शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
3
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
4
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
5
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
6
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
7
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
8
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
9
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
10
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
11
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
12
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
13
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
14
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
15
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
16
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
17
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
18
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
19
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
20
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो

‘सिनेमा संपला!’

By admin | Updated: October 24, 2015 18:57 IST

तंत्रतील वेगवान बदलांमुळे ‘सिनेमा मरू घातलाय’ अशी ओरड काही वर्षापूर्वी होत होती. तसं काहीच न होता, सिनेमा उलट कितीतरी पुढेच गेला. टोरांटो फिल्म महोत्सव संपला, पण त्यातील चित्रपटांनी विषयांबरोबरच तंत्रचंही गारुड घातलं.

- अशोक राणे
 
ग्रंथ चळवळीत लक्षणीय भूमिका बजावणा:या आणि सिनेमाचीही तेवढीच आवड असणा:या आमच्या ज्येष्ठ मित्रने पंधराएक वर्षापूर्वी हे असं जवळपास जाहीरच करून टाकलं होतं. वडीलधारी मंडळींनी अमुक एक गोष्ट बरोबर किंवा चूक म्हटलं की इतरांनीही तसं मानूनच टाकायचं, त्याचा प्रतिवाद करायचा नाही असा काहीसा दंडक त्यावेळी आणि आजही मानला जात आहे म्हणून नव्हे परंतु मी वाद नाहीच घातला. अगदी उथळ अशी नव्हे परंतु वरवरची वाटावी अशी कुणी टिप्पणी केली आणि तीही सिनेमावर तर मी त्याच्या वाटय़ालाच जात नाही.
त्याच सुमारास दिल्लीत भरलेल्या भारताच्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय महोत्सवात ‘व्हिडीओ तंत्रज्ञान सिनेमाला मारक ठरणार का’ या विषयावर परिसंवाद होता आणि एखादा अपवाद करता सर्वच वक्त्यांनी या नव्या तंत्रमुळे सिनेमा मरू घातलाय अशी समजृूत करून घेत धाय मोकलून रडायला सुरुवात केली. सिनेमासाठी इथून पुढे फिल्म रोल न वापरता हे तंत्रज्ञान वापरलं जाणार यासाठी ती सारी मंडळी गळा काढत होती. ‘सिनेमा संपला’ असा आक्रोश करणारे हे सारे लोक एक महत्त्वाचं आणि अतिशय अपरिहार्य म्हणावं असं एक वास्तव लक्षात घेत नव्हते आणि ते म्हणजे सिनेमा हे तंत्रधिष्ठित माध्यम आहे! वैज्ञानिक प्रगती सतत होत असते आणि पर्यायाने तंत्रज्ञान बदलत  असतं. आतातर या बदलाचा झपाटा इतका वेगवान आहे. कालपरवाचं सोडा, सकाळची गोष्ट संध्याकाळी जुनी होते. क्वचित कुणाच्या तरी घरात असलेला फोन आणि परगावी बोलण्यासाठी मोठय़ा मुश्किलीनं करता येणारा ट्रंककॉल हा काळ पाहिलेल्या आणि आता पन्नाशीच्या पल्याड असलेल्या लोकांनी हातात फोन घेऊन जगभर कुठेही हिंडता येईल याची कल्पनादेखील केली नव्हती. पण ते घडलं. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा गेल्या काही काळातला भन्नाट वेग आणि त्याचे बरेवाईट परिणाम यावर असं किती तरी बोलता येईल. सिनेमा हे वर म्हटल्याप्रमाणो तंत्रधिष्ठित माध्यम असल्यामुळे तंत्रच्या वेगाने त्यातही झपाटून टाकणारे बदल घडणार हे अपरिहार्य होतं. ते समजून घेत या बदलासकट सिनेमा कसा अजून जिवंत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. सिनेमा तुम्ही पूर्वीचे भलेथोरले कॅमेरे आणि 35 किंवा 16 एमएमच्या फिल्मवर करा किंवा आताच्या छोटय़ात छोटय़ा डिजिटल कॅमे:याने, अगदी मोबाइलच्या कॅमे:यावर करा.. तुम्ही सुटे सुटे शॉट्स घेता, ते संकलनाचा वापर करून जोडता, त्याला ध्वनिपरिणामांची जोड देता आणि शिवाय व्हिज्युअल आणि साऊंड इफेक्ट वापरता मग कुठे आणि कधी मेला सिनेमा..? अशी ओरड करणारे आपला जुना काळ गोंजारत, आळवत, अवतीभवती काय चाललंय ते नीट पाहतच नाही. अन्यथा माङयासारख्यांना अगदी मोबाइलवर केलेला ‘सिनेमा’ दिसतो तो दिसला असता.. तर सिनेमा काही संपलेला नाही. तो आहे आणि असणारच आहे! नमनाला घडाभर तेल होतंय याची कल्पना आहे मला. परंतु आणखी एक अलीकडची महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. केवळ अत्याधुनिक तंत्रच्या प्रेमात पडून आशयाला दुय्यम महत्त्व देणा:या नव्या पिढीची प्रतिनिधी असलेल्या आपल्या लेकीला लिहिलेल्या पत्रत हॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक स्कॉसिस मार्टिन बजावतात.. टूल्स डोंट मेक मृूव्ही यू मेक मूव्ही!’’
हे एवढं सारं सविस्तर लिहायचं कारण म्हणजे जे लोक सातत्याने जगभरच्या चित्रपट महोत्सवांना उपस्थित राहतात आणि सिनेमा माध्यमाच्या प्रवासाचं, त्यातील केवळ तंत्रच्याच नव्हे तर आशयाच्या आणि गोष्ट सांगण्याच्या शैलीतल्या बदलाचं जवळून अवलोकन करतात त्यांना कधीच ‘सिनेमा संपला’ असं वाटत नाही. जुना काळ पाहिलेला हा वर्ग हा नवा काळ कसलेही पूर्वग्रह मनाशी न बाळगता पाहतो आणि नव्या पिढीचा कलाविष्काराने टवटवीत राहतो. 35 एमएमच्या फिल्मवरची आणि आजच्या डिजिटलवरची प्रतिमा यात लक्षणीय फरक आहे हे उमजून उगाच कसले कसले कढ न काढता पाहतो. हा वर्ग अजूनही ‘सिनेमा’ पाहतो.
..आणि म्हणून हाच वर्ग नव्या दमाच्या समीक्षकांच्या सोबतीनं. फ्रीप्रेसी’ या समीक्षकांच्या जागतिक पातळीवरील संस्थेच्या 2क्15 चा जगातला सवरेत्कृष्ट चित्रपट म्हणून ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांची संयुक्त निर्मिती असलेल्या ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक जॉर्ज मिलर यांच्या ‘मॅड मॅक्स : फ्युरी रोड’ या चित्रपटाची निवड करतो. असं आहे काय या सिनेमात? कलात्मकतेचे कोणते निकष त्याला लावले गेलेत? ‘कलात्मक चित्रपट’ म्हणून आपल्या समजुतींमध्ये जो चित्रपट प्रकार आहे त्यातलं त्यात काही नाही. तो आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विलक्षण आविष्कार! एक भन्नाट वेगवान अॅक्शन फिल्म! सबटायटल्सशिवाय जपानमधील प्रेक्षकांनीदेखील या चित्रपटाचा आस्वाद घ्यावा अशी भूमिका मनाशी ठेवून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘सव्र्हाव्हल’ हे या गोष्टीचं सूत्र आहे. कधी तरी अपेक्षित असलेल्या महाभयानक अणुयुद्धातून वाचलेल्यांच्याची ही गोष्ट आहे. यापलीकडे या गोष्टीतलं काही सांगण्यासारखं नाही. हा पाहायचा सिनेमा आहे. आणि अर्थातच ऐकायचाही आहेच. परंतु संवादांपेक्षा इतर ध्वनिपरिणामांसाठी! एका वाक्यात त्याचं वर्णन करायचं तर हा चित्रपट म्हणजे केवळ आणि केवळ अत्याधुनिक सिनेमातंत्रचा अफलातून आविष्कार आहे. मी तो यंदाच्या कान महोत्सवात पाहिला होता. नंतर घरीही पाहिला. कानमध्ये त्याच्या 2 डी, 3 डी आयमॅक्स 3 डी आणि 4 डीएक्स अशा चार तांत्रिक प्रकारच्या आवृत्त्या दाखविल्या गेल्या. 
मला रांगेत पाहून माङया एका मित्रने, तू काय कमर्शिअल सिनेमा पहायला कानला आलायंस’ असं खोचकपणो विचारलं. मला त्याला एवढंच सांगायचं होतं की, मी ‘सिनेमा’ पाहायला आलोय. परंतु मी उत्तर देण्याच्या भानगडीत पडलो नाही. त्याआधी फेब्रुवारीत बर्लिनमध्ये ‘सिंड्रेला’ हा एक असाच या मित्रच्या भाषेत सांगायचं तर कमर्शिअल सिनेमा पाहिला आणि अत्याधुनिक सिनेमातंत्रचा आणखी एक अफलातून आविष्कार पाहण्याचं मन:पूत समाधान मिळवलं. या दोन्ही सिनेमांवर मी त्यावेळी ‘लोकमत’च्या याच मंथन पुरवणीत लिहिलंय. सर्वसामान्य प्रेक्षक चक्रावून तर जातोच परंतु प्रत्यक्ष चित्रपटनिर्मितीत असलेल्यांनाही जवळपास हाच अनुभव येतो. सेकंदाला चोवीस फ्रेम्स या गतीने कॅमे:यात आणि प्रोजेक्टरने फिल्म फिरते तेव्हा आपल्याला नैसर्गिक हालचाल दिसते. परंतु जवळपास साठ टक्के हा चित्रपट सेकंदाला चोवीसपेक्षा कमी फ्रेम्स या गतीने शूट केलाय. त्यामुळे भन्नाट वेग साधण्यात आलाय. दोन तासाच्या या चित्रपटात 2700 कट्स आहेत. म्हणजे मिनिटाला 23 आणि अशा या वेगात कथाकथनातील सलगता कमालीच्या कौशल्याने साधलेली आहे. दीडशे दिवस शूटिंग केलेल्या या चित्रपटात दोन हजारांहून अधिक व्हिज्युअल इफेक्ट्स आहेत. असा चित्रपट बारीकसारीक तपशिलासकट स्टोरीबोर्ड केल्याशिवाय केवळ अशक्य. त्यासाठी पाच आर्टिस्ट दिवसरात्र राबत होते. आकडय़ांच्या बाबतीत कमाल करणा:या ‘मॅड मॅक्स, फ्यूरी रोड’ने जगभरातून दोन हजार सहाशे कोटी रुपयांचा आजवर व्यवसाय केलाय. हे अफलातून आकडे आणि त्याच्या निर्मितीच्या कथा हे मला नंतर कळलं. परंतु आधी नजरेत भरला तो चित्रपट! .आणि म्हणून आमच्या जगभराच्या समीक्षकांनी त्याला ग्रां.पी. देऊन त्याचा जो गौरव केला याचा मला विशेष आनंद आहे, कारण त्यात मला माध्यम आकलन, माध्यम विचार आणि त्यातली सुसूत्रता दिसते. समीक्षक किंवा जाणकार प्रेक्षक केवळ कलात्मक चित्रपटालाच डोक्यावर घेतात या धारणोला यामुळे छेद दिला गेला.
परवाच्या टोरांटो महोत्सवात पाहिलेला जाफर पनाहीचा ‘टॅक्सी’ हा चित्रपट माध्यम नवनवे बदल आत्मसात करीत कसं प्रगल्भ होत चाललंय हेच सुचित करतं. चित्रपट करण्यावरच बंदी असलेला दिग्दर्शक गनिमी काव्याने चित्रपट निर्मिती करीत एक नवा चित्रपट प्रकाराचं- जॉनरच्या जन्माला घालतो हे कशाचं लक्षण आहे. गेल्याच आठवडय़ात मी त्यावर लिहिलं असल्यामुळे त्यावर फार लिहित नाही. परंतु त्याने पुढे आलेला चित्रपट विचार, तत्त्वज्ञान प्रस्तुत लेखाच्या निमित्ताने अधोरेखित करतो. या लेखाचं मुळी औचित्यच ते आहे. मला आठवतं, मी जेव्हा 1996 मध्ये पहिल्यांदा बर्लिन महोत्सवासाठी निमंत्रित समीक्षक म्हणून गेलो तेव्हा माझा एक मित्र म्हणाला होता,
‘‘तू काय नुस्त्या फिल्मस बघायला बर्लिनला जातोस.? इथे वर्षभर पाहतच असतोस ना?’’ आपला मित्र एका परदेशी महोत्सवास निमंत्रित म्हणून जातो आहे याचं खरं तर त्याला कौतुक वाटायला हवं होतं. त्याच्या या अनपेक्षित प्रतिक्रियेनं मी क्षणभर, पण क्षणभरच अचंबित झालो आणि पुढल्याच क्षणी त्याला उत्तर दिलं.. कसल्याही नम्रपणाची वगैरे पत्रस न ठेवता.
‘‘सिनेमा वेगळ्या नजरेने पाहणारा आणि त्यावर वेगळं काही बोलणारा माणूस मला आता इथे भेटत नाही. बघू तिकडे कुणी भेटतं का?’’
ज्या साठ, सत्तर आणि काही प्रमाणात ऐंशीच्या दशकात समांतर किंवा कलात्मक सिनेमांची चळवळ जोरात होती तेव्हा त्यातले एकूण एक चित्रपट पाहताना मी सभोवतालचे. कमर्शिअल म्हणून हेटाळणी होणारेही सिनेमे पाहत होतो. कारण मला कायम ‘सिनेमा’ पाहायचा होता. आहे. आणि असणार आहे. या माङया धारणोला हे महोत्सव बळ देत राहतात. मला ताजं टवटवीत ठेवत राहतात. 
यंदा बर्लिनमध्ये पाहिलेले ‘वुमन इन गोल्ड’ आणि 13 मिनिट्स’ हे दुस:या महायुद्धाच्या नाझीपर्वावर वेगळी नजर टाकणारे चित्रपट तसेच कानमध्ये जागतिकीकरणामुळे आलेल्या बेकरीच्या संकटाचं अतिशय प्रत्ययकारी दर्शन घडविणारे ‘टू नाइट्स वन डे’ आणि ब्यूटिफूल युथ’, पैसा आणि केवळ पैसा मिळविण्याच्या नादात पायदळी तुडविली जाणा:या मानवी मूल्यांचं वास्तव दाखविणारा रशियाचा ‘लिव्हायथन’, ‘वाईल्ड टेल’ आणि ‘अस्फालती’ हे नर्मविनोदी उपहासपट, परवाच्या टोरांटो महोत्सवात पाहिलेले कॅनेडात चर्चमध्ये अल्पवयीन मुलांचं झालेलं लैंगिक शोषण जगासमोर आणणा:या कॅनेडियन पत्रकारांच्या शोधपत्रकारितेची गौरव कथा सांगणारा ‘स्पॉटलाईट’, अल्जेरियाचं अगदी अलीकडचं राजकीय वास्तव मांडणारा ‘लेट देम कम’, एका अरब मुलाची रोमहर्षक यशोगाथा सांगणारा ‘द आयडॉल’, लॅटीन अमेरिकेतून आलेला एक वास्तववादी गुन्हेगारपट ‘द क्लान’ आणि भारतीय चित्रपटाची मान उंचावणारे ‘चौथी कूट’, ‘मसान’, तलवार, पार्चड’ या आणि आजवर या देश-विदेशातील महोत्सवातील इतर कितीतरी चित्रपटांनी सभोवतालचं सर्वदूर पसरलेलं जग, तिथल्या तमाम संदर्भासकट आणि काळाबरोबर बदलत्या सिनेमाच्या बदलत्या रूपासकट दाखवत केवढं भरभरून दिलं. त्यामुळे मी तरी कधी म्हणणार नाही की. सिनेमा संपला. म्हणायचंच झाल तर म्हणोन.
‘‘सिनेमा मरता नाही. सिनेमा कभी मरेगा नही..!’’
(टोरांटो चित्रपट महोत्सवासंदर्भाच्या लेखमालिकेतील अखेरचा लेखांक.)
 
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)
 
ashma1895@gmail.com