शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
3
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
4
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
5
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
6
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
7
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
8
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
9
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
10
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
11
सेंट जॉर्जेसला लिव्हर ट्रान्सप्लांटचा परवाना; रुग्णालयातील डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

Less is MORE

By admin | Updated: March 12, 2016 15:09 IST

अगोदर तो जिथे राहत होता, ते 2500 स्क्वेअर फुटाचं आलिशान घर होतं. घटस्फोट हे निमित्त ठरलं, पण त्याच्या डोक्यात विचार आला, कशाला हवी ही ‘हवेली’? - त्यानं आपलं सगळं जगणं 36 स्क्वेअर फुटाच्या टपरीत बसवलं! आता त्याच्याकडे शर्ट-पॅँटचे दोन, बुटांचे तीन जोड, एक स्टोव्ह आणि तीन हॅट्स आहेत! अख्खा संसार एका पेटीत बसतो! कपडे धुणं, शॉवर, टॉयलेटसाठी जागा कशासाठी नासवायची? - ते सारं सार्वजनिक ठिकाणी!

- शर्मिला फडके
जगभरात नावाजलेला डॉ. जेफ विल्सनचा ‘द डम्प्स्टर प्रोजेक्ट’
 
जेफ  विल्सन. अमेरिकेतील ह्युस्टन, टीलॉट्सन युनिव्हर्सिटीचे डीन. आता त्यांच्या शहरात म्हणजे ऑस्टीन, टेक्सास येथे विल्सनना प्रोफेसर डम्प्स्टर अशी नवी ओळख मिळाली आहे. कारण विल्सनचे सध्याचे वास्तव्य एका 36 स्क्वेअर फूट आकाराच्या डम्पस्टर म्हणजेच एका पत्र्याच्या कचराकुंडीमधे आहे. अर्थातच या कचराकुंडीत ‘घराला’ साजेसे शक्य तितके सर्व बदल विल्सनने केलेले आहेत. 
विल्सनचे घर झालेली ही पत्र्याची कचराकुंडी त्याच्या युनिव्हर्सिटीच्या आवारात आहे. तिथे राहण्याकरता त्याने युनिव्हर्सिटीची परवानगीही मिळवली.  ‘द डम्प्स्टर प्रोजेक्ट’ या नावाने ओळखला जाणारा विल्सनचा हा प्रयोग नेमका आहे तरी काय?  
विल्सन काही वर्षापूर्वीर्पयत अडीच हजार स्क्वेअर फुटाच्या घरात सुखाने राहायचा. निमित्त झाले विल्सनच्या घटस्फोटाचे. त्याच्या तोवर सुरळीत चाललेल्या आयुष्याला या घटस्फोटामुळे खीळ बसली. विरक्तीचा झटका आला म्हणा किंवा नव्याने मुक्त, बॅचलर लाइफ  जगण्याची मिळालेली संधी म्हणूनही विल्सनने आपला मुक्काम पाचशे चौरस फुटाच्या घरात हलवला. आणि मग या लहानशा घरामधे जागा नाही म्हणून त्याने आपले जास्तीचे कपडे, फर्निचर इत्यादि विकायला सुरुवात केली. याच सुमारास माणसाला रोजच्या जगण्याकरता नक्की काय लागत असतं हा विचार त्याच्या मनात येत राहिला. 
विल्सन पर्यावरणशास्त्रचा प्रोफेसर. वातावरणातील बदल, वैश्विक आरोग्य हे त्याच्या विशेष आवडीचे विषय.  पर्यावरणातील बदलांचे दैनंदिन जीवनावर होणारे परिणाम मुलांनी प्रत्यक्ष अनुभवातून शिकायला हवे असतील तर प्रोफेसर या नात्याने हे प्रयोग आधी स्वत:वर करून पाहायचे त्याने ठरवले.
या सर्व वैचारिक घडामोडींचा परिणाम म्हणजे 36 चौ. फूट आकाराच्या पत्र्याच्या कचराकुंडीला आपले घर करण्याच्या प्रयोगाची सुरुवात. 4 फेब्रु. 2क्14 ते 4 फेब्रु. 2क्15 या वर्षभराच्या कालावधीत विल्सन या घरामधे राहिला.  
आपली ही कल्पना प्रत्यक्षात येत असताना विल्सन सतत आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सद्वारे मित्र, नातेवाईक, युनिव्हर्सिर्टीमधले विद्यार्थी, इतर अध्यापक यांच्या संपर्कात होता. 
विल्सनकडे आता दोन जोडी पॅँट्स, दोन जोडी शर्ट, बुटांचे तीन जोड, तीन हॅट्स आणि आवड म्हणून 8 ते 1क् बो टाईज इतकेच कपडे. एका लहानशा पेटीत ते मावतात. ही पेटी त्याने आपल्या बेडखाली सरकवून ठेवलेली आहे. तिथेच तो त्याच्या स्वयंपाकाचे सामान ठेवतो. कॅम्पिंगवर जेवण बनवायला लागते तितकेच साहित्य आणि एक स्टोव्ह. साठवलेल्या कमीतकमी पाण्यामधे दैनंदिन व्यवहार उरकणो वाटते तितके कठीण नाही याचा त्याला अनुभव आला. दिवसा अतिशय गरम होत असे त्या पत्र्याच्या घरात तेव्हा विल्सन आपले ऑफिस बाहेर मोकळ्यावर थाटून काम करायचा. पुढे स्प्रिन्ग आला तेव्हा हवा आल्हाददायक झाली. मग पुन्हा उन्हाळा आला.विल्सनच्या मते हवामानातल्या बदलांना आपल्या शरीराचे नैसर्गिक अनुकूलन कसे होते,  वातावरणातील बदलांना शरीर कसा प्रतिसाद देते, आपल्या शारीरिक सवयी किती लवचिक आहेत हे आजमावण्याची ही संधी त्याला पहिल्यांदाच मिळाली. 
 या घरात राहताना आजूबाजूच्या परिसरातून आपण दैनंदिन आयुष्यातल्या नेमक्या किती गरजा भागवू शकतो हा विचार सतत त्याच्या मनात होता. ज्या गोष्टींकरता सार्वजनिक सोयी वापरता येणो शक्य आहे त्या वापरायच्या, त्याकरता घराची जागा वापरायची नाही हा त्याचा कटाक्ष. उदा. सार्वजनिक कपडे धुण्याच्या जागा, शॉवर, टॉयलेटकरता सार्वजनिक स्वच्छतागृहे!  बागा, वाचनालये, कम्युनिटी सेंटर्स इथे भेटणारी माणसे जितके बौद्धिक मनोरंजन करू शकतात त्याच्या दहा टक्केही घरातल्या लार्ज फ्लॅट स्क्रीन टीव्हीवरच्या कार्यक्रमांमधून मिळत नाही असा विल्सनचा अनुभव. मोठय़ा आलिशान घरात स्वत:ला अडकवून घेतल्यामुळे आपण अशा अनेक जास्त चांगल्या पर्यायांवर काट मारतो , हे त्याला जाणवले.
या घरात राहत असताना जाणारे-येणारे अनेक लोक कुतूहलाने बघायला थांबत. विल्सन प्रत्येकवेळी त्यांच्याशी  सविस्तर गप्पा करी.  तोवरच्या भाषणबाजीमधून जे साधले गेले नाही ते या अनौपचारिक गप्पांमधून जास्त परिणामकारकरीत्या पोचते असा अनुभव त्याला आला. काही वेळा विद्यार्थी, आसपासचे लोक यांच्याकरता तो आकाशातले तारे बघण्याचा खेळ खेळे. लोक मग तिथेच बाहेर पथारी पसरून झोपत. विल्सनच्या या प्रयोगाकडे स्थानिक विचारवंत, अभ्यासक आणि सामान्य माणसांनीही गांभीर्याने पाहिले. शाळांमधले विद्यार्थी, विद्यापीठातले तरुण गटागटाने हा प्रयोग पाहायला येतात. शैक्षणिक संस्थांमधे या अनुभवावर आधारित विल्सनची व्याख्याने आयोजित केली जातात.  ‘द डम्प्स्टर प्रोजेक्ट’ मागची पर्यावरणकेंद्रित संकल्पना अनेकांच्या विशेषत: विद्याथ्र्याच्या मनात रुजली आहे, तिला मुळे फुटली आहेत, हे नक्की. दहा अब्ज लोकवस्तीच्या जगातल्या प्रत्येकाला घर, त्यातल्या सुखसोयींसकट मिळणो हे एक अशक्य कोटीतले स्वप्न आहे. त्या दिशेने जाणो हा एक हेतू आणि आपल्या जगण्याचा व्याप कमी करणो, आपली क्रियाशक्ती वाढवणो हा आणखी एक हेतू.
विल्सनचा वैयक्तिक प्रयोग संपल्यावरही प्रकल्प चालूच राहिला. अनेक जणांनी आळीपाळीने त्याच्या या घरात प्रत्यक्ष राहण्याचा अनुभव घेतला आणि  आपल्या शहरामधे अशी लहान घरे वास्तव्याकरता निवडली. शिक्षकांनी आपल्या विद्याथ्र्यांना स्वत:च्या गरजांनुसार अशी लहान घरे डिझाइन करण्याचे प्रोजेक्ट दिले.  विल्सन अजूनही अतिशय लहान, 225 चौ.फूट घरातच सुखाने राहतो. 
‘डम्प्स्टर प्रोजेक्ट’च्या दुस:या टप्प्यात जी घरे बनली त्यात सर्वसामान्य अमेरिकन लोकांना ज्या सोयी हव्या असतात त्यांचा समावेश केला आहे. सिंक, किचन, बेड, दिवा, गरजेनुसार उघडझाप करणारे छत, योग्य वायुविजन, सुरक्षा कुलपांची सोय इत्यादि. मात्र या सोयी जास्तीत जास्त पर्यावरणकेंद्रित आहेत. यामधे पावसाचे पाणी साठवायला घुमटाकार छत बाहेरच्या बाजूने बसवले जाते. ‘डम्प्स्टर प्रोजेक्ट’चा तिसरा टप्पा लवकरच सुरू होईल. सौर ऊर्जा, वारा, पाऊस, प्रकाश, उष्णता या सर्वांचा जास्तीत जास्त वापर करून घेणारी ही घरे असतील. 
ऊर्जा, जागा, पाणी यांचा कमीत कमी वापर आणि कच:याची कमीत कमी निर्मिती कशी करावी याचे विल्सनचे घर आदर्शवत उदाहरण ठरले.  पर्यावरण तज्ज्ञांच्या मते पत्र्याऐवजी मुळातच जर नैसर्गिक साहित्याचा वापर करून जर विल्सनने हे घर बांधले असते तर नैसर्गिक वातानुकूलनाचा लाभ त्याला मिळाला असता. 
मात्र शहरी वातावरणात हवामानाच्या नैसर्गिक बदलांचा जास्तीत जास्त परिणाम अनुभवण्याच्या दृष्टीने आपण तसे केले नाही, असे विल्सन म्हणतो. 
बाजारपेठेने आपल्यावर लादलेल्या वस्तू आपल्या घरात कच:यासारख्या आणून टाकतो आपण. या वस्तूंची आपल्याला अजिबात गरज नसते. घराला डम्पिंग ग्राउण्ड बनवण्याच्या या वृत्तीचा प्रतीकात्मक निषेध विल्सनने त्याच्या ‘डम्प्स्टर प्रोजेक्ट’द्वारे केला. 
कमीतकमी सोयींमधे आणि वस्तूंच्या वापरात सुखी राहणो खरोखरच शक्य आहे हा त्याच्या प्रयोगाचा निष्कर्ष. विल्सनच्या स्वत:च्या शब्दात सांगायचे तर- Even at the extreme end of the spectrum a lot less can bring a lot more to your life
उन्हाळ्यात कशाला हवा एसी?
सुरुवातीला विल्सनच्या घरात डोक्यावर फक्त टार्पोलिनचे छत होते. पावसाचे पाणी, उन्हाच्या झळा घरात दाखल व्हायच्या. त्यानंतर मग विल्सनने लोकांना ट्विटरवर विचारलं, या घरात अजून काय हवं? सगळ्यांनी सांगितलं, एसी! ऑस्टीनच्या तीव्र उन्हाळ्यात दिवसाचे 13क् डिग्री फॅरनहाइट तपमान रात्रीही 8क् च्या खाली उतरत नसे. अशा परिस्थितीत या पत्र्याच्या घरात राहणो म्हणजे तप्त भट्टीत राहणो ठरले असते. त्यामुळे मग सर्वात पहिली सोय मध्यम आकाराच्या एसीची  करण्यात आली. मात्र विल्सनने त्याचा वापर अगदी गरजेपुरताच केला. अनेक प्रयोग केले. त्याच्या लक्षात आले, कितीही तीव्र उन्हाळ्यात रात्री 11 नंतर एसी न लावताही चांगली झोप लागते!
 
(लेखिका ख्यातनाम कलासमीक्षक आहेत)
sharmilaphadke@gmail.com