शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
4
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
5
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
6
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
7
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
8
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
9
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
10
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
11
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
12
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
13
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
14
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
15
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
16
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
17
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
18
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
19
Nana Patekar : नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
20
'झिरो फिगर'च्या होण्यासाठी केलं खतरनाक डाएटिंग! तरुणी मरता मरता वाचली; भयानकच अनुभव..

ताकाची रवी आणि बटर चर्नर

By admin | Updated: March 14, 2015 18:16 IST

ताक घुसळून कृष्णाच्या गोपींचे हात दुखले असतील.. त्यांना काय माहीत, लस्सी वॉशिंग मशीनमध्येसुद्धा बनवता येते!!

नितीन कुलकर्णी
आपल्याला सुचलेल्या कल्पनेला (आयडिया) आकार देणे, घडवणे आणि उपयोग-योग्य त्याचबरोबरीने सौंदर्यपूर्ण बनवणे ही झाली डिझाइन या विषयाची सोपी आणि मूलभूत मांडणी. जगत असताना दैनंदिन कामकाजात व उद्योगधंद्यात वस्तू, साधनं तसेच कार्यप्रणालींची परिणामकारकता वाढवणं हेही त्यातच आलं. या वैचारिक मांडणीनुसार या जगात कोणीही डिझाइनचा प्रणेता असू शकतो. म्हणजे अशिक्षित आणि निर्धनदेखील.
एकदा मी एका भिकार्‍याला एका प्रसिद्ध साधुबाबाच्या वेषात भीक मागताना पाहिले होते आणि हे दृश्य अचंबित करून गेले. पांढरी दाढी आणि डोक्याला विशिष्ट प्रकारे बांधलेले फडके असे रूप घेऊन बसलेला भिकारी म्हणजे खरोखरचे साधुबाबा नाहीत हे माहीत असतानाही त्याला कोणी घवघवीत भीक देऊ केली तर नवल नाही. या अनुभवाचे उदाहरण म्हणून शोध घेताना एक रंजक किस्सा समजला. एका लो-बजेट सिनेमाचा निर्माता त्या बाबांवर सिनेमा काढू इच्छित होता. प्रमुख भूमिकेसाठी नटाच्या शोधात असताना एके दिवशी रेल्वे स्टेशनवर  त्या बाबांच्याच वेषात भीक मागताना एक इसम दिसला आणि त्यालाच त्या निर्मात्याने मुख्य रोल देऊ केला.
कल्पकता ही उपजीविकेच्या साधनाचा अहम हिस्सा होऊ शकते, ती अशी!
रोजच्या जगण्याच्या धामधुमीत आपल्याला अनेक समस्या येत असतात. त्यातल्या काही आपण सोडवू शकतो. बरेचसे भाग हे आपल्या आवाक्यातले नसतात. कालांतराने आपल्याला असंही लक्षात येतं की आपल्याला भेडसावणार्‍या समस्येवर मात करणारं प्रॅाडक्ट बाजारात आलं आहे.. किंवा अस्तित्वात असलेल्या वस्तूची सुधारित आवृत्ती पण आली आहे. 
अशावेळी तुमच्या मनात नक्की एक प्रश्न आला असेल : माझी अडचण या डिझायनरला नेमकी कशी काय समजली? माझ्या मनातलं या डिझायनरने नेमकं कसं ताडलं? 
मुळातच डिझाइनच्या अभ्यासक्रमात प्रॉब्लेम आयडेण्टीफिकेशन आणि  डेफिनेशन  हा भाग खूप महत्त्वाचा मानला जातो. वैयक्तिक आणि सार्वत्रिक परिस्थितीत असलेला संबंध लक्षात घ्यावा लागतो. हे सारं संशोधनाअंती साध्य केलं जातं.  
कार्ल उलरीच या अभ्यासकाच्या म्हणण्यानुसार ‘उपयोग करणार्‍याच्या अनुभवातील कमतरतेची जाणीव हीच कुठल्याही डिझाइनची पहिली पायरी होय.’ 
- नंतर ती अडचण सुधारणेतून कशी दूर करायची याच्या काही आराखड्यांच्या शक्यता तयार होतात. नंतर एक सुयोग्य आराखडा निवडून त्याची पहिली प्रतिकृती बनवली जाते. त्या प्रतिकृतीची चाचणी घेऊन मग ते डिझाइन निर्मितीसाठी सज्ज होतं.
सायीचं दही रवीने घुसळून ताक व लोणी काढण्याचा अनुभव तुम्ही कधी घेतला आहे का? हे काम म्हणून कितीही कंटाळवाणं असलं, तरीही लोणी वर तरंगायला लागल्यावर क्षणभर का होईना, एक आनंदाची लहर तरळून जाते. परंतु घाईगडबडीच्या वेळेस असंही वाटून जातंच, की ताक करायचं मशीन असतं तर? ताकाच्या भांड्यात कितीतरी वेळ रवी घुसळताना हात तरी दुखले नसते!  
या घुसळण्याचा कंटाळा येऊन आपण सर्वांनीच मिक्सरच्या मोठय़ा भांड्यात ताक बनवून बघितलंय!  पण असं वाटतंच ना, की ती मजा नाही आली बुवा!
हॅण्ड मिक्सरचीसुद्धा हीच गत. 
- आता हा झाला डिझाइनचा विषय!
 नित्याच्या जीवनातली एक अडचण आपण शोधली. आता कल्पकतेच्या साहाय्याने आपण या डिझाइनच्या विचाराचं रूपांतर प्रत्यक्ष वस्तूत करू शकतो; आणि ते करण्याअगोदर त्या वस्तूचा आराखडा, स्केच करावा लागेल.. पण थांबा ! 
अगोदरच एका डिझाइनरने ते करून ठेवलंय! तिचं नाव अपूर्वा कोचरगावकर. प्रॉडक्ट डिझाइनचा कोर्स करताना तिने आपल्याअगोदरच असा विचार करून ठेवलाय. फळांचा ज्यूस काढणार्‍या यंत्राची प्रेरणा घेऊन हा ढाचा तिने बनवलाय. अर्थात, या डिझाइनचं प्रत्यक्ष प्रॉडक्टमध्ये रूपांतर करणारा कोणी निर्माता अजून गवसला नाहीये. 
संकल्पनांच्या पातळीवर डिझाइनच्या संस्था खूप चांगलं काम भारतात करत आहेत. परंतु उत्पादनाच्या संदर्भातील इतर अनेक अडचणींमुळे काही  इनोव्हेशन्स उत्पादित होऊ शकत नाहीत. लोणी काढायच्या साधनांचा इतिहास बघितला तर वेधक ठरावा. 
पहिलं रूप म्हणजे भटक्या जमातींनी वापरलेल्या बोकडाच्या चामड्याच्या पिशव्या. या पिशव्यांमधे मलई भरून ते मिश्रण जोरजोरात हलवलं जाई, पिशवीच्या आतल्या बाजूला लोणी जमा होई. दुधदुभत्याच्या उद्योगधंद्यांसाठी जास्त प्रमाणात लोणी काढण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध होते. लाकडी पिंपांच्या साहाय्याने बनवलेल्या घुसळण यंत्रात पूर्ण पिंप हलवण्याची सोय होती. धातूपासून बनवलेली हाताने चालवण्याची यंत्रंदेखील वापरात होती.
सगळ्यात वेधक आहे तो १९२0-३0 च्या दशकांमधे प्रसिद्ध झालेला अमेरिकन डेझी ब्रॅण्डचा घरगुती वापरासाठी बनवलेला लोणी घुसळण जार.  
दिसायला अगदी सोपा, काचेच्या बरणीच्या झाकणावर बसवलेले हॅण्डल व त्याला जोडलेल्या बरणीत उतरलेलं लाकडी पातं. हा जार बघण्यातूनच आपण चालवू लागतो आणि हातावर पडणार्‍या जोराबरोबर घुसळण्याचा आवाजही आपण मनात ऐकू लागतो. पुढे याच कंपनीचे इलेक्ट्रिकवर चालणारे जार पण निघाले. आपल्याकडे मात्र अशा प्रकारचं कुठलंही यंत्र प्रचलित झालेलं दिसत नाही. कदाचित आपला परंपरावाद यास कारणीभूत असावा. 
कृष्ण व त्याच्या लोणीचोरीच्या कॅलेंडरांमधे दिसणारी हंड्यातली रवी दोर्‍यांनी फिरवण्याच्या तंत्रापलीकडे आपलं डिझाइन गेलेलं दिसत नाही. 
- अर्थात आपल्या नित्याच्या लोणी काढण्याच्या सुखद अनुभवाने हे सिद्ध होतं.
 
लस्सी घुसळणारं वॉशिंग मशीन
 
पंजाबमधे काही वर्षांपूर्वी वॉशिंग मशीनने बनवलेली लस्सी खूप प्रसिद्ध झाली होती. स्थानिक उत्पादकांनी अशा प्रकारची स्वस्त आणि टिकाऊ यंत्रं बनवायला सुरुवात केली होती. लस्सी बनवणारी  वॉशिंग मशीन्स  छोट्या दुकानात बसवणं गैरसोयीचं असल्यामुळे काहींनी तर साध्या टेबलफॅनचा सांगाडा वापरून त्याला छोटी पाती बसवून लस्सी मेकर्स बनवले. असे अनेक जुगाड ग्रामीण भागातदेखील प्रचलित दिसतात. अशा जुगाडांचा उल्लेख डिझाइनसंदर्भातल्या अनेक केस स्टडीजमधे केला जातो.  यातूनच ‘जुगाड डिझाइन’ असा नवीन शब्ददेखील प्रचलित झाला आहे. 
आता सिनेमांमधूनदेखीाल अशा जुगाडांचा पुरस्कार केला जातो. ‘जब वी मेट’ या सिनेमात मौजा मौजा या गाण्याच्या सुरुवातीलाच अशा प्रकारच्या टॉप लोडिंग मशीनमधे बनवलेली लस्सी वाटप करण्याचा सीन आहे. थ्री इडियट्स या सिनेमातही अशा प्रकारचं जुगाड दाखवलं होतं.