ओंकार करंबेळकर
1990 साली व्हॉयेजर-1 या यानाने सहा अब्ज किमी अंतरावरून पृथ्वीचे छायाचित्र काढले तेव्हा पृथ्वीचे वर्णन पेल ब्लू डॉट (फिकट निळा बिंदू) असे करण्यात आले.
त्याला जगभरात प्रसिद्धी मिळाली. पेल ब्लू डॉट हा एक परवलीचा शब्दही झाला.
या समग्र अंतराळात आपले - म्हणजेच पृथ्वीचे अस्तित्व केवळ एका फिकट निळ्या बिंदूएवढेच असेल, तर मग
या अफाट अनंत विश्वात आणखीही कोणी ‘सोबती’ असतील का? - हा प्रश्न पुन्हा एकवार नव्याने कुरतडू लागला. ‘कुणी आहे का तिथे?’ हा प्रश्न माणसाच्या मनात सदैव होताच,
आता त्याचे उत्तर शोधण्याची मोहीम नव्याने सुरू झाली आहे. तिचेच नाव : ब्रेक थ्रू इनिशिएटिव्हज! आणि या मोहिमेचे सूत्रधार आहेत
खुद्द स्टीफन हॉकिंग्ज!
- त्याबद्दल..
णसाचे मन कायमच प्रश्नांचे मोहोळ होते.
उत्तरे सापडत गेली तसे प्रश्नही नव्याने गडद होत गेले आणि उत्तरांच्या शोधाचा ध्यास सतत पेटताच राहिला.
केवळ आदिम जाणिवांच्या आधाराने आपले जगणो रुजवणा:या आदिमानवाच्या काळापासून आजवरची माणसाची ङोप हा त्याच्या डोक्यात सतत कुरतडत राहणा:या प्रश्नांचाच प्रवास आहे!
भूक आणि हिंस्त्र प्राण्यांपासूनच्या संरक्षणाचे प्रश्न आवाक्यात आल्यावर मग मानवाचे लक्ष आसपास भरकटत गेले असले पाहिजे. डोक्यावरल्या अफाट निळ्या पोकळीत नियमाने उगवणारे-मावळणारे सूर्य-चंद्राचे तळपते गोळे, चांदण्यांच्या चमकत्या रेघा, वादळे आणि ज्वालामुखीचे न उलगडणारे तांडव हे असले पाहता-अनुभवताना अनेक नवी प्रश्नचिन्हे त्याच्या मनात उमटत होती, हे तर निश्चितच!
- मग त्याने आपल्या भवतालाचा अर्थ लावायला सुरुवात केली. काही तर्क लढवले. आडाखे बांधले. पृथ्वी सपाट असावी आणि सूर्य तिच्या भोवती फिरत असावा अशा समजुती शोधल्या. पुढल्या वाटचालीच्या प्रत्येक टप्प्यावरती ज्ञात माहिती आणि अंदाजावर माणूस निष्कर्ष काढू लागला.. ती प्रक्रिया अतिप्रगत विज्ञानाच्या आजच्या वर्तमानातही अव्याहत चालूच आहे!
पृथ्वी आणि मानवी जीवनाबद्दलच्या कुतुहलाबरोबरचे मानवाचे हे नाते त्याच्या स्वत:च्या अस्तित्वाइतकेच जुने आहे. विचाराच्या पहिल्या उगमापासूनच सुरू झालेले. आदिम.
त्या आदिम काळापासून माणसाला कुरतडणारा एक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे : या अफाट विश्वात जसा माणूस आहे, तसे अन्य कुणी आहे का? त्या तिथे. पलीकडे. तिकडे. कुणी आहे का?
पृथ्वीच्या भौगोलिकतेचा अंदाज आला, तिची काही रहस्ये उलगडली, तसा हा मूळ प्रश्न आणखीच त्रस देऊ लागला. उत्सुकता वाढवू लागला :
कुणी आहे का तिथे?
पृथ्वीच्या कक्षेबाहेरच्या अंतराळात काहीतरी असावे अशी शंका किंवा गृहीतक माणसाच्या मनात प्राचीन काळापासून होते. कदाचित अंतराळात फिरणा:या ग्रहांवरतीही आपल्यासारखेच कुणी जितेजागते असतील असे सतत त्याला वाटत होते. परग्रहावरील आपल्या ‘भावंडां’ना शोधण्याचा हा प्रवास आजतागायत सुरूच आहे.
नजीकच्या भूतकाळात कथा-कादंब:या आणि तंत्रदृष्टय़ा समृद्ध सिनेमांनी या ‘एलियन्स’च्या रंजक, अद्भुत कहाण्या रंगवून हे प्राचीन कुतूहल सतत जिवंत, जागते ठेवले.
गेल्या आठवडय़ात प्रसिद्ध अंतराळभौतिक शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्ज यांनी असे ‘एलियन्स’ - म्हणजे परग्रहांवर वस्ती करून असलेले असे कुणी - खरेच आहेत का, हे शोधून काढण्याची नवी मोहीम हाती घेतल्यानंतर यावर पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली आहे. परग्रहवासीयांना शोधण्यासाठी सुरू झालेली आजवरची ही सर्वात मोठी आणि सर्वात खर्चिक मोहीम आहे.
स्टीफन हॉकिंग्ज यांच्या मदतीला यावेळेस युरी मिल्नर हे अब्जाधीश आले आहेत. हॉकिंग्ज यांच्या या मोहिमेला लागणा:या दहा कोटी डॉलर्सचा खर्च मिल्नर उचलणार आहेत. हॉकिंग्ज यांची ब्रेक थ्रू ही मोहीम दहा वर्षे चालणार असून, पूर्वीपेक्षा दहापट अवकाशाची माहिती गोळा केली जाणार आहे. त्याचप्रमाणो रेडिओ स्पेक्ट्रमचे पाचपट अधिक स्कॅनिंग होणार असून, ते शंभरपट अधिक वेगाने होणार आहे. या शक्तिशाली मोहिमेसाठी तितक्याच ताकदीच्या दुर्बिणी वापरल्या जाणार आहेत. वेस्ट व्हर्जिनियामधील ग्रीनबँक टेलिस्कोप आणि ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सची पार्क्स टेलिस्कोपची मदत यामध्ये घेतली जाणार आहे.
या मोहिमेचे नाव आहे- ‘ब्रेक थ्रू एनिशिएटिव्हज’.
परग्रहावरील रहिवाशांचा शोध घेण्यासाठी यापूर्वी ग्रीनबँक आणि पार्क्स या अतिप्रगत दुर्बिणींचे वर्षातील केवळ काही तास खर्च केले जात असत. मात्र आता या ब्रेक थ्रू लिसन प्रकल्पासाठी या दुर्बिणींचा वर्षभरामध्ये काही हजार तास वापर केला जाणार आहे. या दुर्बिणी पृथ्वीनजीकच्या 1क्क्क् ता:यांच्या परिसरातील अत्यंत साध्या विमानाच्या रडारमधील ट्रान्समिशनचाही वेध घेऊ शकतात. त्यामुळे या प्रकल्पात एक लाख ता:यांजवळील माहितीचे स्कॅनिंग होणार असून, जवळच्या 1क्क् आकाशगंगांचाही शोध घेतला जाणार आहे. अंतराळातून येणारे रेडिओ संकेत शोधण्याचा आणि त्यांचे अर्थ लावण्याचा या दुर्बिणी प्रयत्न करतील. त्यावरून पृथ्वीच्या कक्षेपलीकडे कुण्या परग्रहावर कुण्या ‘रहिवाशा’चे अस्तित्व आहे की नाही याचा वेध घेतला जाईल. जर पृथ्वीवरील मानवापेक्षाही प्रगत असे जीवन आणि संस्कृती अस्तित्वात असेल तर त्यांनी पाठविलेले संकेत मिळविण्याचा प्रयत्न या प्रकल्पाद्वारे होणार आहे.
आपण या विश्वात एकटे आहोत का?
- या आदिम प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या ध्यासाने झपाटलेले स्टीफन हॉकिंग्ज या प्रकल्पाला अक्षरश: भिडले आहेत.
‘सर्वार्थाने प्रगत अशा माणसाने जे माहिती आहे त्यावर समाधान मानून गप्प न बसता अधिकाधिक विचार, अभ्यास आणि माहिती गोळा करण्याची गरज आहे’ असा आग्रह धरणारे हॉकिंग्ज म्हणतात, ‘‘आपण या विश्वात केवळ एकटेच आहोत का हे माणसाने शोधले पाहिजे.’’
भारतीय पुराणो किंवा ग्रीक प्राचीन पुराणांमध्ये, अनेक प्राचीन संस्कृतीमध्ये, त्यांच्या परंपरा आणि चालीरितींमध्ये परग्रहवासीयांनी स्थान मिळविल्याचे दिसून येते. विज्ञानकथा आणि कादंब:यांमध्येही पृथ्वीपल्याडच्या कुण्या वावरत्या जीवसृष्टीच्या अस्तित्वाच्या संकल्पनेचा वापर सातत्याने केला गेला आहे. अनेकदा परग्रहवासीयांनी पृथ्वीला भेट दिल्याच्या (यूएफओ नावाच्या उडत्या तबकडय़ा) किंवा त्यांचे यान दिसल्याच्या अफवाही उठविल्या जातात. हे परग्रहावरील मानव तबकडीतून प्रवास करत असावेत असेही आपण गृहीत धरल्यामुळे अनेक चित्रपट, काटरून्समध्ये त्यांनी शिरकाव केल्याचे दिसते. बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये अशा चित्रपटांना विशेष मागणीही असते आणि त्यांची निर्मितीही मोठय़ा संख्येने होते. यावरूनच परग्रहावरील अज्ञात जीवनाबाबत असलेले आपले कुतूहल किती उत्कट आणि अद्भुतही आहे, हे सिद्धच होते.
काय सांगावे?
- ‘कुणी आहे का तिथे?’ या प्रश्नाचे उत्तर मिळेलही!
त्या उत्तराकडे स्टीफन हॉकिंग्ज यांच्या कुलातल्या शास्त्रज्ञांइतकेच स्टीव्हन स्पीलबर्गच्या तोडीच्या कलावंतांचेही लक्ष असेल, हे मात्र नक्की!
ग्रीनबँक टेलिस्कोप
रॉबर्ट बेअर्ड ग्रीनबँक या दुर्बिणीची निर्मिती अमेरिकेतील वेस्ट व्हजिर्नियामध्ये 1991 ते 2क्क्1 या कालावधीमध्ये करण्यात आली. अत्यंत शक्तिशाली अशा या दुर्बिणीचा वर्षभरामध्ये 65क्क् तास वापर शास्त्रज्ञ करतात. प्रत्येकवर्षी या दुर्बिणीला शेकडो नागरिक भेटही देतात.1क् कोटी डॉलर्स खर्चणारे युरी मिल्नर
युरी मिल्नर हे रशियामध्ये जन्मलेले अब्जाधीश उद्योगपती आहेत. मिल्नर यांनी भौतिकशास्त्रमध्ये पीएचडी मिळविली असून, संशोधनशास्त्रमध्ये त्यांना विशेष रस आहे. संशोधन वाढीस लागावे त्याचप्रमाणो निरनिराळ्या ज्ञानशाखांचा विकास व्हावा यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात. पदार्थविज्ञान, जैवशास्त्र तसेच गणित आदि विषयांतील शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांना त्यांनी अनेकदा प्रोत्साहनपर पुरस्कार दिलेले आहेत. ‘ब्रेक थ्रू..’ बाबतही त्यांचे मत अत्यंत थेट सरळ आहे- ‘‘आपण या विश्वात एकटेच आहोत का हे शोधलेच पाहिजे. ते न शोधणो आपल्याला परवडणार नाही’’ असे सांगत त्यांनी स्टीफन हॉकिंग्ज यांच्या या प्रकल्पासाठी 1क्क् दशलक्ष रुपये दिले आहेत. या भल्याभक्कम आर्थिक सहाय्यामुळेच या महागडय़ा शोधमोहिमेची सुरुवात झाली आहे.
1961 साली रशियन अंतराळवीर युरी गागारिनने अंतराळ प्रवास केला होता. युरी मिल्नर यांचा जन्म त्याच वर्षी झाला होता आणि गागारिनच्या प्रेरणोतूनच त्याचेही नाव युरी असे ठेवण्यात आले.
ब्रेक थ्रू मेसेज
ब्रेक थ्रू लिसन हा पहिला टप्पा चालू असतानाच या मोहिमेच्या दुस:या टप्प्याची संकल्पनाही आकाराला आणली जाईल. त्याचे नाव आहे ब्रेक थ्रू मेसेज.
जर पृथ्वीच्या कक्षेपलीकडल्या विश्वात अन्य कोणती संस्कृती अस्तित्वात असल्याचे सापडले, तर या परग्रहावरल्या ‘भावंडां’ना आपण मानव कोणता संदेश (कसा) पाठवू? - या प्रश्नाभोवती हा टप्पा डिझाईन केला जात आहे.
पृथ्वीवरील मानवी वसाहतीबद्दल माहिती सांगणारा संदेश डिजिटल संकेतांमध्ये पाठविण्यासाठी जागतिक पातळीवर स्पर्धा घेण्याचाही विचार यामध्ये केला जात आहे.
मात्र या मोहिमेचा सर्वाधिक भर हा संदेश पाठविण्यापेक्षा कोणता संकेत किंवा संदेश आपण (परग्रहावरल्या संभाव्य वसाहतीकडून) मिळवू शकू यावर असणार आहे.
ब्रेक थ्रू लिसन
1. ब्रेक थ्रू मोहिमेचे दोन भाग करण्यात आलेले आहेत.
2. या मोहिमेतील पहिला महत्त्वाचा भाग आहे ब्रेक थ्रू लिसन.
3. यामध्ये दुर्बिणींच्या साहाय्याने पृथ्वीच्या कक्षेपलीकडल्या विश्वात कोणती इतर संस्कृती नांदते आहे का याचा वेध घेतला जाईल.
स्टीफन हॉकिंग्ज यांचे ‘ब्रेक थ्रू’ सहकारी
ब्रेक थ्रूमध्ये स्टीफन हॉकिंग्ज यांच्यासह कोरी बार्गमन, सराह ब्राईटमन, मॅग्नस कार्लसन, डिंग चेन, फँ्रक ड्रेक, अॅन ड्रय़ुआन, पॉल होरोवित्झ, गॅरिक इस्रायलीयन, लिसा काल्टेनेगर, निकोलाय कार्दशेव्ह, मार्क केली, एरिक लँडर, अॅलेक्सी लेनिओनोव्ह, अवी लिओब, सेथ मॅकफार्लन, जिऑफ मर्सी, लॉर्ड मार्टीनरीस, केनेथ रोमॉफ, डिमिटर सेसोलोव्ह, साराह सिगार, सुजन सेनगुप्त, एडवर्ड मिटन, पीट वोर्डेन, सेथ शोस्ताक, थॉमस स्टॅफोर्ड, जील तार्तार, किप थॉजर्, जेम्स व्ॉटसन, स्टीव्हन विंडेनबर्ग, सिन्या यामानाका अशा ख्यातमान शास्त्रज्ञांचा समावेश आहे. अनेकांनी विविध विद्यापीठांमध्ये अध्यापनाचे काम केलेले आहे. यापैकी काही शास्त्रज्ञांना नोबेलसारख्या पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.
पेल ब्लू डॉटपासून आजर्पयत
परग्रहवासीयांच्या संभाव्य वसाहतीची माहिती मिळविण्याची महत्त्वपूर्ण सुरुवात व्हॉयेजर यानाच्या निमित्ताने झाली. कार्ल सेगन या जगप्रसिद्ध विचारवंत आणि अंतराळ भौतिकशास्त्रज्ञाचा यामध्ये मोठा वाटा होता.
शनीचा चंद्र टायटनच्या पृष्ठभागावर द्रवपदार्थ आणि गुरूचा उपग्रह युरोपावर बर्फ असण्याची शक्यता ज्या तज्ज्ञांनी बोलून दाखविली होती त्यामध्ये सेगन यांचा समावेश होतो. व्हॉयेजरवर गोल्डन व्हॉयेजर रेकॉर्ड’ नावाची ग्रामोफोनच्या तबकडीप्रमाणो तबकडी बसविण्यात आली. त्यामध्ये पृथ्वीवरील सर्व घटकांची माहिती देणारी चित्रे त्याचप्रमाणो आवाजही साठविण्यात आलेले होते. 1977 साली सोडलेल्या या यानाने प्लूटोला ओलांडून आप्लाय सूर्यमालेच्या बाहेरच्या अंतराळात प्रवेश केला आहे. 199क् साली व्हॉयेजरने काढलेले प्रसिद्ध पेल ब्लू डॉट हे छायाचित्र प्रसिद्ध झाले. ‘मला विश्वास ठेवायचा नाही, तर मला जाणून घ्यायचे आहे’ अशीच भूमिका सेगन यांनी स्वीकारली होती. परग्रहावर राहणा:या एलियन्सचा शोध किंवा त्यासंदर्भात माहिती मिळविण्याच्या पेल ब्लूपासून सुरू झालेल्या मोहिमेस आता गती येईल.
स्टीफन हॉकिंग्जना
मदत करायची इच्छा आहे?
परग्रहवासीयांना शोधण्यासाठी सुरू होणा:या या मोहिमेमध्ये तुम्ही घरबसल्या सहभागी होऊ शकता. त्यासाठी तुमच्याकडे अँड्रॉईड फोन असण्याची गरज आहे. बर्कले ओपन इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नेटवर्क कम्प्युटिंग अॅपद्वारे तुम्ही या दोन महाकाय दुर्बिणींनी गोळा केलेल्या माहितीचे क्राऊडसोर्सिंगद्वारा पृथ:करण करण्यास मदत करू शकता.
यामध्ये तुमच्या फोनमधील कोणत्याही डेटाचा वापर केला जाणार नाही. त्याचप्रमाणो जेव्हा आपल्या फोनचे चार्जिंग सुरू असेल तेव्हाच हे अॅप आपले कार्य सुरू करेल. त्यामुळे तुमच्या फोनची बॅटरी कोणत्याही प्रकारे खर्च होणार नाही याची काळजी हे अॅप घेईल.
(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत
उपसंपादक आहेत)
onkark2@gmail.com