शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
5
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
6
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
7
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
8
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
9
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
10
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
11
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
12
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
13
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
14
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
15
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
16
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
17
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
18
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
19
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
20
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा

शेवटचा दिसं गोड व्हावा

By admin | Updated: December 27, 2014 19:25 IST

सदर लेखनातील हा शेवटचा लेख. वाचकांचा कृतज्ञतापूर्वक निरोप घेण्याचा, वाचकांना धन्यवाद देण्याचा आणि त्यांचे आभार मानण्याचा!

 प्रा. डॉ. द. ता. भोसले

 
सदर लेखनातील हा शेवटचा लेख. वाचकांचा कृतज्ञतापूर्वक निरोप घेण्याचा, वाचकांना धन्यवाद देण्याचा आणि त्यांचे आभार मानण्याचा! 
गेले वर्षभर मी ‘थोडं गोड आणि थोडं कडू’ या सदरासाठी शिक्षण आणि त्याच्याशी निगडित असलेले सारे घटक यांच्यातील भले-बुरे, कडू-गोड आणि ज्ञात-अज्ञात  असे अनुभव आपल्यासमोर ठेवत गेलो. आपले शिक्षण हा आता माणसाचा बहिश्‍चर प्राण झालेला आहे. जीवनातील जडण-घडणीचा तो एक प्राणभूत घटक मानला जातो आहे. आज माणसाजवळ असलेल्या धनशक्ती, जनशक्ती, पदशक्ती अथवा शस्त्रास्त्रशक्तीपेक्षाही ज्ञानशक्ती मोठी मानली जाते. ही ज्ञानशक्ती ज्याच्याकडे प्रबळ, प्रगत नि परिपूर्ण तो माणूस इतरांवर अधिराज्य गाजवू शकतो. तो देशही जगावर अधिराज्य गाजवू शकतो. म्हणून अशा या मौलिक व प्राणभूत घटकाचे तेज वाढावे, त्यातील विकृती कमी व्हावी, त्याच्या प्रकाशात अंधार पळून जावा आणि त्याचे चैतन्यमय, प्रकाशमय आणि निरामय रूप सर्वांना प्राप्त व्हावे या एका भावनेने शिक्षणाचे जे पाच प्रमुख घटक आपण मानतो त्यांचे कृष्ण-धवल दर्शन मी घडवीत गेलो. विद्यार्थी, पालक, शिक्षक, शासन आणि समाज हे ते पाच घटक होत. याची वाईट बाजू आणि चांगली बाजू मला जशा भावल्या तशा मांडल्या.
शिक्षणाच्या क्षेत्रात मी वेगवेगळ्या नात्यांनी बत्तीस वर्षे वावरलो. रमलो. विद्यार्थ्यांपासून समाज अन् शासन पातळीवर सार्‍या घटकांशी एकरूप होऊन मी जगलो त्यामुळे सगळ्यांचे नाना परीचे अनुभव मी घेतले आहेत. या माझ्या अनुभवांनाच मी कल्पितांची अंशत: जोड देत त्यातले हे सत्य नि सार्मथ्य वाचकांसमोर ठेवले. त्यातली कुरुपता आणि स्वार्थ अधोरेखित केला. तसे म्हटले तर हे सारे अनुभव आजही अवती-भोवती पाहावयास मिळतात. वाचकांच्या अनुभवाला येत असावेत. त्यामुळेच या माझ्या सदर लेखनाला महाराष्ट्राच्या सर्व विभागांतून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातच या दैनिकाच्या रविवार आवृत्तीचे वितरण सर्वदूर आणि मोठय़ा संख्येने होत असल्याने चंद्रपूरपासून तो कर्नाटकाच्या सीमेवरील चंदगडपर्यंतच्या वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. फोन करून आणि समक्ष भेट देऊनही या सदर लेखनातील एकेक पात्र अन् एकेक प्रसंग म्हणजे व्यामिश्र जीवनाचा घडविलेला अनोखा साक्षात्कार होय असेही काही वाचकांना वाटले. ‘‘कमालीच्या प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणासाठी जिद्दीने झुंजणार्‍या मुलांचा आम्हाला पत्ता  कळवा आम्ही त्याला मदत करणार आहोत’’ असे फोनही मला अनेकांनी केले; यापेक्षा वाचकांच्या प्रतिक्रियांची महत्ता दुसरीकडे बघायला नको, असेच मला वाटते. ‘लोकमत समूहा’ने ही संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. मुख्य म्हणजे वाचकांनी दिलेल्या प्रोत्साहनाविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. महाकवी तुकोबारायांच्या भाषेत एवढेच म्हणेन की, ‘शेवटचा दिस गोड व्हावा’.. तो गोड झाला याचाच खरा आनंद! 
 (लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व नवृत्त प्राचार्य आहेत.)
(समाप्त)