शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पोटासाठी? ..पाण्यासाठी!

By admin | Updated: May 14, 2016 13:56 IST

मुलं-माणसं आणि गाव मागे सोडून ठाण्याला वागळे इस्टेटच्या दुष्काळी छावणीत जीव जगवायला आलेल्या कुटुंबांबरोबर एक दिवस.

- योगेश बिडवई
 
पाणी हाय इथं. त्यामुळे थोडं समाधान हाय. संडास-बाथरूमची सोय हाय. राशन दिलंय. भरपूर सोय हाय. शनिवार-रविवारी जेवण मिळतंय. कोपरीत साफसफाईचं काम करतोय. चांगली सोय झाली तर थांबू इकडंच.’’
- दुष्काळामुळे मुंबईत कामधंदा शोधण्यासाठी आलेले नांदेड जिल्ह्यातील राठोडवाडीचे (ता. मुखेड) संग्राम विठ्ठल जाधव त्यांचे अनुभव सांगत होते. ठाण्यात वागळे इस्टेट भागातील रामनगरमध्ये शिवसेनेने दुष्काळग्रस्तांसाठी उभारलेल्या छावणीत संग्राम जाधव यांना आसरा मिळालाय. 
बायको, दोन मुली, भावोजी, बहीण, तिचा एक मुलगा, दोन मुली आणि पुतणीला घेऊन ते मुंबईत आले. ‘‘गावाकडं ढोरं-वासरं आहेत. म्हातारी माणसं गावाकडंच हाय. त्यांना कुठं इथं आणणार? आम्हालाच इथलं काही माहीत नाही. कामावरनं घरी यायचं म्हटलं तरी विचारत विचारत यावं लागतं. ऊस तोडणारे आम्ही. बाकी दुसरं काम येत नाही. त्यामुळं इथं साफसफाई अन् मुजरीचं काम करतोय. मी-बायको, बहीण-भावोजी दिवसभर कामावर जातो. कधी काम मिळतं, कधी मिळत नाही. दोन दिवसांपासून काम नाही’’ - संग्राम जाधव सांगत होते. दोन पोते भरतील एवढं सामान त्यांनी गावाकडून आणलं. भांडी-कुंडी, कपडे, अंथरूण- पांघरूण सोबत आणलं आहे. सकाळी स्वयंपाक करून कामावर जायचं. काम झाल्यावर कुडक-मुडक (लाकडं) गोळा करत यायचं आणि चुलीवर स्वयंपाक बनवायचा. 
‘‘तसं बरं हाय इथं. पाणी हाय. चांगली सोय झाली तर थांबू इथंच. इथून एखाद्या चाळीत खोली भेटली तरी बरं होईल’’ - जाधव यांची पत्नी आणि बहीण सांगत होती. ‘‘आम्ही अडाणी लोक आहोत. मेहनती आहोत. काम मिळणार असंल तर लेकरांना पुन्हा गावी सोडू. त्यांची शाळा पुढच्या महिन्यात हाय. शिकूनही ती काय करणार? नोकरीला पैसे कुठून आणणार?’’ - जाधव यांचे भावोजी हरी राठोड बोलत होते. ‘‘बंजारा लोकांना कुठली आलीय नोकरी? चार पैसे गावाकडं पाठवता आले तरी खूप झाले.’’ ऊसतोडीसाठी जाधव-राठोड कुटुंब दरवर्षी कर्नाटकात जातं. मात्र मुंबई-ठाणो त्यांना नवं आहे. जाधव-राठोड कुटुंबाला इथं पावसाची चिंता आहे. पाऊस आला तर छप्पर कुठं शोधायचं? कारण गावाकडे लगेच काम मिळणार नाही. आबादीनगरचे (मुखेड) सुभाष पवार यांना दोन महिने झाले येथे येऊन. आधी महिनाभर ते मुंबईत होते, आता ठाण्यात छावणीत राहतात. पत्नी, दोन मुलांसह ते आले आहेत. एक मुलगा-एक मुलगी गावी आई-वडिलांकडे आहे. पवार यांनाही रोज काम मिळत नाही. कामासाठीच प्रत्येकाचा आटापिटा चाललाय. ‘‘कामासाठीच आलोय आम्ही. पण काम मिळंना. लेकरं सोडून आलोय. लेकरांना आठवण येतेय आमची. पहिल्यांदाच आलोय इथं. पण लयी माणसं आलीयत हो, कामच नाही’’ - सुभाष पवार सांगत होते. ‘‘पोरं म्हणतात, गावाकडं या. कवा येणार तुमी? पण तिकडं कामच नाही, काय खायचं? पोरं रडले तरी सोडून आलो त्यांना. सकाळी स्वयंपाक करून आम्ही नवरा-बायको रोज सकाळी कामावर जातो. लेकरं खेळत्या इथं बाकीच्या पोरासंगी. तसं भ्याव नाय इथं’’ - पवार यांची पत्नी लक्ष्मीबाई त्यांचे मुंबईतले कोरे अनुभव सांगत होत्या. त्यांच्या शेजारीच आबादीनगरचे प्रकाश पवार यांचं बि:हाड होतं. त्यांची पत्नी शोभाताई, मुलगा अनिल आणि सून असे चौघे जण कामासाठी इकडे आले. दोन मुली, एक मुलगा त्यांनी गावीच आईकडे ठेवली आहेत.
‘‘..काय सांगू. काम नाही मिळालं अजून. आता छावणीत 2क्क् च्या वर माणसं आली आहेत. सरवांना कुठून काम मिळणार? आम्ही 2क् माणसं बसून आहोत. एक दिवस पाणी पडलं तर सगळं डोस्क्यावर घेऊन फिरावं लागल. लेकरा-बाळांसाठी परत गावी जावं लागल’’ - हे सांगताना प्रकाश पवार यांचा आवाज खोल गेला होता. 
हळणीचा (मुखेड, नांदेड) मिथून पंढरी राठोड हा 16 वर्षाचा तरुण त्याचे काका रामराव यांच्यासोबत येथे आला आहे. रामराव, त्यांची पत्नी सुशीलाबाई, चुलत भाऊ सुभाष, त्याची पत्नी रेशमा, त्यांची मुलगी रोहिणी असे हे लमानी कुटुंब ठाण्यात आले. ‘‘15 दिवस झालं. तात्याला काम लागलं. दोन-चार दिवस आयटीआय कॉलेजमध्ये काम केलं. बाकी रामनगरला बांधकामावर काम केलं. तात्या आज दिघ्याला काम शोधायला गेलंय’’ - मिथुनने माहिती दिली. ‘‘येती आठवण गावाची, पण तिकडं पाणी नाही’’ - मिथून म्हणाला. 
मधुकर देवीदास राठोड (सुखनूर, मुखेड) व श्रीपाद लालू जाधव (सांगवीवेणक, मुखेड) हे दोघे एकटेच आहेत. श्रीपादची बायको, भाऊ, आई गावाकडेच आहेत. मधुकरची तशीच त:हा. पाच-सहा दिवस झाले, कामच नाही म्हणाले. 
‘‘नवीन हाय, नाक्यावर गेलो होतो. आई-बाप, भाऊ, दोन बहिणी, बायको, दोन लेकरं गावाकडंच हायते. कामच लागना गेलंय. बघणार, काय होतंय ते..’’ - मधुकर वैतागला होता. त्याला कोणीतरी काम मिळवून द्यावं, असं वाटत होतं. 28 वर्षाच्या राजेंद्र चव्हाणची (बापशेटवाडी, मुखेड) वेगळीच त:हा. भाऊ, त्याची बायको, त्याचा मुलगा यांना घेऊन तो आलाय. पत्नी, तीन मुलांना त्याने चिखली (लातूर) सासूरवाडीला सोडलंय. ‘‘इंदिरानगर नाका, कळवा नाक्यावर जाऊन रोज काम शोधतो. भांडुप नाक्यावर आता उभं राहतो. बिगारी, वीट वाहतुकीचं काम करतोय. 2क्1क् मध्ये मुंबईत कामाला आलो होतो’’ -राजेंद्रनं सांगितलं. 
***
ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील रामनगरची ही दुष्काळग्रस्तांची छावणी. दुष्काळाला तोंड देण्यासाठी सगळे जण कुठून कुठून आले आहेत. या छावणीतील 15क्-2क्क् लोक म्हणजे एक कुटुंबच झालं आहे. सर्वानी शेजारी-शेजारी बि:हाडं थाटली आहेत. 
येथे कोणालाही खासगीपण नाही, पण त्याचं त्यांना सोयरसुतक नाही. पोटासाठी आणि शब्दश: पाण्यासाठी सगळे आले आहेत. 
शिवसेनेकडून सर्वाना धान्य देण्यात येत आहे. पाण्याची सोय करण्यात आली आहे. महिला-पुरुषांसाठी तात्पुरती वेगवेगळी न्हाणीघरं तयार करण्यात आली आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंडप घालण्यात आल्याने त्यांच्या डोक्यावर छप्पर आहे. ही सर्व लमानी-बंजारा कुटुंबं आहेत. ऊसतोडीसाठी ते गावोगावी फिरतात. मात्र मुंबई-ठाणो तसं त्यांना नवं आहे. 
हे झालं मुंबई-ठाण्यातलं चित्रं. असंच चित्र ठिकठिकाणी, शहरी भागात दिसतं आहे. 
दुष्काळामुळे अनेक कुटुंबांच्या पायाला जणू भिंगरी लागली आहे. आज इथे तर उद्या तिथे. 
घरातला प्रत्येक जण कामाच्या शोधात आहे. काम मिळालं तर नशीब, नाही मिळालं तर त्या नशिबावरच हवाला ठेवून दिवस काढायचे.
किती दिवस असं चालणार?
छावणीतली लोकं म्हणतात,
- पाऊस पडेर्पयत. 
चांगला पाऊस पडला, दुष्काळी परिस्थिती मिटली की लोकं पुन्हा आपापल्या घराकडे, गावाकडे जातील. आपलं शेत तयार होईल, गावाकडेच काम मिळेल, बायको, मुलं, कुटुंबासोबत राहता येईल याच आशेवर ते दिवस रेटताहेत.
कधी पडेल हा पाऊस? पडला तरी पुरेसा पडेल? त्यातून खरंच परिस्थिती सुधारेल? घरदार, मुलं, घरातली म्हातारी-कोतारी माणसं यांना गावाकडेच सोडून कुटुंबांना वणवण करत जे फिरावं लागतंय ते थांबेल का? वर्षानुवर्षाचं हे चित्र बदलेल?.
विचारल्यावर सारी माणसं पुन्हा आकाशातल्या त्या माय-बापाकडेच हात दाखवतात.
 
..इथं बसून काय करणार?
मुंबईत आल्यानंतर ठाण्यात डोक्यावर तात्पुरतं छप्पर मराठवाडय़ातील दुष्काळाग्रस्तांना मिळालं आहे. खरा प्रश्न आहे तो रोजगाराचा ! रोज काम मिळत नाही. हाताशी पैसा नाही. कोणीतरी टाकलेले तुकडे उचलण्याची वेळ यावी याची खंत प्रत्येकाच्याच मनाला कुरतडते आहे.. काय करावं?
‘‘साहेब, पहिले 15 दिवस चांगलं काम मिळालं. त्यातून गावी काही पैसे पाठविले. आता पुन्हा एक दोन दिवसांत दोन-अडीच हजार रुपये पाठवणार हाय’’ - नांदेड जिल्ह्यातील संग्राम जाधव सांगत होते.
‘‘काम कोणाला नकोय, भेटलं तर करू. त्यातनं आपलं पोटं भरल अन् गावी आई-बापाचं पण पोट भरल.. आमास्नी शहरातलं काम कुठं येतंय? ऊसतोडी करणारे आम्ही. साफसफाई, मालवाहतुकीचं, हमालीचं काम करू शकतो. आता काम मिळालं तर ठीक, नाहीतर गावाकडं जायचं. इथं बसून काय मिळणार?’’ - संग्राम जाधव यांची वेदना त्यांच्या शब्दांतून जाणवत होती.
 
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत 
वरिष्ठ उपसंपादक आहेत.)
yogesh.bidwai@lokmat.com