शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

असा हा सांस्कृतिक धागा...

By admin | Updated: June 22, 2014 13:11 IST

इंडियन इंटरनॅशनल मल्टिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. प्रमोद तलगेरी यांना नुकताच आंतरराष्ट्रीय स्तरावरचा र्मक- टागोर पुरस्कार प्राप्त झाला आहे. र्जमन भाषेच्या भारतातील प्रसाराबद्दल व सांस्कृतिक बंध दृढ केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो.

पराग पोतदार

इंडियन इंटरनॅशनल मल्टिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. प्रमोद तलगेरी यांना नुकताच आंतरराष्ट्रीय स्तरावरचा र्मक- टागोर पुरस्कार प्राप्त झाला आहे. र्जमन भाषेच्या भारतातील प्रसाराबद्दल व सांस्कृतिक बंध दृढ केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. त्यानिमित्ताने.. 

---------
काही माणसं ही प्रसिद्धीपराड्मुख राहून बरेच चांगले काम करत असतात. अनेकदा जवळ असून आपल्याला त्या कामाची व्याप्ती लक्षात येत नाही, तसेच त्या माणसाचे मोठेपणही. वैविध्यपूर्ण आणि अद्ययावत शिक्षण देणार्‍या इंडियन इंटरनॅशनल मल्टिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. प्रमोद तलगेरी हे असेच व्यक्तिमत्त्व. प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा फारसा आटापिटा न करता आपल्याला जे आवडते, भावते, त्यात मनापासून रमणारे असे हे व्यक्तिमत्त्व. र्जमन भाषा आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी त्यांनी भारतात राहून केलेल्या कामाबद्दल त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरचा प्रतिष्ठेचा असा टागोर पुरस्कार नुकताच प्राप्त झाला आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराचे मोल बंगालमध्ये अधिक चांगल्या रीतीने लक्षात आले. तेथील वृत्तपत्रांतून त्यांच्याविषयी भरभरून लिहिलेही गेले. र्मक लिमिटेडतर्फे हा पुरस्कार गेल्या दोन वर्षांपासून सुरू करण्यात आला आहे. हा केवळ एक पुरस्कार नसून, कित्येक वर्षांपासून चालत आलेल्या भारत-र्जमनी या दोन देशांतील सांस्कृतिक, भाषिक व साहित्यिक संबंधांमधील तो आणखी एक दुवा आहे. आणखी एक विशेष म्हणजे भारतामध्ये र्जमनी भाषा शिकवण्यास सुरुवात झाली, त्याला १00 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने हा पुरस्कार मिळणे, ही आणखी एक कौतुकाची बाब आहे. 
भारत-र्जमनी संबंधांची पूर्वपिठीकाही सुंदर आहे. १६६८मध्ये अर्थात तब्बल ३४५ वर्षांपूर्वी र्जमनीत स्थापन झालेली र्मक कंपनी आजही कार्यरत आहे. १९१३मध्ये एलिझाबेथ र्मक हे अध्यक्ष होते. त्यांना साहित्याची आवड होती. रवींद्रनाथ टागोरांचे ‘चित्रांगदा’ त्यांच्या वाचनात आले. ते त्याच्या प्रेमात पडले. त्यातूनच टागोरांचे समग्र साहित्य र्जमन भाषेत आणले गेले. टागोर आणि र्मक कुटुंबाचे संबंध तेव्हापासून अधिक जवळचे बनले. १९२१मध्ये रवींद्रनाथ टागोरांना र्जमनीत निमंत्रित करण्यात आले. १९२१मध्ये टागोर र्जमनीत गेले, तेव्हा पहिले महायुद्ध होऊन गेले होते. त्यामुळे त्या अस्थिर, अशांत वातावरणात टागोरांसारखा माणूस र्जमनीच्या लोकांना देवदूतच वाटला. पुढे ही कंपनी भारतातही आली. हे संबंध दृढ करण्याच्या हेतूनेच र्मक-टागोर पुरस्कार सुरू करण्यात आला. त्याच्या ग्लोबल कमिटीने मार्टिन कँपशेन यांना २0१२चा पहिला टागोर पुरस्कार दिला व या वर्षी डॉ. तलगेरींना कोलकत्त्यात सन्मानित करण्यात आले. 
डॉ. तलगेरी हे ५५ वर्षांपूर्वी र्जमन शिकले, तेव्हा सार्‍यांनीच त्यांना वेड्यात काढले होते. तेव्हा परिस्थितीच तशी होती. र्जमन सरकारची स्कॉलरशिप मिळवून ते १४ दिवसांचा बोटीने प्रवास करून र्जमनीत गेले. तिथे प्राचीन संस्कृतीचे दर्शन घेतले. त्यांच्या अभ्यासविषयासाठी लॅटीन भाषाही शिकले व डॉक्टरेट मिळवली. सध्या व्हिएन्ना विद्यापीठासोबत, तसेच आयआयटी, हिमाचल प्रदेश यांच्या समवेत विविध प्रकल्पांवर ते कार्यरत आहेत. इंडो-र्जमन कन्सल्टंट ग्रुपच्या माध्यमातूनही त्यांचे काम सुरू आहे. 
 
(लेखक लोकमत पुणे आवृत्तीमध्ये वरिष्ठ उपसंपादक आहेत.)