शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

परग्रहवासीयांचा शोध

By admin | Updated: July 5, 2014 15:19 IST

आपल्या आकाशगंगेचा विस्तार सुमारे एक हजार प्रकाश वर्षे एवढा प्रचंड आहे. त्यात अब्जावधी तारे आहेत. आजवर पृथ्वीसारखे १00 हून अधिक ग्रह सापडले आहेत; पण परग्रहांवर जीवसृष्टी असल्याच्या गोष्टी मात्र अद्याप सिद्ध झालेल्या नाहीत. नासाच्या नव्या योजनेच्या पार्श्‍वभूमीवर आजवरच्या झालेल्या प्रयत्नांचा मागोवा..

 निरंजन घाटे

माणसाला पृथ्वीप्रमाणेच इतर ग्रहांवरही प्राणी म्हणा किंवा माणसं म्हणा अशा प्रकारची जीवसृष्टी असावी, असं फार पूर्वीपासून वाटत आलं आहे. इ. स. पू. चौथ्या शतकामध्ये मेट्रोडोरस या ग्रीक तत्त्वज्ञाने ‘या अनंत अवकाशामध्ये फक्त पृथ्वीवरच जीवसृष्टी आहे, अशी कल्पना करणे म्हणजे सबंध शेतात धान्य पेरून त्यातले एकच बी रुजेल असे म्हणण्याइतके मूर्खपणाचे आहे, असं लिहून ठेवलं आहे. कोपर्निकसचा शिष्य गिआर्डानो ब्रुनोने या विश्‍वात असंख्य सूर्य आहेत, या सूर्याभोवती तितक्याच पृथ्वी फिरत असतात. त्यावर आपल्या पृथ्वीप्रमाणेच संजीवांची वस्ती आहे,’ असे लिहिले होते. हे बायबलच्या विचारांच्या विरोधात असल्याने ब्रुनोला सैतानाचा दूत म्हणून खांबावर बांधून जिवंत जाळण्यात आले. एकोणिसाव्या शतकात ही परस्थिती बदलली. त्या बदलाची सुरुवात अठराव्या शतकात झाली. दूरदश्रीच्या वापरामुळे आपल्या सूर्याच्या ग्रहमालेतील ग्रहांचे उपग्रह उघडकीस येऊ लागले. त्यात योहान एलर्ट बोड या खगोलशास्त्रज्ञाने ‘प्रत्येक ग्रह हा सूर्यापासून त्याच्या आधीचा ग्रह जेवढय़ा अंतरावर असतो, त्यापेक्षा दुप्पट अंतरावर असतो.’ असा नियम जाहीर केला. या नियमाचा उत्तरार्ध ‘अशाप्रकारे सूर्यापासून जवळ असलेल्या ग्रहावरील लोकांपेक्षा त्यानंतरच्या ग्रहावरचे लोक दुप्पट धार्मिक विचारांचे आणि आध्यात्मिकदृष्ट्या दुप्पट प्रगत असतात.’ या बोडच्या नियमामुळे जशी खगोलशास्त्राला चालना मिळाली, तशीच ती परग्रहवासीयांच्या अस्तित्वावर विश्‍वास ठेवणार्‍यांच्या भ्रामक समजुतींनाही मिळाली. त्याचा फायदा कसा घेतला गेला, हे पाहण्यासारखं आहे. विल्यम हश्रेल यांचे चिरंजीव जॉन हश्रेल हे खगोलशास्त्रज्ञच होते. त्यांनी दक्षिणेतील आकाशाचा नकाशा तयार करायचं ठरवलं. त्या काळातील दळणवळणाची साधनं लक्षात घेता, ते द. आफ्रिकेत काय करतात, हे इंग्लंडमध्ये कळायला महिनाभर लागत असे. याचा फायदा ‘न्यूयॉर्क सन’ नावाच्या वृत्तपत्रानं घेतला. ‘जॉन हश्रेल यांच्या नोंदी’ अशी वार्तापत्र छापू लागले. हश्रेलना चंद्रावर दिसलेल्या दोन जमाती, त्यांचे प्राणी, त्यांची युद्धे याची वर्णने छापल्यामुळे ‘न्यूयॉर्क सन’चा खप पाच हजारांवरून वाढून ६0 हजारांवर गेला. ही फसवणूक उघडकीस आली आणि हे वृत्तपत्र बंद पडायची वेळ आली; पण तोपर्यंत वृत्तपत्राला भरपूर फायदा झाला होता.
परग्रहवासीयांना खरी प्रसिद्धी मिळाली, ती जिओव्हानी शिआपारेली याच्यामुळे. त्याने मंगळाचा एक नकाशा १८८८ मध्ये प्रसिद्ध केला. चंद्रावर त्याला ‘कॅनाली’ दिसल्या असं त्यानं म्हटलं होतं. प्रत्यक्षात शिपापारेलीच्या दूरदश्रीच्या भिंगावर जे ओरखडे पडले होते, त्यांना तो ‘कॅनाली’ समजला होता. इटालियनमध्ये कॅनाली म्हणजे खाचा. या शब्दाचे इंग्रजी कॅनॉल म्हणजे कालवे या शब्दाशी साम्य आहे. त्यामुळे इंग्रजी वृत्तपत्रांनी ‘कॅनॉल्स ऑन मार्स’ अशी बातमी छापली. कालवे आहेत म्हणजे ते तयार करणारे असणारच. त्यामुळे मंगळावर सजीव असायला हवेत, हे गृहीत धरलं गेलं. यावर एच. बी. वेल्स यांनी कल्पनाशक्ती लढवून ‘वॉर ऑफ द वर्ल्ड्स’ ही कादंबरी लिहिली. त्यामुळे एलजीएम म्हणजे ‘लिट्ल ग्रीन मेन’ हा वाक्प्रचार दृढ झाला. पुढे १९४५ मध्ये उडत्या तबकड्यांचे पेव फुटले. या प्रथम अमेरिकन हवाई दलातील एका वैमानिकाने बघितल्या, असे म्हटले जाते. पुढे १९५६मध्ये नेवाडातील रोझवॉलजवळ एक उडती तबकडी कोसळली आणि त्यात एका परग्रहवासीयाचा मृतदेह सापडला, अशी बातमी प्रस्तुत झाली. 
अमेरिकी लष्कराने या सर्व प्रकारांची खातरजमा करायचे ठरवले. साधारणपणे ८५ ते ९0 टक्के अशा प्रकारांचे नैसर्गिक स्पष्टीकरण देणे शक्य होते. उरलेल्या १0 ते १५ टक्के वेळा साक्षीदारांची विश्‍वासार्हता संशयास्पद असते, असा निष्कर्ष या ‘प्रॉजेक्ट ब्लू बुक’ ने काढला. पुढे या चौकशी समितीचे एक सदस्य जे. अँलन हायनेक यांनी या १0 ते  १५ टक्के मधील काही घटना खर्‍या वाटतात, असे विधान केलेच; पण त्यावर एक पुस्तकही लिहिले. पुढे फ्रँक ड्रेक या वैज्ञानिकाने ‘प्रॉजेक्ट ओझ्मा’ नावाचा प्रकल्प राबवला. अवकाशातून येणारे परग्रहवासीयांचे संदेश पकडण्यासाठी रेडिओ दूरदश्रीचा वापर असे या प्रकल्पाचे कार्य होते. अवकाशातून येणारे संदेश पकडणं प्रॉजेक्ट ओझ्मात शक्य झाले नव्हते; पण पुढे १९६५मध्ये अशा प्रकारचे संदेश प्रथम निकोलाय कार्दा शेव या रशियन शास्त्रज्ञाला आणि नंतर इतर शास्त्रज्ञांनाही मिळाले. पुढे हे संदेश न्यूट्रॉन तार्‍यांमधील नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होणार्‍या रेडिओ लहरी (पल्सेटिंग रेडिओ सोर्सेस) म्हणजे पल्सार्स आहेत, असे मानण्यात येऊ लागले.
१९८0 नंतरच्या दशकामध्ये कार्ल सागन त्यांच्या पुढाकाराने हळूहळू सेटी म्हणजे ‘सर्च फॉर एक्स्ट्रॉ टेरेस्ट्रियल इंटेलिजन्स’ नावाचा प्रकल्प सुरू झाला. जगभर रेडिओ दूरदश्रींचे जाळे उभारायचे आणि आकाशातून येणारे अवकाशवासीयांच्या दळणवळणाचा शोध घ्यायचा, असा या प्रकल्पाचा उद्देश होता. आकाशगंगेचा (म्हणजे आपल्या अभ्रिकेचा- गॅलॅक्सीचा) विस्तार ८0 ते एक हजार प्रकाश वर्षे एवढा आहे. तिची रुंदी-अंदाजे जाडी ३0 ते १00 प्रकाश वर्षे आहे. तिच्यात अब्जावधी तारे आहेत. अलीकडे अवकाशी दूरदश्रींनी घेतलेल्या वेधानुसार १00हून अधिक पृथ्वीसारखे ग्रह आपल्या नजरेस आले आहेत. यातल्या काही ग्रहांवर तरी जीवसृष्टी असायलाच हवी, असे आशादायी चित्र आजकाल खगोल शास्त्रज्ञ उभे करतात. पायोनियर - १0 या यानावर खूप विचारपूर्वक मानवी अस्तित्व दर्शविणारा फलक बसविण्यात आला. त्याला आता तीस एक वर्षं होऊन गेली. ते यान सूर्याची ग्रहमाला ओलांडून गेले. त्यामुळे आपले अस्तित्व कधी तरी कुणाला  तरी कळेल, अशी आशा बाळगता येईल; पण त्यांनी म्हणजे अज्ञात परग्रहवासीयांनी असा प्रयत्न केल्याचे कुठलेही ठोस पुरावे आजमितीस उपलब्ध नाहीत. तरीही विविध माध्यमांतून दिशाभूल सुरूच असते. 
इ. स. २00९ मध्ये केप्लर या उपग्रहाची केवळ सजीव असू शकतील, असे म्हणजे सध्या तरी पृथ्वीसारखे ग्रह शोधण्याच्या कामगिरीवर रवानगी करण्यात आली असून, त्याचे निष्कर्ष आशादायक वाटले, तरी परग्रहवासीयांचे निश्‍चित पुरावे देणारे नाहीत. 
आता अँटलास - अँडव्हान्स टेक्नॉलॉजिकल लार्ज अँरे स्पेस टेलिस्कोप- सोडायची तयारी चालू असून, त्याचे प्रमुख कार्य अवकाशातील सजीवांचा शोध घेणे, हे असणार आहे. पृथ्वीवरच्या माणसांना जगण्याची भ्रांत असताना हा उद्योग कशासाठी, हा विचार अशावेळी मनात आल्यावाचून राहात नाही. मात्र, असा विचार करणार्‍याला वेड्यात काढणारे जे लोक आहेत, त्यांना परग्रहावरील जीवसृष्टी कशी असेल, कशी दिसेल, त्यातच जास्त रस आहे, हे मात्र खरे.
(लेखक ज्येष्ठ विज्ञान अभ्यासक आहेत.)