शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

झोळी दुबळीच..

By admin | Updated: August 12, 2016 18:35 IST

सावित्री नदीला आलेल्या पुरात महाडचा ब्रिटिशकालीन पूल कोसळला. पाण्यात पडलेल्या वाहनांचा शोध तर अजूनही सुरू आहे.

 - अभिजित घोरपडे

सावित्री नदीला आलेल्या पुरात महाडचा ब्रिटिशकालीन पूल कोसळला.पाण्यात पडलेल्या वाहनांचा शोध तर अजूनही सुरू आहे.का कोसळला हा पूल? त्याला जबाबदार कोण?यंत्रणेतील त्रुटी, बेफिकिरी की निसर्ग? एक नक्की,‘यंत्रणेतील त्रुटी म्हणजे माणूस’ आणि ‘निसर्ग म्हणजे पाऊस’ यांच्यापैकीच कोणावर तरी ही जबाबदारी टाकावी लागेल. अनेकांनी ही जबाबदारी निसर्गावर ढकलण्याचा प्रयत्न केला.पण त्यात तथ्य किती?वित्री नदीला आलेला पूर आणि महाडजवळ कोसळलेला ब्रिटिशकालीन पूल.. या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हळहळला. त्यानिमित्तानं अनेक त्रुटी, चुका तर नव्यानं समोर आल्याच, पण जुने प्रश्नही नव्यानं उफाळून वर आले. या दुर्दैवी घटनेला नेमकं जबाबदार कोण?यंत्रणेतील त्रुटी, बेफिकिरी की निसर्ग? याविषयीची चर्चा आणि वादविवादही चांगलेच रंगले आहेत.यातला सर्वात (बे)जबाबदार घटक कोणता?‘यंत्रणेतील त्रुटी म्हणजेच माणूस’ आणि ‘निसर्ग म्हणजे पाऊस’ यांच्यापैकी कोणावर तरी ही जबाबदारी टाकावी लागेल. अनेकांनी ही जबाबदारी मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसावर टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्यात तथ्य किती?जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, महाबळेश्वरमध्ये ‘त्या’ दोन दिवसांत (४८ तासांत) ८०० मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे पूल पडल्याचे सांगितले गेले. तिथे दोन दिवसांत ८०० मिलिमीटर पाऊस पडला, हे वास्तवच आहे. पण महाबळेश्वरला दोन दिवसांत इतका पाऊस पडणे ही अपवादात्मक घटना नाही. महाबळेश्वर येथे ११ आॅगस्ट २००८ या दिवशी २४ तासांत ४९१ मिलिमीटर इतकी उच्चांकी नोंद झाली आहे. आणि असा सलग दोन-चार दिवस पावसाचा जोर कायम राहणे हेही या ठिकाणासाठी नवे नाही. महाडजवळील पूल २ आॅगस्टच्या मध्यरात्री केव्हातरी पडला. आणि ८०० मिलिमीटर पावसाची नोंद आहे ती ३ आॅगस्टच्या सकाळी ८.३० पर्यंतची. म्हणजे मध्यरात्रीनंतर आठेक तास पडलेल्या पावसाचा पूल कोसळण्याशी संबंध नाही. तो पावसाचा आकडा ८०० मधून वजा करावा लागेल. याचा अर्थ सलग सहाशे-सातशे मिलिमीटरच्या पावसामुळे पूल पडत असेल, तर महाबळेश्वरात उगम पावणाऱ्या नद्यांवरील सर्वच पूल पडायला हवेत. असा बादरायण संबंध आपल्याला कसा लावता येईल?..