शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
3
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
4
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
5
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
6
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
7
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
8
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
9
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
10
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
11
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
12
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
13
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
14
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
15
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
16
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
17
"उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य असेल, तर रद्द करा"; ठाकरेंच्या मागणीवर एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, "ही जुनी पोटदुखी आहे"
18
आधुनिक फीचर्ससह भारतात लॉन्च झाली Harley Davidson ची नवीन X440T; किंमत फक्त...
19
आफ्रिकेतील आणखी एका देशात सत्तापालट, लष्कराने टीव्हीवर लाईव्ह येत राष्ट्रपतींना हटवलं
20
मालिका विजयानंतर विराटने रोहितची घेतली गळाभेट, तर गंभीरसोबत..., व्हिडीओ होतोय व्हायरल  
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तकं सांगतात गोष्ट: कामाठीपुऱ्याचं न संपणारं कुतूहल

By मनोज गडनीस | Updated: August 24, 2025 12:14 IST

Kamathipura: काही जागा आपल्याला माहिती असतात. पण त्या आपण जगलो नसल्यामुळे म्हणा किंवा त्यांचं अस्तित्व आपल्या नेणीवेपर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे म्हणा, तिथल्या संस्कृतीची नस आपल्याला सापडू शकत नाही.

- मनोज गडनीसकाही जागा आपल्याला माहिती असतात. पण त्या आपण जगलो नसल्यामुळे म्हणा किंवा त्यांचं अस्तित्व आपल्या नेणीवेपर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे म्हणा, तिथल्या संस्कृतीची नस आपल्याला सापडू शकत नाही. परिणामी, एका जळजळीत अनुभवापासून आपण वंचित राहतो. परंतु, खुलं झालेलं मन कुतूहलाच्या वाटेवरून त्या जागेच्या अंतरंगाचा ठाव घेण्यासाठी जातं तेव्हा तिथले दाहक क्षितिज आपल्यातल्या खुजेपणाची जाणीव करून देतं. माझ्याबाबतीत गोंधळात्मक वर्णनाच्या मांडणीच्या आजूबाजूचा अस्वस्थ अनुभव सुधीर जाधवलिखित ‘कामाठीपुरा’ वाचताना सातत्याने येत राहतो. एक मन कुतूहल क्षमविण्यासाठी पुस्तकाची पुढची पानं भराभरा वाचू लागतं तर दुसरं कामाठीपुऱ्यातील भीषण जगण्याच्या जळजळीत वास्तवाची अनुभूती घेण्यासाठी नव्हे तर पचविण्यासाठी थांबण्याची खूण करत राहतं. मनाच्या अशा विकट हिंदोळ्यावरून लेखक माझ्या खांद्यावर हात टाकून कामाठीपुरा दाखवतो.

आत्मानुभूतीला मिळालेल्या चित्रमय शब्दांची जोड म्हणजे सुधीरचे आयुष्य. त्याचा परिघ. त्याच्यासारख्या अनेक तरुणांच्या जडणघडणीचा दस्तावेज. लेखक म्हणून सुधीरचे हे पहिलेच पुस्तक. पण अफाट निरीक्षणशक्ती आणि जे दिसतं ते जसंच्या तसं नेमक्या शब्दांत मांडण्याची हातोटी त्याला लाभली आहे. त्यामुळेच पुस्तकाचं पहिलं पान वाचतानाच सुधीर आपल्याला कामाठीपुऱ्यात घेऊन जातो. या भ्रमंतीमध्ये जेव्हा नकळत पुस्तकाच्या पान क्रमांकावर नजर जाते तेव्हा भान येत , शंभर पानं तर आपण आत्ताच वाचून काढली... मग पुन्हा पुस्तक हातात घेईपर्यंत सुधीर आणि त्याचा कामाठीपुरा शांत बसूच देत नाही. तो तुमच्यातला अधाशी वाचक जागा करतो.

सुधीरच्या पुस्तकातून कामाठीपुरा फिरताना, मला तिथल्या लोकजीवनात दिसली एक विषण्ण विपन्नावस्था. मात्र या विपन्नावस्थेवर आनंदी राहण्याची पावडर-लाली चढवलेली आहे. इथल्या बेईमानीच्या दुनियेत एक इमानदारी आहे. त्यांचे काही उसूल आहेत. इथल्या लोकांनी सहानुभूती फाट्यावर मारलीये. मुंबई माझे कार्यक्षेत्र. त्यामुळे मला ती चांगली माहितीये, या माझ्या भ्रमाला या पुस्तकाने भानावर आणलं. माझ्या घरापासून अवघ्या आठ-दहा किलोमीटरवर असलेला कामाठीपुरा नवा नव्हता. कित्येकवेळा त्या रस्त्यावरून जाणं झालं. म्हणून मला कामाठीपुरा ही केवळ एक जागा म्हणून माहित होती, त्याच्या अंतरंगांची जाणीवही नव्हती. मध्यमवर्गीय धारणांमुळे कामाठीपुरा म्हणजे वेश्यावस्ती, एवढीच मर्यादीत अक्कल ! पण १४ गल्ल्यांपैकी केवळ तीन गल्ल्या म्हणजे वेश्यावस्ती आणि पहिल्या १२ गल्ल्या आहेत त्या अपरिहार्यतेच्या नौकेत स्वच्छंद, बेफिकीर, क्वचित विकृतीच्या सर्वोच्च आविष्काराचे वारू शिडात भरून आपल्याच मस्तीत फिरणाऱ्या ! हे पुस्तक आवर्जून वाचा. कारण त्यातून कामाठीपुऱ्याबद्दल असलेलं कुतूहल शमण्यास नक्की मदत होईल.

टॅग्स :Mumbaiमुंबईhistoryइतिहास