असला तरी आता खूपच फरक पडला आहे, पडतो आहे.

वेगवेगळ्या खासगी अकादमीही निष्ठेनं खेळाडूंवर मेहनत घेताहेत. गोपीचंद अकॅडमी, नाशिकची कविता राऊत अकॅडमी. ही त्याची काही उदाहरणं.

ज्या खेळाडूंकडून आंतरराष्ट्रीय पदकांची अपेक्षा आहे, त्यांच्यासाठीही भरपूर पैसा सुरुवातीपासूनच दिला जातोय. सुरुवातीच्या याच टप्प्यावर खेळाडूंना पैशाची नितांत आवश्यकता असते, कारण त्यांच्यापुढे अडचणींचा डोंगरही मोठा असतो. नेमक्या गरजेच्या वेळी खेळाडूंना पैसा मिळत असल्यामुळे खेळाची त्यांची उमेदही वाढते.

‘खेलो इंडिया’सारख्या आणि इतरही योजनांमुळे देशाच्या कानाकोपर्‍यातून होतकरू खेळाडू हुडकले आणि घडवले जाताहेत.

खेळाडूंच्या पैशाला इतर कुठल्याही वाटा फुटू नयेत यासाठी केंद्र सरकारतर्फे थेट त्यांच्या बँक खात्यात पैसा जमा केला जातोय. याच योजनेतून नाशिकच्या संजीवनी जाधवसारख्या खेळाडूंच्या बँक खात्यात दरमहा पन्नास हजार रुपये जमा केले जातात.

अशा प्रकारे खेळाडूंना उत्तेजन मिळत असेल तर त्याचा फायदा होणारच आणि त्याचे सकारात्मक परिणामही निश्चितच पाहायला मिळतील.

(आदिवासी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेणारे ‘साई’चे नाशिक येथील अँथलेटिक्स प्रशिक्षक)