राम जोशी
सेसेटा मोहिमेच्या जर्मनीमध्ये स्थित नियंत्रण कक्षेमधल्या अवकाश तंत्रज्ञांच्या दृष्टीने सहा ऑगस्ट 2014 हा आणखी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस. मनावर एक विचित्र दडपण, त्यामुळे छातीतील वाढलेली धडधड अशा अवस्थेत ते तंत्रज्ञ होते. रोसेटा ऑर्बिटरचा मार्च 2क्क्4 पासून सुरू झालेला प्रवास आता शेवटच्या टप्प्यावर आला होता. मे 2014 पासून ‘67 पी/सी-जी’ हा धूमकेतू यानाच्या दृष्टिक्षेपात आला होता. आता यानाकडून मिळणा:या फोटोंच्या आधारावर रोसेटा ऑर्बिटरला धूमकेतूच्या जवळ न्यायचे होते. त्यासाठी एकूण 1क् वेळा यानाच्या कक्षेत आणि वेगात थोडा थोडा बदल करण्याचे ठरले होते. मे महिन्यात यान आणि धूमकेतू यांच्यामध्ये काही हजार किमी असलेले अंतर ऑगस्टच्या सुरुवातीला 5क्क् किमी एवढे कमी झाले होते. 6 ऑगस्टला यानाच्या कक्षेत आणि वेगात शेवटचा बदल करण्यात आला. यानाचा वेग आणि दिशा बदलण्याकरिता जेट्सचा वापर केला जातो. त्याकरिता आवश्यक ती इंजिन्स काही वेळाकरिता सुरू करून बंद केली जातात. जर हे गणित चुकले तर यान भरकटू शकते. पण नियंत्रण कक्षेतील यान नियंत्रकांनी आपले सगळे कौशल्य पणाला लावून यानाला धूमकेतूपासून योग्य अंतरावर आणण्यात यश मिळवले आणि यान योग्य त्या अंतरावरून धूमकेतूभोवती फिरू लागले.
एका धूमकेतूला भेट देण्याचे भाग्य अखेर रोसेटा ऑर्बिटरला लाभले आहे. धूमकेतू अभ्यासासाठी या आधी अनेक मोहिमा आखण्यात आल्या, पण अशा प्रकारची ही पहिलीच आहे. 1क् वर्षे, 5 महिने आणि
4 दिवसांमध्ये यानाने केलेला 6.4 अब्ज किमी प्रवास 6 ऑगस्ट 2क्14 ला यशस्वी झाला. हा दिवस रोसेटा ऑर्बिटरच्या आयुष्यातला आणखीन एक महत्त्वाचा दिवस ठरला. रोसेटा ऑर्बिटरने ‘धूमकेतू 67पी/ सी-जी’ हे आपले सतत धावणारे ध्येय गाठले. या भेटीने सूर्यमाला संशोधनाचा एक नवा अध्याय लिहायला सुरुवात झाली असे म्हणता येईल.
रोसेटा ऑर्बिटर हे असे पहिले यान ठरले ज्याने एका वेगाने सरकणा:या धूमकेतूला भेट दिली. या भेटीच्या वेळी हे यान आणि धूमकेतू पृथ्वीपासून अंदाजे 4क्5 दशलक्ष किमी अंतरावर म्हणजे मंगळ-गुरू यांच्यामधल्या आंतग्र्रहीय अवकाशात होते. आता ही जोडी सूर्याच्या दिशेने ताशी 55 हजार किमी वेगाने पुढे सरकते आहे. डिसेंबर 2क्15 र्पयत या दोघांचा एकत्र प्रवास सुरू राहील. ऑगस्ट 2क्14 ते डिसेंबर 2क्15 या काळात या धूमकेतू संदर्भात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडतील. या सगळ्या घडामोडींचा तपशीलवार अभ्यास करता यावा यासाठीच ही मोहीम तयार करण्यात आली आहे.
धूमकेतू अभ्यासासाठी प्रत्यक्ष धूमकेतूला भेट देणारे अवकाशयान कसे असू शकेल याची संकल्पना 197क् मध्येच मांडण्यात आली होती. ती संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी 1993 मध्ये सुरवात झाली आणि 2 मार्च 2क्क्4 या दिवशी रोसेटा ऑर्बिटरने अवकाशात ङोप घेतली. उड्डाणानंतरचा यानाचा दहा वर्षाचा प्रवास काही सरळ सोपा नव्हता. यानाची आणि धूमकेतूची भेट मंगळ आणि गुरू यांच्या मधल्या अवकाशात घडवून आणायची होती. त्यामुळे कमीतकमी ऊर्जा वापरून यान एवढय़ा लांब नेणो हे आव्हानात्मक होते. त्यासाठी यानाची कक्षा विशेष प्रकारे ठरवण्यात आली होती. त्याकरिता यान लंबवतरुळाकार कक्षेत प्रक्षेपित करण्यात आले. त्या कक्षेत एक फेरी पूर्ण करून यान परत पृथ्वीच्या जवळून पुढे गेले. यामुळे यान थोडय़ा मोठय़ा कक्षेत गेले. दुसरी फेरी पूर्ण करून परत एकदा यान मोठय़ा कक्षेत सरकवले गेले. अशा रीतीने एकूण तीन वेळा पृथ्वीच्या जवळून तर एकदा मंगळाच्या जवळून नेण्यात आले. याला ‘ग्रॅव्हिटी अॅसिस्ट’ असे म्हणतात. या तंत्रमुळे यान कमी इंधनात जास्त अंतर कापू शकते. या प्रवासात यान ‘स्टेन्स’ आणि ‘ल्युटेशिया’ या दोन लघुग्रहांच्या जवळून पुढे गेले. याला फ्लायबाय असे म्हणतात. या फ्लायबायमध्ये या दोनही लघुग्रहांचे फोटो घेण्यात आले. हे लघुग्रह मुख्य पट्टय़ातील आहेत. ल्युटेशियाच्या भेटीनंतर यानाला 8 जून 2क्11 पासून सक्तीच्या दीर्घकालीन विश्रंती (हायबरनेशन) अवस्थेत नेण्यात आले होते. या विश्रंती अवस्थेतून यान जागे होण्यासाठी त्यावर एक ‘गजर’ लावण्यात आलेला होता. त्या गजराने योग्य प्रकारे काम करून 2क् जानेवारी 2क्14 रोजी यानाला जागृतावस्थेत आणले. जानेवारी ते मे 2क्14 या काळात यानावरील सर्व यंत्रणा तपासण्यात आल्या आणि यान धूमकेतूच्या भेटीसाठी सज्ज झाले.
12 हजार किमी अंतर बाकी असताना यानाने घेतलेल्या फोटोतून लक्षात आले, की धूमकेतूची रचना दोन दगड एकमेकांना चिकटल्यासारखी आहे. जसजसे अंतर कमी होत गेले तसतसे हे चित्र स्पष्ट होत गेले. असे वाटते आहे, की भूतकाळात कधीतरी दोन वेगवेगळे असलेले हे पाषाणखंड काही कारणाने एकमेकांना चिकटले असावेत आणि असा आकार तयार झाला असावा. हा धूमकेतू सरासरी 5 किमी आकाराचा आहे.
रोसेटा ऑर्बिटरच्या पोटात एक ‘फिले’ नावाचे लँडर बसवण्यात आले आहे. हे ‘फिले’ लँडर 11 नोव्हेंबर 2क्14 रोजी धूमकेतूवर उतरवण्यात येणार आहे. याकरिता योग्य अशा पाच जागा ऑगस्ट महिन्यात निवडल्या जातील. सप्टेंबरमध्ये यापैकी एक जागा निश्चित करण्यात येईल आणि ऑक्टोबरमध्ये फिले लँडर उतरवण्यासाठी तयारी सुरू होईल.
फिले लँडर धूमकेतूवर उतरण्यासाठी एक विशेष रचना करण्यात आली आहे. भाल्यासारख्या आकाराच्या धातूच्या एका टोकदार काठीच्या सहाय्याने फिले लँडर धूमकेतूच्या पृष्ठभागावर खोचले जाईल. त्यामुळे धूमकेतूच्या पृष्ठभागाचे जास्तीत जास्त अचूक निरीक्षण करून अचूक जागा ठरवणो याकरिता शास्त्रज्ञांची कसोटी लागणार आहे. एकदा ते खोचले गेले की ते तिथेच राहील. त्यानंतर त्याच्यावर असलेली विविध उपकरणो धूमकेतूचा अभ्यास सुरू करतील.
नोव्हेंबर 2क्14 नंतर धूमकेतू त्या फिले लँडरला बरोबर घेऊन प्रवास सुरू करेल. काही अंतरावरून त्याच्या भोवती घिरटय़ा घालत रोसेटा ऑर्बिटर फिरत असेलच. धूमकेतू त्याच्या उपसूर्य अंतरावर 13 ऑगस्ट 2क्15 या दिवशी म्हणजे अजून साधारण 12 महिन्यांनी पोचणार आहे. धूमकेतू जसजसा सूर्याच्या जवळ जातो तसतशी त्याची शेपटी मोठी दिसायला लागते. प्रत्यक्षात ही शेपटी म्हणजे अतिशय बारीक धुळीकण असतात. हे धुळीकण धूमकेतूच्या पृष्ठभागावर कोणत्या प्रकारची घडामोड होऊन उत्सर्जित होतात याचा प्रत्यक्ष अभ्यास करणो प्रथमच शक्य होणार आहे. त्याचबरोबर त्या उत्सर्जनात असलेले इतर वायूंचे प्रमाणही मोजता येईल. ऑगस्ट 2क्15 नंतर धूमकेतू सूर्यापासून दूर जायला लागेल आणि त्याची शेपूट लहान होत जाईल. या वेळी होणारे बदलही नोंदवले जातील. डिसेंबर 2क्15 पयर्ंत रोसेटा ऑर्बिटर आणि 67 पी/ सी-जी धूमकेतूबरोबरीने प्रवास करत असतील. त्या नंतर यानाचा वापर कसा करायचा हे अजून ठरलेलं नाही.
67पी/सी-जी म्हणजेच ‘67पी/चु:यूमोव-गेरासिमेंको’ हा धूमकेतू. याचा शोध 1969 मध्ये लागला. हा धूमकेतू सूर्याभोवती साधारण 6.45 वर्षात 1 फेरी पूर्ण करतो. याची कक्षा खूप लंबवतरुळाकार आहे. संगणकाच्या मदतीने त्याच्या भूतकाळातील कक्षेचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले, की 1959 पूर्वी त्याची कक्षा आज असलेल्या कक्षेपेक्षा वेगळी होती. 1959 च्या फेब्रुवारी महिन्यात तो गुरूच्या जवळून गेला आणि गुरूने त्याला आपली ताकद दाखवली. गुरूच्या गुरुत्वाकर्षणाने त्याची कक्षा बदलून गेली. त्या आधी त्याचे उपसूर्य अंतर 2.7 ख.ए. म्हणजे मंगळाच्या कक्षेच्या पलीकडे होते. (1 ख.ए. = सूर्य-पृथ्वी सरासरी अंतर=15 कोटी किमी) ते आता बदलून 1.27 ख.ए. झाले आहे. आता सूर्यापासून किमान अंतरावर असताना तो मंगळाची कक्षा ओलांडून पृथ्वीजवळ येतो. त्याचे सूर्यापासून खूप दूरचे म्हणजे अपसूर्य अंतर आहे 5.6 ख.ए. म्हणजे या वेळी तो गुरूच्या कक्षेच्या जवळ असतो. त्याचा परिवलनकाल (स्वत:च्या अक्षाभोवतीची एक फेरी) 12.7 तासांचा आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्यातून जाणा:या काल्पनिक प्रतलाला आयनिक प्रतल म्हटले जाते. 67 पी/सी-जी ची कक्षा या प्रतलाशी 7 अंशाचा कोन करून आहे.
आजवरच्या धूमकेतूंच्या अभ्यासातून असे लक्षात येते आह,े की पृथ्वीवरच्या जीवसृष्टीला कदाचित तेच कारणीभूत असावेत कारण अनेक धूमकेतूंवर पाण्याचा अंश सापडला आहे. त्याचबरोबर सूर्यमाला निर्मितीच्या वेळी उरलेले अवशेष म्हणजे धूमकेतू असाही एक अंदाज आहे. त्यामुळे धूमकेतूचा अभ्यास केल्याने सूर्यमाला जन्माचे रहस्य हाती लागेल असा विश्वास अनेक शास्त्रज्ञांना वाटतो.
(लेखक अवकाशशास्त्रचे
अभ्यासक आहेत.)