शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

बिनपैशाचं सुख

By admin | Updated: March 26, 2016 20:45 IST

गरज नसताना किती आणि काय काय जमवतो आपण, खरेदी करत असतो, त्यावर उधळपट्टी करत असतो. ‘खरेदी करा, करत रहा. भले कर्जं काढा, पण खरेदी करा.’ अशी वावटळच अमेरिकेत आली. त्याचा अतिरेक झाल्यावर मग ‘खरेदी करू नका’चा आग्रह! जेवढे अंथरूण, तेवढेच पाय पसरायचे! सुरुवातीला खडतर वाटणारी ही वाट नंतर जगभरातल्या अनेकांनी आपलीशी केली. त्यातलीच एक केट फ्लाण्डर्स!

 
- शर्मिला फडके
 
कोणतीही चळवळ सुरू व्हायला निमित्त लहानसेच झालेले असते. एखाद्याच्या आयुष्यातली लहानशी घटना त्याला काहीतरी करायला कारणीभूत ठरते आणि मग अनेकांना त्यात आपले प्रतिबिंब दिसायला लागते. अनेकदा या चळवळी उभ्या राहतात एखाद्या नको इतक्या प्रमाणात प्रसारित झालेल्या गोष्टीच्या विरोधात, काउन्टर इफेक्टच्या स्वरूपात. जशी अमेरिकेतल्या ‘खरेदी करा, करत राहा. कर्ज काढा, पण खरेदी करा.’ या वावटळीच्या विरोधात उभी राहिलेली ‘खरेदी करू नका’ चळवळ. जीवनावश्यक सोडून इतर कोणत्याही वस्तू विकतच घ्यायच्या नाहीत ही चळवळ फार जुनी नाही. इंटरनेटवरच्या ब्लॉगजगतात फार तर गेल्या चार-पाच वर्षांमध्ये मूळ धरलेली आणि वेगाने फोफावत गेलेली ही चळवळ. त्याला पुढे अनेक शाखा, उपशाखा फुटल्या. बाय नथिंग चॅलेंज, लिव्हिंग ऑन अ बजेट हे या चळवळीचेच भाग. 
2008-09 च्या सुमारास वैयक्तिक पातळीवर हे प्रयोग सुरू झाले. अमेरिकेतल्या आर्थिक मंदीचा हा काळ. न चुकवता आलेल्या वैयक्तिक कर्जांच्या, क्रेडिट कार्डावरच्या थकबाकीच्या ओङयाखाली अडकलेले अनेक होते. यांच्यापैकी काहींनी नाइलाजास्तव आलेल्या शहाणपणापोटी का होईना, कर्जफेडीच्या जाळ्यातून बाहेर येण्याकरता काहीही खरेदी न करण्याचे चॅलेंज उचलले. काहींनी वर्षभराकरता, काहींनी फक्त सणासुदींच्या महिन्यांपुरते, काहींनी अक्षरश: डीटॉक्स डायेट असावे तसे खरेदीचे रक्तात भिनलेले विष उतरवायला सुरुवात केली.  
24 तास तरी काहीही विकत घ्यायचे नाही, ही सुरुवात. मग थोडे जमू लागल्यावर एक आठवडा, एक महिना आणि मग एक वर्ष ‘बाय नथिंग’चे व्रत अंगीकारले. आता त्यांच्याकरता हीच जीवनशैली बनलेली आहे.  
- मग सुरू झालीे या वाटेवरले अनुभव शेअर करण्याची धडपड!
 किती यश मिळते, काय अडचणी येतात, भरमसाठ खरेदीच्या जन्मजात मोहावर मात करण्याचे प्रयत्न नेटाने कसे निभवायचे, होणारे फायदे, घरच्यांचा, मित्र-मैत्रिणींचा त्याला लागणारा हातभार. असे सगळे मग ब्लॉग्जमधून लिहिले जाऊ लागले. आपल्यावरच्या कर्जाचे ओङो, आपली गेल्या काही वर्षांतली खरेदीची, क्रे डिट कार्डाची बिले, ढासळलेल्या आर्थिक नियोजनाचे आकडे हे सगळे सगळे खरेखुरे जाहीर होऊ लागले.
दारूचे व्यसन सोडण्याच्या प्रयत्नात जे टप्पे सामोरे येतात ते सगळे या खरेदीच्या व्यसनाला सोडवतानाही येत असतात आणि त्यामुळे यातही आप्त सुहृदांची साथ, त्यांच्यासोबतचे शेअरिंग मदतीला येते, असा त्यांना अनुभव अनेकांना येत गेला. तो सातत्याने लिहिला जाऊ लागला. 
बघताबघता असे अनेक वैयक्तिक ब्लॉग्ज शृंखलेत गुंफले गेले आणि त्यातून ‘मिनिमलिस्ट’ चळवळ उभी राहिली, जिचे आज सोशल मीडियावर हजारो, लाखो सदस्य आहेत.
कॅनडाच्या केट फ्लाण्डर्सचा ‘ब्लॉण्ड ऑन अ बजेट’ हा ब्लॉग अशापैकीच एक. तिच्यासोबत कॅनडाची मिशेल मॅग्रा, यूकेची कॅथ केली, द मिनिमलिस्ट ब्लॉग लिहिणारा जोशुआ बेकर हे या चळवळीतले सध्याचे बिनीचे ऑनलाईन शिलेदार आहेत. प्रत्येकाचे या जीवनशैलीकडे वळण्याचे कारण वेगळे असले, तरी त्यातून त्यांनी जे साध्य केले त्यात मात्र विलक्षण सारखेपणा आहे.
 कॅनडाच्या केट फ्लाण्डसने आपल्या पहिल्या जॉबच्या पहिल्या सहा महिन्यांत स्वत:साठी अपार्टमेंट खरेदी केले आणि ते सजवण्याकरता जी खरेदी सुरू केली तिला अंत नव्हता. फर्निचर, होम डेकॉर, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स. यातल्या कित्येक गोष्ती तिच्याकडे आधीपासून होत्या, तरी नाविन्याच्या हौसेपायी ती भारंभार खरेदी करत सुटली. लॅपटॉप, कार, म्युङिाक सिस्टीम, इ-रीडर अशा अनेक गोष्टी.. तिच्याकडे होत्या, तरी तिने नव्या घेतल्या.
आपले नवेकोरे घर आयकियाच्या कॅटलॉगसारखे किंवा कोणत्याही इंटेरियर डिझाइनच्या ऑफिसमध्ये लावलेल्या चित्रसारखे देखणो दिसते  याचा तिला विलक्षण आनंद झाला!
- या आनंदाची धुंदी लवकरच उतरली.
तिच्या क्रेडिट कार्डाची बिले आल्यावर!
वरून लागणारा दंड टाळण्यासाठी जेवढी   ‘मिनिमम अमाउंट’ भरावी लागते, तेवढेच   पैसे केटकडे शिल्लक होते. 
..मग हा सिलसिला पुढचेसहा महिने चालू राहिला. त्यात अल्कोहोल, कॉफी, बाहेरून मागवलेल्या खाण्याची बिले, मित्र-मैत्रिणींवर बार-पबमधे उधळलेल्या पैशांची भर पडतच होती.
 त्या दिवसांची आठवण काढताना केट आपल्या ब्लॉगवर लिहिते, ‘या पूर्ण काळात मी सतत दु:खी असल्याची भावना मनात होती. करत असलेल्या खरेद्यांची बिले सतत माङया नजरेसमोर नाचायची आणि तरीही मला स्वत:ला थांबवता येत नव्हते. शेवटी घरासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते भरता न आल्यामुळे घर गेले, घरातले सामान गराज सेलमधे विकावे लागले.’
- या कठीण काळातून जात असताना केटला  कॉफीचे व्यसन लागले. एकदा फक्त टेकअवे कॉफीचे बिल चारशे डॉलर्स आणि सुपर मार्केटमधल्या अवांतर खरेदीचे बिल  हजार डॉलर्स झालेले तिने पाहिले आणि ती उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरली!
तिने ठरवले, की आता यातून बाहेर पडण्याशिवाय गत्यंतर नाही.
काटेकोर बजेट आखून त्यातच सारे बसवायचे आणि लवकरात लवकर कजर्मुक्त व्हायचे असे ठरवून केटने त्याच रात्री ब्लॉग लिहायला घेतला :  ‘ब्लॉण्ड ऑन अ बजेट’ 
बघताबघता तिचे हे प्रांजळ अनुभवकथन जगभरात नावजले जाऊ लागले. केटच्या नावेत बसणारे अनेक जण होते. या वाचकांच्या सहकार्याने तिने जीवनावश्यक गोष्टींकरता एक ठरावीक बजेट तयार केले. त्यात दिवसाला एक डॉलरपेक्षा जास्त खर्च करायची मुभा नव्हती.
 या बजेटचे काटेकोर पालन करण्याचा प्रयत्न केट करत होती. पण एका रात्रीत बदल घडत नाही. त्यामुळे सुरु वातीला तिने केलेले  ‘पण’ बरगळले, शिक्षा म्हणून उपाशी राहायचीही वेळ आली, पण हळूहळू जमत गेले.
 आज पाच वर्षांनी केट संपूर्ण मिनिमलिस्ट जीवनशैली जगते आहे. केवळ एका कारमध्ये मावेल इतकेच सामान तिच्याकडे आहे. तीन वर्षांत केटने  संपूर्ण कर्ज फेडले,  त्यानंतर ती जगभरात बॅक पॅकिंग  करत फिरून येऊ शकली. तिचे आरोग्य सुधारले. कमीतकमी खाणो, कमीतकमी वस्तू वापरणो आणि जास्तीतजास्त जगण्याचा आनंद मिळवणो आज केटचे जीवनसूत्र बनले आहे.
 
केट फ्लाण्डर्स
एकेकाळी शॉपिंग केल्याशिवाय एक दिवसही काढू न शकणारी, कर्जाच्या ओङयाखाली बुडालेली केट सध्या
1 दोन वर्षे काहीही खरेदी न करण्याच्या  ‘डाएट’वर आहे.
2 तिच्याजवळ कपड्यांचे फक्त 28 जोड आहेत. त्यातले 9 रोजच्या वापरासाठी
3 एक कपडा फाटला/हरवला तरच दुसरा घ्यायचा असा नियम आहे.
4 रोज दोन तासापेक्षा जास्त वेळ फोनवर/सोशल मीडियावर खर्च करायचा नाही, अशा रेशनिंगवर आहे 
- आणि कधी नव्हती एवढ्या आनंदात आहे 
 
(लेखिका ख्यातनाम कला समीक्षक आहेत)
sharmilaphadke@gmail.com