शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: सर्वात मोठी बातमी! भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा
2
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
3
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
4
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
5
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
6
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
7
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
8
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
9
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
10
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
11
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
12
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
13
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
14
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
15
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
16
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
17
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
18
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
19
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
20
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती

नामशेष होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: August 2, 2014 15:08 IST

सृष्टिचक्र कशामुळे व्यवस्थित सुरू राहते? पाने, फुले, पक्षी, प्राणी, नद्या, नाले, डोंगर यांच्यातील समतोलामुळे! विकासाच्या, प्रगतीच्या नावाखाली मानवाकडून हा समतोल बिघडवला जात आहे. पक्ष्यांचेच उदाहरण घेतले, तर फक्त भारतातीलच १७३ प्रजाती नामशेष होण्याच्या वाटेवर आहेत. कशामुळे झाले हे? कसा थांबवायचा हा र्‍हास?

 डॉ. सतीश पांडे

 
पृथ्वीवर अस्तित्वात असणारी जैवविविधता सुरक्षित रहावी. यासाठी कोणत्या प्रजाती आजमितीला सुरक्षित आहेत व कोणत्या प्रजाती धोक्यात आहेत. हे शास्त्रीय निकश लावून नोंदण्याचे काम करण्याची प्रथा प्रथम ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कझर्वेशन ऑफ नेचर’ किंवा ‘आय.यू.सी.एन’ या संस्थेने १९६४ साली सुरू केली. त्यांनी एक नोंद वही प्रथम छापली व त्याला ‘रेड डाटा बुक’ असे नाव दिले. लाल रंग रक्ताचा किंवा धोक्याचा निर्देशक आहे, म्हणून हे नाव. यावर्षी ‘रेड डाटा बुक’ पन्नास वर्षांचे झाले आहे. जर पृथ्वीवर नांदणारी जैवविविधता सुरक्षित असता तर ‘रेड डाटा बुक’ प्रथम नामशेष झाले असते. दुर्दैवानं ‘रेड डाटा बुक’ मधे समाविष्ट असणार्‍या प्रजातींची संख्या दरवर्षी वाढतेच आहे, ही अत्यंत चिंताजनक वस्तुस्थिती आहे. या पुस्तकाचा आकार आज गलेलठ्ठ झाला आहे.
आज जगातील दहा टक्के पक्षी धोक्यात आहेत. गेल्या दशकात ज्या पक्षांच्या प्रजातींचा नव्याने शोध लागला. त्यांचाच विचार जर केला तर त्यातील २५ टक्के पक्षी धोक्यात आहेत, असे दिसते. ‘रेड डाटा बुक’ अंतर्गत वनस्पतींची नोंद देखील केली जाते आणि त्यांच्याबाबत तर परिस्थिती अधिकच भयावह आहे. ‘द आयरिश रेड डाटा बुक’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत क्रिस्टीन लिऑन या शास्त्रज्ञाने म्हटले आहे, 
की ‘२0५0 सालापर्यंत पृथ्वीतलावरील दर चार किंवा पाच वनस्पती प्रजातींमागे एक प्रजाती नामशेष होईल व त्यांची संख्या साठ हजार असेल’ हा विध्वंस आज जिवंत असणारे आपल्यासारखे लोक पाहू शकतील; म्हणूनच त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पूर्णपणे आपलीच आहे.
पाश्‍चिमात्य देशांमधील शहरात वास्तव्य करणारे उच्चभ्रू समाज सहज म्हणू शकतो (व म्हणतो देखील) ‘कशाला फिकिर करायची? पण भारतातील नागरिकाला किंवा इतर विकसनशील देशातील नागरिकांना वनस्पतींचे महत्त्व सहज पटते ते पाश्‍चिमात्य लोकांना लवकर रूचत नाही. वनस्पती आपल्याला अन्न पुरवतात. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका वगैरे गवताचे प्रकार आहेत. आपले कॉटनचे व रेशमी व इतर अनेक कपडे वनस्पतीजन्य आहेत. निवारा, औषधे, पेये असे व इतर सगळेच मनुष्यास आवश्यक किंवा आवडणारे पदार्थ वनस्पतींकडूनच घेतले जातात. स्वच्छ प्रदुषण मुक्त वातावरण व जिवनावश्यक प्राणवायू हे तर प्रमुख वनस्पती निर्मित घटक आणि कलावंतांना प्रज्ञा स्फुरवण्याचे काम, मनास शांती देण्याचे आवाहन वनस्पतीच पेलू शकतात. तरीही आपण वनस्पतींकडे दुर्लक्ष करतो. त्यांचे अस्तित्व आपण धरूनच चाललो आहोत. पण आज त्यांना प्रयत्नपूर्वक सांभाळण्याची वेळ आली आहे अथवा यापुढे वनस्पती आपला सांभाळ करू शकणार नाहीत.
प्रत्येक देशाने आपले स्वतंत्र ‘रेड डाटा बुक’ प्रकाशित करायला हवे. युरोपातील काही देशांचे ‘रेड डाटा बुक’ अजूनही नाही. इतरही अनेक देशांकडे ही महत्त्वपूर्ण माहिती नाही. आज जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण खूप निकडीचे झाले आहे. प्रजाती नामशेष न होण्याकडे लक्ष द्यायला हवे. या कामासाठी आम जनता व निर्णय घेणार्‍या शासकीय व अशासकीय संस्थांनी एकत्र यायला हवे. आय.यू.सी.एन. सोबत या महत्त्वपूर्ण शास्त्रीय संशोधनासाठी ज्या इतर संस्था काम करत आहेत. त्या आहेत. झूलॉजिकल सोसायटी, लंडन, बर्ड लाईफ इंटरनॅशनल, वर्ल्ड कंझर्वेशन मॉनिटरींग सेंटर, स्पीसीज सर्व्हायक्ल कमिशन, बोटॅनिकल गार्डन्स कंर्जवेशान इंटरनॅशनल व इतर, जगातील धोक्यात आलेल्या प्राणी-पक्षांची यादी ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध आहे. वेब साईट आहे. www.iucnredlist,org
 
‘रेड डाटा बुक’ निर्माण करणे व दर काही वर्षांनी त्यातील माहिती अद्ययावत करणे. यामागे चार प्रमुख उद्देश आहेत. 
१) जगातील विविध प्रजातींबाबत शास्त्रीय अभ्यासाद्वारे त्यांच्या संख्येची नोंद करणे. त्यात उपजातींचा समावेशदेखील केला जातो. 
२) धोक्याचे प्रमाण व नष्ट झाल्यास होणारे नुकसान किंवा प्रजातीचे महत्त्व नोंदणे.
३) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय निर्णय प्रक्रियेवर सकारात्मक परिणाम करणे.
४) या प्रकाशित माहितीच्या साह्याने संवर्धनाच्या प्रक्रियेस मार्गदर्शन करणे. वनस्पती, पक्षी, सस्तन प्राणी, सरडे, साप, बेडूक, प्रवाळ, अपृष्ठवर्गीय व पृष्ठवर्गीय प्राणी, अशा व इतर जैवविविधतेची दखल रेड डाटा बुक घेते. या कामात अनेक शास्त्रज्ञ, सरकारी यंत्रणा व सेवाभावी संस्था मग्न आहेत. रेड डाटा बुकला कायद्यान्वये मान्यता अथवा बांधिलकी नाही; पण हा नैतिक नोंदीचा व शास्त्रीय निकषांवर आधारित असणारा ग्रंथ असल्याने जगातील राजकीय व शास्त्रीय वतरुळातील महत्त्वपूर्ण व्यक्ती त्यांची नोंद व सकारात्मक दखल घेतात. प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रमाणात होते, हे दर वर्षी वाढणार्‍या पुस्तकाच्या आकारावरून उघड आहेच.
धोक्यात आलेल्या जैवविविधतेच्या प्रजातींची धोक्याच्या पातळीनुसार विभागणी केली जाते. काही प्रजाती नजीकच्या काळात नामशेष झाल्या आहेत. त्यांना एक्सटिंट म्हटले जाते. त्यानंतर कमी होणार्‍या धोक्यानुसार गट आहेत ते असे : क्रिटिकली एंडेंर्जड, एंडेंर्जड, नियर थ्रेटंड, लिस्ट कन्सर्न, डाटा डेफिशियंट व नॉट इव्हॅल्युएटेड. 
गुलाबी डोक्याचे बदक भारतातून नामशेष झाले आहे, तर गिधाडे अत्यंत धोक्यात आहेत. भारतात अनेक प्राणी, पक्षी व वनस्पती धोक्यात आहेत. प्रदेशनिष्ठ जीव धोक्यात आले तर ते नामशेष होण्याची शक्यता सर्वाधिक असते.
जैवविविधता धोक्यात येण्याची अनेक कारणे दिसून येतात. ती समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते, कारण त्यांच्यावर लक्ष केंद्रित केल्याशिवाय खरे संवर्धन होणार नाही. ढोबळमानाने ही कारणे खालीलप्रमाणे आहेत. 
संकुचित भौगोलिक अधिवास. समुद्री बेटांवरील प्राणी-वनस्पती अधिक धोक्यात असतात. त्सुनामीसारखा आघात बेटाला बुडवून टाकू शकतो व त्यासोबत सगळी जैवविविधता नष्ट होते. जनुकीय प्रदूषण ही एक भीती आहे. हायब्रिडायझेशन व कमी संख्या झाल्यास आपसात संकर धोका निर्माण करतात व जनुकीय शुद्धता संपुष्टात आणतात. अधिवासांचा र्‍हास हा सगळ्यात जबरदस्त धोका आहे. याची कारणे प्रदूषण, आधुनिकीकरण करण्यासाठी जमिनीत बदल, खाणी, धरणे, विंडफार्म, कारखाने, रस्ते इ. असू शकतात. शिकार व आजार धोका निर्माण करतात. अधिवास संपला की जैवविविधता खलास झालीच. एका अधिवासाच्या नष्ट होण्याने अनेक प्रजाती नष्ट होतात. विजायती किंवा परकीय प्रजातींमुळे स्थानिक देशी प्रजाती धोक्यात येतात. घाणेरी व बेशरम या वनस्पती, चिलापी हा मासा भारतीय मासे धोक्यात आणत आहे व वनस्पती फोफावत आहेत. भारतीय मैना युरोपात व अमेरिकेत उच्छाद मांडत आहेत. उंदीर न्यूझीलंडच्या बेटांवरील पक्ष्यांची अंडी फस्त करत आहेत. एकमेकांवर अवलंबून असणारे प्राणी एकाची संख्या घटल्यास दुसरा धोक्यात येतो. मौआ हा महाकाय पक्षी नष्ट झाल्याने त्याची शिकार करणारा हास्टचा गरुडदेखील नामशेष झाला. डोडोपाठोपाठ तंबालुख वृक्ष नामशेष होणार होता; कारण त्याच्या बिया डोडोच्या पोटातून विष्टेद्वारे बाहेर आल्यास रुजतात. सुदैवाने यावर आज उपाय सापडला आहे; पण डोडो तर गेलाच कायमचा. पृथ्वीवर होणारे उल्कापात, महाप्रलय, प्रचंड वादळे व सध्या भेडसावणारे वाढणारे तापमान किंवा ग्लोबल वॉर्मिंग यांच्या व वरील कारणांमुळे रेड डाटा बुक अंतर्गत प्रजाती वाढत आहेत, यात आश्‍चर्य नाही.
जैवविविधतेला धोका निर्माण करणारी प्रमुख कारणे मानवनिर्मित आहेत. आजपर्यंत पृथ्वीने चार प्रचंड नामशेष करणार्‍या घटना पाहिल्या. शेवटची घटना ६५ दशलक्ष वर्षांपूर्वी झाली व त्याला मेसोझोइक एक्सटिंक्शन म्हणतात. पुढली घटना मानव हीच आहे, असे शास्त्रज्ञ मानतात. आपण इतके वाईट व क्रूर आहोत का? लक्षावधी प्राणी-वनस्पती यांना कायमचे यमसदनास पाठवणे म्हणजे काय? माझ्या मते बेफिकीर, संकुचित, आत्मकेंद्रित प्रवृत्ती. आपण धरणीमातेचे देणे लागतो, याची अंतस्थ जाणीव सगळ्यांनाच आहे. कृतीत आले, की जैवविविधता सुरक्षित राहील. वेळ अजूनही गेलेली नाही. जैवविविधता नाही, तर रेड डाटा बुक नष्ट करणे गरजेचे आहे. सगळ्या प्राण्यांना- वृक्षवल्लरींना अभय प्राप्त झाले, की रेड डाटा बुक आपोआपच नामशेष होईल.
(लेखक ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ आहेत.)