शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

‘चाक्या म्हसोबा’!

By admin | Updated: April 29, 2016 22:32 IST

18 एप्रिल 1853 त्या पहिल्या रेल्वेलाइनची लांबी फक्त एकवीस मैल होती. डोंगरद:या, विस्तीर्ण नद्या,

- डॉ. उज्ज्वला दळवी
 
18 एप्रिल 1853
त्या पहिल्या रेल्वेलाइनची लांबी 
फक्त एकवीस मैल होती. 
डोंगरद:या, विस्तीर्ण नद्या, 
घनदाट जंगलांतून रेल्वेमार्ग सुरू करणं हे महाकठीण आणि जगड्व्याळ काम होतं. 
तरीही त्यानंतर देशव्यापी 
रेलजाळं विणलं गेलं.
सर्वसामान्य माणसांच्या मनात मात्र 
त्या धावत्या, धूर ओकणा:या 
लोखंडी राक्षसाबद्दल अढीच होती.
 
‘साहेबाचा पोर नकली रे, बिनबैलाची गाडी हाकली रे!’
18 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदरपासून परळपर्यंत हजारो बघ्यांची गर्दी दाटली होती. योग्य मुहूर्तावर एकवीस तोफांची सलामी घेत मुंबई-ठाणो रूळरस्त्यावर पहिली आगगाडी धावायला लागली. तीन वाफेची ‘यंत्रं’ आणि वीस ‘रथ’ जुंपलेल्या त्या गाडीत मुंबईचे गव्हर्नर, इतर बडे हुद्देदार आणि महत्त्वाचे भारतीयही होते. 
त्या पहिल्या रेल्वेलाइनची लांबी फक्त एकवीस मैल होती. हिंदुस्तानात रेल्वेमार्ग सुरू करणं हे महाकठीण आणि जगड्व्याळ काम होतं. तिथल्या डोंगरद:या, विस्तीर्ण नद्या, घनदाट जंगलं वगैरे अडथळ्यांतून रूळमार्ग घालणं अवघड होतं. सर जमशेटजी जीजीभॉय, जगन्नाथ शंकरशेट यांच्या प्रयत्नांमुळे मुंबईची गाडी रु ळावर आली. पुढल्याच वर्षी हावरा ते हुगळी हा 24 मैलांचा रेल्वेफाटा सुरू झाला. 188क् पर्यंत व्यापारासाठी, सैन्याच्या हालचालीसाठी मुंबई-दिल्ली-कलकत्ता-मद्रास जोडणारं नऊ हजार मैलांचं देशव्यापी रेलजाळं विणलं गेलं. प्रगतीच्या त्या वेगाला अद्याप जगात तोड नाही. सामान्य माणसांच्या मनात मात्र त्या धावत्या, धूर ओकत्या लोखंडी राक्षसाबद्दल अढीच होती. त्याला त्यांनी ‘चाक्या म्हसोबा’ असं नाव ठेवलं होतं. 
 रेल्वेच्या त्या पसा:याची आर्थिक आणि शासकीय धुरा जरी ब्रिटिश सरकारने सांभाळली, मुनीम-मुकादमही गोरेच असले, तरी अंगमेहनत करणारे मजूर मात्र शंभर टक्के भारतीय होते. वाट सपाट करणं, दगड घडवणं, रूळ जोडणं वगैरे सारी कामं यंत्रंच्या मदतीशिवाय, सुबक हातमेहनतीनेच झाली. पण सगळ्या गाडय़ांची, वाफेची इंजिनं, इंजिनिअर्स, ड्रायव्हर्स इंग्लंडहूनच येत. इंजिन वेळेवर न पोचल्यामुळे बडोद्याची रेलगाडी सुरुवातीला बैलांनीच ओढली. महायुद्धांच्या काळात हिंदुस्तानातली इंजिनं मध्यपूर्वेत रवाना झाली. तेव्हा आगगाडय़ा रु ळांवर ओढायला हत्ती आणि क्वचित मजूरही जुंपले गेले!
हिंदुस्तानातल्याच, हिंदुस्तान्यांनीच घडवलेल्या त्या प्रचंड प्रकल्पात हिंदुस्तान्यांना मात्र सापत्न वागणूक मिळाली. त्यांच्यासाठीचा तिसरा वर्ग गैरसोयींचा गोठा होता!
‘रंगीबेरंगी पेहरावातले माणसांचे लोंढे, त्यांच्या गाठोडय़ा-बोचक्यांचे ढिगारे घाईघाईने तृतीय श्रेणीच्या डब्याच्या लहानग्या दारातून बाहेर पडतात त्याच वेळी तसेच लोंढे-ढिगारे त्याच दारातून उलटय़ा दिशेने, दाटीवाटीने आत घुसतात. त्या हालअपेष्टांत ब्राrाणांपासून शूद्रांपर्यंत सारे सर्व वर्णसमभावाने कोंबले जातात,’ हे एकोणिसाव्या शतकातच अमेरिकेच्या मार्कट्वेनच्या ध्यानात आलं. 
त्याच्यानंतर काही दशकांनीच महात्मा गांधींनी लिहिलं, ‘जमिनीवर जेमतेम बाराच माणसं बसू शकतील अशा त्या तृतीय वर्गाच्या डब्यात बत्तीसाहून अधिकजण कोंबले होते. सावळ्या हातापायांचा गुंता दिसत होता. निम्मे लोक अवघडून उभेच होते. साधे आळोखेपिळोखे देणंही अशक्य होतं. हजारो किडय़ामाश्यांनी उष्टावलेलं बुरसं अन्न खरकटय़ा, घाणोरडय़ा भांडय़ांतून, कळकट द्रोण-पत्रवळींतून वाढून येत होतं. जमिनीवरही सगळीकडे कच:याखरकटय़ाचा सडा होता. घाणीने ओसंडणा:या, पाणी-खराटय़ाचा कधीही स्पर्शसुद्धा न झालेल्या शौचालयाची अवस्था तर शोचनीय होती.’ 
 डब्याच्या दरवाजातल्या रेटारेटीमुळे बारकुडे लोक सरावाने खिडकीतून डब्यात चढत किंवा थेट टपावर स्थानापन्न होत. त्यांना रेलसेवक दंडुक्याने हाकलत. त्या उतारूंपाशी मळखाऊ रंगाच्या होल्डऑलसोबत हिरव्या फेल्ट-वेष्टणाचा, फुलपाखरी-फिरकीच्या झाकणाचा एक ‘थर्मास’ही असे. स्टेशनावर गाडी थांबली की इंजिन-ड्रायव्हरकडून त्या थर्मासात कढत पाणी आणायची जबाबदारी लहान मुलांची असे. डब्यांत धूर कोंदत, अंगावर कोळशाचे कण गोंदत रेलगाडी झुकझुक धावे. त्याच भारतीय रेल्वेच्या प्रथम वर्गात मात्र माफक दरात जगातला सर्वोत्तम ‘राज-रेली’ ऐशोआराम मिळतो असं मार्कट्वेनने नमूद केलं आहे. प्रथम वर्गातल्या ऐसपैस डब्यांत झोपण्याबसण्यासाठी गुबगुबीत गाद्यागिरद्या, अंघोळीची सोय, खाण्यापिण्याची लयलूट हे तर होतंच पण बूटपॉलिश-हजामत वगैरे सेवाही होत्या. डब्याखालच्या तळखान्यात बर्फाच्या लाद्या ठेवून, त्यांच्यावरून येणा:या हवेचे गार झोत डब्यात खेळवून एअर-कण्डिशनिंगही साधलेलं होतं. इंडियन इंपिरियल मेल या मुंबई ते कलकत्ता धावणा:या गाडीला फक्त प्रथम वर्गाचेच डबे होते. ती रम्य, महागडी गाडी दुस:या महायुद्धानंतर बंद पडली यात नवल नाही. 
त्याशिवाय आगगाडीत गरीब गोरे आणि उच्चभ्रू भारतीय यांच्यासाठी सेकंड क्लास होता. तिथे गो:या-काळ्यांचे कक्ष कटाक्षाने वेगळे ठेवले जात. गो:यांच्या सेवकांसाठी इंटर हा वर्ग होता. समर्थाघरच्या त्या सावळ्या श्वानांसाठी भारतीय पद्धतीचे संडास असत. सोयींमध्ये कितीही भेदभाव असला तरी दूर पल्ल्याचा प्रवास आणि त्यायोगे व्यापारउदीम, तीर्थयात्र, प्रियजनांची भेट हे सारं ब्राrाणा-शूद्रांना, गो:या-सावळ्या-काळ्यांना आगगाडीतून एकत्रपणो, एकसारखंच सुकर झालं.
सुरु वातीची भीड चेपल्यावर संस्थानिकांनी आपापल्या सोयीच्या, रु ंद-निरु ंद-अरु ंद रु ळांच्या विविध रेलगाडय़ा सुरू केल्या. कोचीनच्या राजाने तर त्याच्या रेल्वेलाइनच्या स्वप्नासाठी आपलं राज्यही पणाला लावलं. माथेरानची लाइट रेल स्थानिक श्रीमंत पारशांनी बांधली, तर कुर्डूवाडीच्या बार्शीलाइटची आखणी आणि आर्थिक बळही इंग्लंडहून आयात झालं. दाजिर्लिंगच्या ‘मेरे सपनों की रानी’वाल्या चिमुकल्या रूळवाटेसाठी आणि  दक्षिणोतल्या नीलगिरी रेल्वेसाठीही इंजिनिअरांनी कित्येक कल्पक आणि कसबी करामती केल्या. फ्रण्टियर मेल, तूफान मेल, आपली डेक्कन क्वीन वगैरे दिमाखदार आगगाडय़ांनी-रूळवाटांनी अधिकच भाव खाल्ला. 
पण एका आगीनगाडीने त्याहूनही पलीकडची मोठी जबाबदारी पेलली. दूरदेशातही आगगाडीच्या प्रवासहक्कासाठी सत्याग्रहाची कास धरणारे, स्वदेशातही नेहमी तृतीय वर्गानेच प्रवास करणारे बापूजी! त्या राष्ट्रपित्याचा रक्षाकलश तिस:या वर्गाच्याच डब्यातून दिल्लीहून अलाहाबादपर्यंत सांभाळून न्यायचं काम त्या खास गाडीने केलं. भारतासारख्या वैविध्यपूर्ण, अवाढव्य देशाला एक बांधणा:या रेल्वेजाळ्याच्या त्या प्रतिनिधीने त्या दिवशी खरंखुरं ‘रक्षा-बंधनाचं’ पुण्य कमावलं.
 
तिसरा वर्ग
आगगाडीने दूरच्या प्रवासाला निघालेल्या शूरवीराचा निरोप घ्यायला स्टेशनवर भाऊबंदांची भाऊगर्दी होई, हलकल्लोळ माजे. मग गर्दीवर उपाय म्हणून प्लॅटफॉर्म तिकिटांची शक्कल लढवली गेली.  खिसेकापू आणि चप्पलचोरांच्या बंदोबस्तासाठी रेल्वे पोलीस नेमले गेले. सुरुवातीला डब्यांत पायखानेही नव्हते. पुढे कुण्या एका ओखिलचंद्रांच्या लेखी तळतळाटामुळे तृतीयवर्गाच्या डब्यांना शौचालयं लाभली. मग दूर पल्ल्याच्या प्रवासात स्वच्छ अन्नाची सोय केली गेली. तीन लाकडी बर्थ आले. आडवं व्हायची सोय झाली. विसाव्या शतकात गाडय़ांना वीजपुरवठा झाला. कंगव्याच्या फटका:याने का होईना, सुरू होणारे पंखे आले.  प्रवासात विरंगुळा म्हणून स्वस्त पुस्तकं, व्हीलर कंपनीची वाचनालयं आली. मध्यमवर्गाचा तिस:या वर्गाचा प्रवास जरा सुसह्य झाला.
 
(लेखिका गेली तीस वर्षे सौदी अरेबिया 
आणि त्याआधी इंग्लंडमध्ये वास्तव्याला होत्या. ‘मानवाचा प्रवास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.)