सुनीला पाटील संचालक, वीणा वल्र्ड
प्रवासाला जायचं, देशात वा परदेशात भटकंती करायची म्हटली तर ग्रुपने जाणं होतं. अशा भटकंतीमध्ये धम्माल मनोरंजन होतं, मनमोकळ्या गप्पा मारता येतात. शिवाय अनोळखी ठिकाणीदेखील चुकल्यासारखं वाटत नाही.
पण आता मात्र ( अगदी मराठी पर्यटकांमध्येदेखील) एक नवा ट्रेण्ड उदयाला येऊन रुजताना दिसतो आहे.
- व्यक्तिगत सहल.
आपल्या जोडीदाराबरोबर किंवा एकटय़ाने स्वत:बरोबरच फिरायला, प्रवासाला जाणं!
सोबतीला ओळखीच्या-अनोळखी लोकांचा घोळका नाही, इतरांबरोबर असताना ठरलेल्या वेळा पाळण्याची सक्ती नाही आणि एकमेकांसोबतचा एकांत ही या प्रकारातली ‘सोय’ आता अनेकांना हवीशी वाटते. इतरांसोबत आपल्याला हवी तशी मौज-मजा करण्याच्या उत्साहावरही थोडा निर्बंध येतो असं वाटणारे पर्यटक आता स्वत:च्या वाटा एकटय़ा-दुकटय़ानेच शोधायला निघाले आहेत.
प्रायव्हेट पण परफेक्ट हॉलिडेची ही संकल्पना आपल्याकडे रुजायला लागली सात-आठ वर्षांपूर्वी.
आम्ही या प्रकाराला सिग्नेचर हॉलिडे असं नाव दिलं आहे. या प्रकारच्या प्रवासाचं नियोजन करताना पर्यटकांच्या स्वप्नातला प्रवासाचा ‘अनुभव’ सत्यात उतरवण्याचं आव्हान असतं.
या नियोजनात एखाद्या व्यक्तीला, तिच्या कुटुंबीय मित्र-मैत्रिणींना नेमकं काय आवडतं, त्यांना कोणत्या ठिकाणी जायचंय, काय पहायची इच्छा आहे, या सर्व गोष्टी जाणून घेतल्या जातात.
म्हणजे, त्यांना युरोपमध्ये ट्रेनने प्रवास करायचा की सेल्फ ड्राइव करायचंय? व्हॅन हवी की कार हवी? ड्रायव्हर सोबत असावा की नसावा? हॉटेलमध्ये राहायचंय की एखाद्या पॅलेस, कॅसलमध्ये? थ्री स्टार हॉटेलमधली रूम हवी की लक्झरियस, पूल विला? .. अशा सा:या गोष्टी पर्यटकांच्या बजेटनुसार त्यांना हव्या तशा प्लान केल्या जातात. शिवाय प्रवासाला जाणा:याना वेगळा अनुभव कसा देता येईल, याचाही आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे समजा इटलीला गेलात तर तिथल्या टेम्पटिंग पिङझाची चव चाखल्याशिवाय तुम्ही राहाल का? पण खाण्याबरोबरच हा पिङझा कसा बनवायचा, हे जर तिथे शिकलात, स्वत: पिङझा बनवून खाल्लात तर काही औरच रंगत येईल, नाही का? फ्रान्समधून परफ्युम्स विकत आणण्यापेक्षा ते तिथे बनवायला शिकलात तर? असे हटके अनुभव एखाद्या जोडप्याला मिळाले तर ती ट्रिप संस्मरणीय होतेच. हनिमूनर्सदेखील हल्ली अशा सिग्नेचर हॉलिडेजला पसंती देतात.
सिग्नेचर हॉलिडेजसाठी युरोप, साउथइस्ट एशिया आणि अर्थातच अमेरिका ही हॉट डेस्टिनेशन्स आहेत. पोर्तुगाल, क्रोशिया, स्पेन, न्यूझीलंड, सेंट्रल युरोप, ग्रीनलॅण्ड, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, फ्रान्स, इटली, लंडन ही ठिकाणंदेखील हल्ली अनेकांच्या ‘विश लिस्ट’ मध्ये असतात. हनिमूनर्सच्या यादीत करेबियन आयलंड, ताहिती, बोरा बोरा, टांझानिया, ग्रीस आदी ठिकाणांची भर पडतेय. नेपाळलादेखील पर्यटक पसंती देतात. भारतात आयुर्वेद अनुभवण्यासाठी केरळला, तर हल्ली काही वर्षांपासून गुजरात, कच्छच्या रणालाही पसंती मिळतेय. अनेक अज्ञात किंवा अपरिचित ठिकाणंही या संकल्पनेमध्ये सामील केली जात आहेत.
स्वत:च्या मनानुसार बेत आखून प्रवासाला निघण्याचा आणि इतर कुणी जे करत नाही, ते करून, अनुभवून पाहण्याचा हा सगळा प्रकार तुम्हाला महाग वाटत असेल तर तसंही नाही.
- तुमच्या खिसापाकिटाची सोय पाहून राहण्या-फिरण्या-खाण्याच्या सोयी तर तुम्हाला मिळतातच, शिवाय गाठीला कधी न विसरता येणारे सुंदर क्षण!
एकटय़ा-दुकटय़ा भटक्यांची ‘विश लिस्ट’
=भारतात केरळमधला वैथरी इको रिसॉर्टमधला ट्री हाऊस स्टे,
=काश्मीरच्या गुलमर्गमध्ये समोर पसरलेल्या पांढराशुभ्र बर्फाचं दर्शन देणारं खैबर रिसॉर्ट,
=लडाखमधल्या पँगाँग लेकच्या काठावर तंबूत राहण्याची सोय..
=सेशेल्सचा निळा किनारा,
=दक्षिण आफ्रिकेतला शार्क केज एक्सपीरियन्स,
=हंगेरीत बुदापेस्टमधला प्राचीन टर्किश बाथचा अनुभव,
=व्हेल वॉचिंग क्रुझ,
=नॉर्दन लाइट क्रुझ..
शिकवणारे फिरणो
आनंदाबरोबरच आयुष्य समजून घ्यायला मदत करणारी प्रयोगशील भटकंती
8 ‘वायुवा’ची ज्ञानयात्र
पर्यटनस्थळांना भेटी देण्याऐवजी जे समाजातले खरे आयडॉल आहेत, त्यांच्याशी मनमोकळा संवाद केला, त्यांच्यासोबत राहण्याचा त्यांच्या जगण्याचा अनुभव घेण्याचा निखळ आनंद मिळवला तर तो अनुभव वेगळेच काही देऊन जाऊ शकतो. हे लक्षात घेऊन राज्यभरातील अशा आयडॉल्सना भेटवणारी यात्र गेल्या काही वर्षापासून पुण्यातून सुरू करण्यात आली आहे. वायुवा या नावाने स्थापन केलेल्या संस्थेअंतर्गत प्रामुख्याने तरुणांची निवड केली जाते. अक्षरश: हजारोंच्या संख्येने अर्ज येतात. त्या अर्जाची छाननी होते, मुलाखती घेतल्या जातात आणि मगच या ज्ञानयात्रींची निवड होते.
8 नर्मदा प्रेरणा यात्र
गुजरातमध्ये नितीन टेलर या तरुणाच्या नेतृत्वाखाली नर्मदा प्रेरणा यात्रेचे आयोजन उन्हाळी सुटय़ांमध्ये केले जाते. हिमालयामध्येहीे याच स्वरूपाची युवा प्रेरणा यात्र काढली जाते. त्यालाही तरुणांचा प्रतिसाद वाढता आहे. या आठ-दहा दिवसांच्या प्रवासानंतर जो काही समृद्ध अनुभव घेऊन तरुण बाहेर पडतात तो काही वेगळाच असतो.
8 ट्रेकिंग आणि मॅनेजमेण्ट एकसाथ
ताम्हिणी घाटामध्ये गरुडमाची या नावाचीे एक जागा आहे. या ठिकाणी रॉक क्लायम्बिंगपासून ते विविध साहसी खेळ घेतले जातात. छोटय़ा छोटय़ा साहसी खेळांची जोड दैनंदिन कामाशी घालून दिली जाते. व्यवस्थापन क्षेत्रंतील लोकांसाठी प्रामुख्याने त्याची रचना करण्यात आली आहे. जंगलट्रेड, रॉक क्लायम्बिंग करण्याचा आनंद, पर्यटन आणि मॅनेजमेण्टचे धडे हे सारे काही एकत्रित मिळत असल्याने कंपन्याही उत्साहाने त्याचे आयोजन करत आहेत. गेल्या वर्षभरात अशा 65क् मोहिमा झाल्याची माहिती एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण यांनी दिली. उन्हातल्या जंगलात चालण्याची, डोंगरात ट्रेक करण्याची ही संधी हल्ली अनेकांना खुणावतेय.
8 ओढ हिमालयाची
सह्याद्रीच्या द:याखो:यांमध्ये वाटा तुडवणारे तरुण बहुधा हिमालयाचीच ओढ मनाशी जपून असतात. अशा तरुणांना प्रत्यक्ष हिमालयात जाऊन भिडण्याची संधी गिरीप्रेमीसारख्या संस्था उपलब्ध करून देतात. नियोजनबद्ध आखणी आणि वेगळेपणामुळे हिमालयातील विविध ठिकाणी जाण्याकडेही लोकांचा अधिक कल आहे. हिमालयामध्ये मे ते सप्टेंबर या काळामध्ये अनेक छोटय़ा मोठय़ा मोहिमा आखल्या जात असतात.
8 जागृती यात्र
संपूर्ण भारत दर्शन घडवण्याच्या दृष्टिकोनातून जागृती यात्रेचे आयोजन केले जात असते. त्यासाठी खास ट्रेनची व्यवस्था केलेली असते आणि अजर्, मुलाखती याच पद्धतीतून तरुणांची त्य़ासाठी निवड केली जाते. 15 दिवसांच्या प्रवासात तरुणांना संपूर्ण भारताचे दर्शन घडेल अशी व्यवस्था केलेली असते. जवळपास 8 हजार किलोमीटर्सचा प्रवास ही मुले करतात. त्यासाठी अर्ज आणि निवडप्रक्रियेतून मात्र जावे लागते.